16GB RAM अन् 1TB स्टोरेजसह भारतात लॉन्च झाला सर्वात स्वस्त स्मार्टफोन, किंमत फक्त...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 14:41 IST2026-01-23T14:40:31+5:302026-01-23T14:41:19+5:30

Motorola Signature : या फोनमध्ये 50MP चे चार कॅमेरे, पॉवरफूल प्रोसेसर अन् फास्ट चार्जिंगसारखी वैशिष्ट्ये मिळतात.

Motorola Signature: cheapest smartphone launched in India with 16GB RAM and 1TB storage, priced at just | 16GB RAM अन् 1TB स्टोरेजसह भारतात लॉन्च झाला सर्वात स्वस्त स्मार्टफोन, किंमत फक्त...

16GB RAM अन् 1TB स्टोरेजसह भारतात लॉन्च झाला सर्वात स्वस्त स्मार्टफोन, किंमत फक्त...

Motorola Signature : मोटोरोला कंपनीने भारतीय बाजारात आपला नवा प्रीमियम स्मार्टफोन Motorola Signature लॉन्च केला आहे. फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये सादर करण्यात आलेल्या या फोनमध्ये 50MP चे चार कॅमेरे, शक्तिशाली प्रोसेसर, मोठी बॅटरी आणि फास्ट चार्जिंगसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. कंपनी गेल्या काही दिवसांपासून या फोनचे टीझर रिलीज करत होती.

प्रीमियम फीचर्ससह दमदार प्रोसेसर

Motorola Signature मध्ये Snapdragon 8 Gen 5 हा अत्याधुनिक प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 16GB पर्यंत RAM आणि 1TB पर्यंत स्टोरेजचा पर्याय उपलब्ध असून, हा भारतातील सर्वात स्वस्त 16GB RAM + 1TB स्टोरेज असलेला स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. फोनसोबत Signature Club चे एक्सेसही दिले जाणार असून, ही एक लाइफस्टाइल सपोर्ट सर्व्हिस आहे.

किंमत किती?

  • 12GB RAM + 256GB स्टोरेज - ₹59,999
  • 16GB RAM + 512GB स्टोरेज - ₹64,999
  • 16GB RAM + 1TB स्टोरेज - ₹69,999

ग्राहकांना HDFC आणि Axis Bank कार्डवर ₹5,000 पर्यंत सूट मिळणार आहे. तसेच एक्सचेंज बोनसचीही सुविधा आहे, मात्र एका वेळी एकाच ऑफरचा लाभ घेता येईल. या फोनची विक्री 30 जानेवारीपासून सुरू होणार असून, तो Flipkart वरून दोन रंगांच्या पर्यायात खरेदी करता येईल.

Motorola Signature चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : 6.8 इंच Super HD LTPO AMOLED
  • रिफ्रेश रेट : 165Hz
  • ऑपरेटिंग सिस्टीम : Android 16
  • प्रोसेसर : Snapdragon 8 Gen 5
  • RAM / स्टोरेज : 16GB पर्यंत RAM, 1TB पर्यंत स्टोरेज
  • बॉडी : अ‍ॅल्युमिनियम फ्रेम
  • प्रोटेक्शन : Gorilla Glass Victus 2
  • वॉटर/डस्ट रेटिंग : IP68 + IP69
  • कॅमेरा सेटअप
  • फोनमध्ये Sony चे चार 50MP कॅमेरे देण्यात आले आहेत :-
  • 50MP प्रायमरी कॅमेरा
  • 50MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स
  • 50MP टेलिफोटो लेन्स
  • 50MP फ्रंट सेल्फी कॅमेरा
  • बॅटरी आणि चार्जिंग
  • Motorola Signature मध्ये 5200mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.
  • 90W फास्ट चार्जिंग
  • 50W वायरलेस चार्जिंग
  • रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट

Web Title : Motorola Signature: भारत में सबसे सस्ता 16GB RAM, 1TB स्टोरेज फोन लॉन्च

Web Summary : मोटोरोला ने भारत में सिग्नेचर फोन लॉन्च किया, जिसमें 16GB RAM और 1TB स्टोरेज है। Snapdragon 8 Gen 5 प्रोसेसर, क्वाड 50MP कैमरे और फास्ट चार्जिंग के साथ 5200mAh की बैटरी है। 30 जनवरी से Flipkart पर उपलब्ध। HDFC/Axis बैंक छूट लागू।

Web Title : Motorola Signature: Cheapest 16GB RAM, 1TB Storage Phone Launched in India

Web Summary : Motorola launched its Signature phone in India, boasting 16GB RAM and 1TB storage. Featuring a Snapdragon 8 Gen 5 processor, quad 50MP cameras, and a 5200mAh battery with fast charging, it's available on Flipkart starting January 30th. HDFC/Axis Bank discounts apply.