Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 17:01 IST2025-11-12T16:59:43+5:302025-11-12T17:01:40+5:30
Motorola Edge 50: नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अंडरवॉटर प्रोटेक्शनसह गेल्या वर्षी लॉन्च झालेला मोटोरोला एज ५० आता ग्राहकांसाठी एक मोठी सवलत घेऊन आला आहे. या प्रीमियम फोनच्या किमतीत तब्बल ₹६,००० रुपयांची कपात करण्यात आली.
मोटोरोला एज ५० च्या ८ जीबी रॅम, २५६ जीबी स्टोरेज (पीक फज कलर व्हेरिएंट) लॉन्चिंगच्या वेळी ₹२७ हजार ९९९ किमतीत उपलब्ध होता. आता हा फोन फ्लिपकार्टवर ₹२१ हजार ९९९ मध्ये विकत घेता येत आहे. याशिवाय, कंपनी या फोनच्या खरेदीवर ५ टक्के कॅशबॅक देखील देत आहे. जुना फोन एक्स्चेंज केल्यास, या फोनची किंमत आणखी कमी होऊ शकते. परंतु, एक्स्चेंज किंमत जुन्या फोनची स्थिती आणि कंपनीच्या एक्स्चेंज पॉलिसीवर अवलंबून असेल.
या फोनमध्ये ६.६७ इंच १.५ के पीओएलईडी एंडलेस एज डिस्प्ले देत आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट १२०Hz आहे. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी, कंपनी या फोनवर गोरिल्ला ग्लास ५ देत आहे. हा फोन ८ जीबी एलपीडीडीआर४एक्स रॅम आणि २५६ जीबी यूएफएस २.२ स्टोरेजसह येतो. हा फोन स्नॅपड्रॅगन ७एस जेन १ चिपसेटने चालवला जातो.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये तीन कॅमेरे देण्यात आले, यामध्ये ५० मेगापिक्सेलचा मुख्य लेन्स, १३ मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आणि १० मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा समाविष्ट आहे. सेल्फीसाठी, कंपनी ३२ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. फोनमध्ये ५००० एमएएच बॅटरी आहे, जी ६८ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हे १५ वॅट वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करते. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. फोन आयपी ६८ डस्ट आणि वॉटर रेझिस्टंट आहे. हा अँड्रॉइड १४ वर चालतो.