बापरे! कूल वाटणारं कव्हर ठरू शकतं रिस्की; अचानक होईल स्मार्टफोनचा स्फोट, वेळीच व्हा सावध
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 16:51 IST2025-11-14T16:50:34+5:302025-11-14T16:51:16+5:30
फोन कव्हर तुमचा फोन खराब करू शकतं. यामुळे स्मार्टफोन हँग होऊ शकतो, बॅटरी खराब होऊ शकते आणि इतर विविध समस्या उद्भवू शकतात

बापरे! कूल वाटणारं कव्हर ठरू शकतं रिस्की; अचानक होईल स्मार्टफोनचा स्फोट, वेळीच व्हा सावध
स्मार्टफोन हा कॉलिंग, गेमिंग, एआय, फोटो, व्हिडीओ तसेच चित्रपट, ओटीटी प्लॅटफॉर्म पाहण्यासाठी वापरला जातो. बरेच लोक महागडे स्मार्टफोन खरेदी करतात आणि त्यावर आकर्षक फोन कव्हर देखील लावतात. पण तुम्हाला माहीत आहे का की फोन कव्हर तुमचा फोन खराब करू शकतं. यामुळे स्मार्टफोन हँग होऊ शकतो, बॅटरी खराब होऊ शकते आणि इतर विविध समस्या उद्भवू शकतात. धक्कादायक बाब म्हणजे फोनचा स्फोट देखील होऊ शकतो.
फोनचं टेम्प्रेचर कंट्रोलमध्ये राहणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी कंपन्या बॅक पॅनेल, होल, फॅन आणि कूलिंग चेंबरचा वापर करतात. स्मार्टफोनसाठी चुकीचं कव्हर कूलिंग सिस्टमवर परिणाम करू शकतं आणि होल ब्लॉक करू शकतं. बरेच लोक फोनसाठी जाड आणि खडबडीत कव्हर वापरतात. ज्यामुळे उष्णता ट्रॅप होते आणि मॅकेनिझ्म स्पीडवर परिणाम होतो. तसेच बॅटरीवर अनेक नकारात्मक परिणाम होतात. जास्त उष्णतेमुळे बॅटरीचा स्फोट होऊ शकतो.
फोनमध्ये उष्णता निर्माण होण्याची प्रमुख कारणं
- फोन प्रोसेसरवर जास्त लोड.
- फास्ट चार्जिंग किंवा फोन दीर्घकाळ चार्जिंग केल्याने.
- कमकुवत नेटवर्क सिग्नलमुळे देखील उष्णता निर्माण होते.
- फोन डेटा किंवा हॉटस्पॉट्सचा दीर्घकाळ वापर केल्याने.
- सतत डेटा ट्रान्सफर किंवा प्रोसेसिंगमुळे देखील फोन जास्त गरम होतो.
- जास्त ब्राइटनेसमुळे फोन स्क्रीन देखील गरम होते.
- बॅकग्राउंड एप्स देखील उष्णता निर्माण करतात.
- फोन कव्हर देखील उष्णता बाहेर पडण्यापासून रोखतात.
फोनची उष्णता कमी करण्याचे मार्ग
- फास्ट चार्जिंग बंद करा किंवा सामान्य चार्जर वापरा.
- बॅकग्राउंड एप्स बंद ठेवा.
- स्मार्टफोनची डिस्प्ले ब्राइटनेस कमी ठेवा.
- गेमिंग किंवा व्हिडीओ एडिटिंग करताना अधूनमधून फोन बंद करा.
- जड कव्हरऐवजी हलकं कव्हर वापरा.
योग्य कव्हर निवडा
स्मार्टफोन युजर्सनी नेहमीच योग्य फोन कव्हर निवडावं. यामुळे स्मार्टफोनमधील उष्णता कमी होण्यास आणि तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होईल.