वारंवार सब्सक्रिप्शन रिन्यू करण्याची गरज नाही; Netflix ने सादर केले कमालीचे फीचर 

By सिद्धेश जाधव | Published: September 1, 2021 06:54 PM2021-09-01T18:54:34+5:302021-09-01T18:55:02+5:30

Netflix AutoPay feature: Netflix AutoPay feature ची मागणी मोठ्या प्रमाणावर केली जात होती. ही मागणी लक्षात घेऊन कंपनीने हे फीचर सादर केले आहे.

Netflix upi autopay feature rollout know how to use  | वारंवार सब्सक्रिप्शन रिन्यू करण्याची गरज नाही; Netflix ने सादर केले कमालीचे फीचर 

वारंवार सब्सक्रिप्शन रिन्यू करण्याची गरज नाही; Netflix ने सादर केले कमालीचे फीचर 

Next

भारतात नेटफ्लिक्सने Netflix AutoPay feature सादर केले आहे. या फीचरची मागणी भारतीय युजर्स गेले कित्येक दिवस करत होते. या फिचरमुळे वारंवार नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन होणार नाही. AutoPay फीचरच्या मदतीने आपोआप तुमचे सब्सक्रिप्शन रिन्यू होईल. सध्या AutoPay फीचर Android युजर्स आणि netflix.com वर उपलब्ध आहे. या फीचरचा वापर सर्व नेटफ्लिक्स युजर्सना करता येईल.  

Netflix AutoPay feature 

Netflix AutoPay feature ची मागणी मोठ्या प्रमाणावर केली जात होती. ही मागणी लक्षात घेऊन कंपनीने हे फीचर सादर केले आहे. चला जाणून घेऊया AutoPay फीचर कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे.  

How to use Netflix AutoPay 

  • सर्वप्रथम तुम्हाला एका ईमेल आयडीचा वापर करून Netflix वर तुमचे अकॉउंट बनवावे लागेल.  
  • अकॉउंट बनवल्यानंतर तुमच्या पसंतीचा प्लॅन निवडा. तुम्ही 499, 699 आणि 799 रुपयांपैकी एक प्लॅन निवडू शकता.  
  • Android मोबाईल अ‍ॅपवरून तुम्ही 199 रुपयांचा मोबाईल प्लॅन देखील निवडू शकता. 
  • प्लॅन सिलेक्ट केल्यावर, तुम्हाला पेमेंट मेथड सेट करण्याचा पर्याय मिळेल.  
  • इथे तुम्ही क्रेडिट किंवा डेबिट कार्ड डिटेल्स निवडून पेमेंट करू शकता. 
  • त्यानंतर तुम्ही UPI ऑटोपे ऑप्शन निवडू शकता. इथे तुम्हाला तुमचा UPI ID एंटर करावा लागेल.  
  • एकदा तुम्ही ऑटोपेची प्रक्रिया पूर्ण केली कि दर महिन्याला तुमचे सब्सक्रिप्शनचे पैसे आपोआप तुमच्या बँकेच्या खात्यातून डेबिट होतील.  

Web Title: Netflix upi autopay feature rollout know how to use 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.