शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
6
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
7
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
8
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
9
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
10
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
11
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
12
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
13
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
14
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
15
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
16
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
17
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
18
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
19
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
20
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा

मस्तच! Twitter वर भारतीय भाषांची वाढतेय क्रेझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 12:34 IST

मायक्रो ब्लॉगिंग साईट असलेल्या ट्विटरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

नवी दिल्ली - मायक्रो ब्लॉगिंग साईट असलेल्या ट्विटरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. ट्विटर आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. गेल्या पाच वर्षात ट्विटरची लोकप्रियता वाढली असून चांगला महसूल मिळाला आहे. ट्विटरवर प्रादेशिक भाषांचा वाढता वापर केल्याने ही महसुलात वाढ झाल्याची माहिती मिळत आहे. 

ट्विटर इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक मनीष महेश्वरी यांनी भारतात ट्विटरचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. कंपनीसाठी भारत ही सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. जगभरात ट्विटरची वृद्धी होण्याचं सगळ्यात मोठं कारणं भारत आहे. आमची किंमत प्रिमियम असून आम्ही सगळ्या प्रिमियम ब्रँडसोबत काम करत आहोत' असं म्हटलं आहे. 

ट्विटर वापरणाऱ्या भारतीय युजर्सच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. सोशल मीडिया, इंटरनेट आणि मोबाईलचा वापर जास्त केला जातो. भारतात व्हिडीओ कॅटेगिरीत वाढ झाली असून अर्ध्यापेक्षा जास्त महसूल हा या सेगमेंटमधून येत असल्याचं देखील महेश्वरी यांनी म्हटलं आहे. तसेच ट्विटरवर प्रेफर्ड लँग्वेज ऑप्शनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून यामुळे युजर्सना त्यानी निवडलेल्या भाषेत टाईमलाईनवर कटेंट दिसणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

'भारतात प्रादेशिक भाषांवर काम करणे गरजेचं आहे असं आम्हाला वाटलं. नॉन इंग्लिश ट्विटची संख्या हा सर्व ट्विट्सच्या 50 टक्के आहे. आम्ही बदल केल्यानंतर  मागील 6 ते 8 महिन्यांमध्ये हे झालं आहे' अशी माहिती महेश्वरी यांनी दिली आहे. ट्विटरवर सध्या अर्धे ट्विट इंग्रजीमध्ये आहेत तर काही इतर भाषांमध्ये आहेत. यामध्ये हिंदी भाषेचा प्रथम क्रमांक लागतो. त्यानंतर तमिळ भाषेचा नंबर लागतो. ट्विटर 70 मीडिया पार्टनर्ससोबत काम करत आहे. जेणेकरून ट्विटरवर प्रादेशिक आणि स्थानिक कटेंट उपलब्ध होतील.

ट्विटर आता एक महत्त्वाचा निर्णय घेण्याचा विचार करत आहे. ट्विटर लवकरच रिट्विट हे आपलं लोकप्रिय फीचर हटवणार असल्याची माहिती मिळत आहे. याबदल्यात कंपनी नवीन अँटी-हरासमेंट फीचर्स आणत आहे. यामुळे ट्विटरवर रिट्विट करणं आणि दुसऱ्या युजर्सना मेन्शन करण्याची पद्धत पूर्णत: बदलणार आहे. ट्विटरच्या डेंटली डेविस यांनी एक ट्वीट करून याबाबतचे संकेत दिले आहेत. 2020 मध्ये ट्विटरवर कोणते बदल अपेक्षित आहेत याची माहिती डेविस यांनी आपल्या ट्विटमध्ये दिली आहे. युजर्स आपलं खास ट्विट रिट्विट करण्याचा ऑप्शन बंद करू शकतात. तसेच एक यूजर दुसऱ्या युजर्सला त्याच्या परमिशन शिवाय मेन्शन करू शकत नाहीत. तसेच युजर्स आपल्या मर्जीने कोणत्या तरी खास संभाषणातून बाहेर पडू शकतात अशा गोष्टींचा समावेश ट्विटमध्ये करण्यात आलं आहे. यानुसार लवकरच युजर्स आपलं ट्विट कोणी रिट्विट करावं हे ठरवू शकतात. 

टॅग्स :Twitterट्विटरtechnologyतंत्रज्ञानIndiaभारतMobileमोबाइलSocial Mediaसोशल मीडिया