मुहूर्त ठरला! 17 ऑगस्टला Motorola Edge 20 आणि Edge 20 Fusion 5G येणार भारतात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 19:33 IST2021-08-10T19:32:50+5:302021-08-10T19:33:57+5:30

Motorola Edge 20 Launch: भारतात Motorola Edge 20 आणि Motorola Edge 20 Fusion हे दोन स्मार्टफोन सादर केले जातील.  

Motorola Edge 20 fusion india launch on 17 august with 108mp camera snapdragon 778g chipset  | मुहूर्त ठरला! 17 ऑगस्टला Motorola Edge 20 आणि Edge 20 Fusion 5G येणार भारतात 

मुहूर्त ठरला! 17 ऑगस्टला Motorola Edge 20 आणि Edge 20 Fusion 5G येणार भारतात 

ठळक मुद्दे भारतात Motorola Edge 20 आणि Motorola Edge 20 Fusion हे दोन स्मार्टफोन सादर केले जातील.  ही सिरीज फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होईल हे समजले आहे.

Motorola इंडियाने अलीकडेच ‘एज 20‘ सीरीज टीज केली होती. आज कंपनीने या सीरीजच्या लाँचची तारीख देखील सांगितली आहे. Motorola Edge 20 सीरिज येत्या 17 ऑगस्टला भारतात सादर केली जाईल, अशी घोषणा मोटोरोला इंडियाने केली आहे. जागतिक बाजारात या सीरीजमध्ये Motorola Edge 20, Motorola Edge 20 Pro आणि Motorola Edge 20 Lite असे तीन स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. तर भारतात Motorola Edge 20 आणि Motorola Edge 20 Fusion हे दोन स्मार्टफोन सादर केले जातील.  

मोटोरोला इंडियाने सांगितले आहे कि Motorola Edge 20 आणि Motorola Edge 20 Fusion भारतात 17 ऑगस्टला लाँच केले जातील. या सीरिजसाठी फ्लिपकार्टवर एक प्रोडक्ट पेज देखील बनवण्यात आले आहे. त्यामुळे ही सिरीज फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होईल हे समजले आहे. सकाळीच बातमी आली होती कि जागतिक बाजारातील Motorola Edge 20 Lite स्मार्टफोन भारतात Motorola Edge 20 Fusion नावाने सादर केला जाईल.  

Motorola Edge 20 चे स्पेसिफिकेशन्स    

Motorola Edge 20 स्मार्टफोन मध्ये 6.67 इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन आणि 144हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. मोटोरोला एज 20 स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेट आहे. हा फोन अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टमसह सादर करण्यात आला आहे.    

फोटोग्राफीसाठी या मोटोरोला फोनमध्ये 108 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. सोबत 16 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर आणि 8 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहेत. सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. मोटोरोला एज 20 मध्ये 4,000एमएएचची बॅटरी 33W TurboPower फास्ट चार्जींगसह देण्यात आली आहे.  

Web Title: Motorola Edge 20 fusion india launch on 17 august with 108mp camera snapdragon 778g chipset 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.