50MP च्या शानदार कॅमेऱ्यासह Motorola Moto G31 होऊ शकतो लाँच; डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्सचा खुलासा 

By सिद्धेश जाधव | Published: November 12, 2021 03:52 PM2021-11-12T15:52:35+5:302021-11-12T15:53:07+5:30

Budget Phone Moto G31 Price: मोटोरोला लवकरच Moto G31 स्मार्टफोन सादर करू शकते. हा फोन बजेट सेगमेंटमध्ये येईल आणि यात 50MP camera आणि 5000mAh ची बॅटरी मिळू शकते.

Motorola moto g31 smartphone design and specifications leaked  | 50MP च्या शानदार कॅमेऱ्यासह Motorola Moto G31 होऊ शकतो लाँच; डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्सचा खुलासा 

50MP च्या शानदार कॅमेऱ्यासह Motorola Moto G31 होऊ शकतो लाँच; डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्सचा खुलासा 

googlenewsNext

मोटोरोला लवकरच बजेट सेगमेंटमध्ये Moto G31 स्मार्टफोन सादर करू शकते. हा फोन यावर्षी सादर झालेल्या Moto G30 ची जागा घेईल. आगामी Moto G31 स्मार्टफोनची माहिती अनेक लिक्स आणि रिपोर्ट्समधून समोर आली आहे. तसेच या फोनचे फोटो NCC सर्टिफिकेशन्सवरून मिळाले आहेत. आता 91Mobiles ने या स्मार्टफोनचे रेंडर आणि स्पेसिफिकेशन्स रिपोर्टमधून शेयर केले आहेत.  

Moto G31 चे स्पेसीफाकेशन 

Moto G31 च्या फ्रंटला पंच होल डिजाईन देण्यात येईल. तर बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि फिंगरप्रिंट सेन्सर आहे. फोन उजव्या पॅनलवर पॉवर बटन, वॉल्यूम बटन आणि गुगल असिस्टंट बटन मिळेल. या फोनमध्ये 6.4-इंचाचा OLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचे रिजोल्यूशन Full HD+ असेल. हा फोन Android 11 वर चालेल.  

फोटोग्राफीसाठी डिवाइसच्या ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळेल. इतर इतर दोन सेन्सर तसेच सेल्फी कॅमेऱ्याची माहिती मात्र अजूनही मिळाली नाही. रिपोर्ट्सनुसार पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी मिळेल, जी 10W चार्जिंगला सपोर्ट करेल. कनेक्टिव्हिटीसाठी यात 3.5mm ऑडियो जॅक, मायक्रोफोन, स्पिकर ग्रिल आणि USB Type C पोर्ट मिळेल.  

या फोनच्या प्रोसेसर, रॅम आणि फ्रंट कॅमेऱ्याची माहिती मिळाली नाही. परंतु यातील फीचर्स Moto G30 पेक्षा अपग्रेड असण्याची शकता आहे. Moto G30 स्मार्टफोन Snapdragon 662 SoC आणि 13MP सेल्फी कॅमेऱ्यासह बाजारात आला होता.  

Web Title: Motorola moto g31 smartphone design and specifications leaked 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.