सावधान! स्मार्टफोन जिन्सच्या खिशातच फुटला; तरुणाचा प्रायव्हेट पार्ट थोडक्यात वाचला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 10:05 IST2025-12-31T10:04:17+5:302025-12-31T10:05:35+5:30
Motorola Phone Explodes : लिनोव्होची मालकी असलेल्या मोटरोला कंपनीचा Motorola Moto G54 हा स्मार्टफोन या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

सावधान! स्मार्टफोन जिन्सच्या खिशातच फुटला; तरुणाचा प्रायव्हेट पार्ट थोडक्यात वाचला...
नवी दिल्ली: आजच्या काळात स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. मात्र, तो किती धोकादायक ठरू शकतो, याची प्रचिती देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोटोरोला (Motorola) कंपनीचा एक स्मार्टफोन चक्क एका व्यक्तीच्या खिशात असतानाच फुटला. या भीषण स्फोटानंतरच्या अवस्थेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून स्मार्टफोनच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
shubhxr_369 या अकाऊंटवरून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लिनोव्होची मालकी असलेल्या मोटरोला कंपनीचा Motorola Moto G54 हा स्मार्टफोन या व्हिडीओमध्ये दिसत आहे. खिशामध्ये असताना या स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट झाला आणि तरुणाच्या खिशाला भोक पडल्याचे यात दिसत आहे. संबंधित व्यक्तीने तातडीने खिशातून फोन बाहेर काढल्याने थोडक्यात या तरुणाचा प्रायव्हेट पार्ट वाचला आहे.
मोटोरोला युझर्समध्ये चिंतेचे वातावरण
या घटनेनंतर सोशल मीडियावर मोटोरोला कंपनीवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. युझर्स फोनच्या बॅटरी क्वालिटी आणि सुरक्षेबाबत प्रश्न विचारत आहेत. अद्याप कंपनीने या घटनेवर अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही, परंतु तांत्रिक बिघाड किंवा बॅटरीवर पडलेला दाब हे या स्फोटाचे कारण असू शकते, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
Apparently, someone’s Motorola smartphone (likely the G54) suddenly burst while it was in their pocket.
— Chandan (@that_chand) December 30, 2025
I suspect the phone may have first caught fire and then exploded a few seconds after the user removed it from their pocket.
This is scary. 💀 pic.twitter.com/3xuwgTzGyO
तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवाल?
अशा घटना टाळण्यासाठी तज्ज्ञांनी खालील खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे:
ओरिजिनल चार्जरच वापरा: नेहमी फोनसोबत मिळालेल्या अधिकृत चार्जरचाच वापर करा. स्वस्त किंवा बनावट चार्जर बॅटरी खराब करू शकतात.
जास्त चार्जिंग टाळा: रात्रभर फोन चार्जिंगला लावून ठेवू नका. १००% चार्ज झाल्यावर प्लग काढून टाका.
खिशात दाब टाकू नका: घट्ट पॅन्टच्या खिशात फोन ठेवल्याने बॅटरीवर दाब येतो, ज्यामुळे शॉर्ट सर्किट होऊ शकते.
फोन तापत असल्यास सावध व्हा: जर वापरताना किंवा चार्जिंग करताना फोन प्रमाणाबाहेर गरम होत असेल, तर तो त्वरित बाजूला ठेवा आणि सर्व्हिस सेंटरला दाखवा.