शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
5
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
6
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
7
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
8
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
9
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
11
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
12
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
13
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
14
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
15
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
16
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
17
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
18
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
19
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

चीनच्या 'या' मोठ्या मोबाइल कंपनीकडून भारताची फसवणूक, तुम्हालाही घातला जाऊ शकतो गंडा?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2020 4:11 PM

चीनमधल्या एका मोबाइल कंपनीनं भारताच्या अंतर्गत सुरक्षेशी छेडछाड केल्याचा प्रकार समोर आला आहे.

नवी दिल्लीः कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात झाला असून, अनेक देशांमधील रुग्णसंख्या वाढतीच आहे. कोरोनाच्या उत्पत्तीसाठी अमेरिकेनं वारंवार चीनला जबाबदार धरलं आहे. विशेष म्हणजे एवढे आरोप होऊनही चीन आपला आक्रमकपणा सोडण्यास तयार नाही. चीनमधल्या एका मोबाइल कंपनीनं भारताच्या अंतर्गत सुरक्षेशी छेडछाड केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मेरठमध्ये त्या मोबाइल कंपनीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जगभरातील मोबाईल फोनच्या बाजारात चीनचा मोठा वाटा आहे. पण कोरोनाच्या संकटानं चीनचा व्यापारही मंदावला आहे, अशातच चीननं भारतात फसवे कारनामे करण्यास सुरुवात केली आहे. चीननं भारताच्या सुरक्षेशी छेडछाड केली असून, अत्यंत धोकादायक तसेच भारताच्या अंतर्गत सुरक्षा मानकांचं उल्लंघन केलं आहे. चीनची सर्वात मोठी मोबाइल कंपनी व्हिवोने एकाच आयएमईआय नंबरचे हजारो मोबाइल फोन भारतात लाँच करून विकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. केंद्रशासित प्रदेश आणि देशातील 28 राज्यांत एकाच आयएमईआयचे अनेक मोबाइल फोन सक्रिय असल्याचा पुरावा पोलिसांनी गोळा केला आहे. उत्तर प्रदेशात एकाच आयएमईआय नंबरवर सर्वाधिक सक्रिय मोबाइल फोन आहेत. नेटवर्किंग कंपन्या आणि मोबाईल निर्माता कंपनी असलेल्या व्हिवोला पोलिसांनी समन्स बजावले आहे. जगातील प्रत्येक मोबाइल फोनवर आयएमईआय म्हणजेच आंतरराष्ट्रीय मोबाइल उपकरण ओळख क्रमांक असतो. ही एक प्रकारची मोबाइलची ओळख असते. प्रत्येक कंपनी मोबाइलला आयएमईआय देते. चीनच्या मोबाइल कंपनीने एकाच आयएमईआय क्रमांकाचे भारतीय बाजारात 13 हजार 500 हून अधिक मोबाइल  आणले आहेत. जेव्हा एकाच आयएमईआय क्रमांकाच्या 13 हजारांहून अधिक मोबाइल फोनची सक्रिय असल्याची माहिती समोर आली, तेव्हा भारतात मेरठच्या पोलीस विभागात एकच खळबळ उडाली. एका गंभीर प्रकरणावर मेरठमध्ये चीनची मोबाइल कंपनी विवोविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेरठ झोन पोलिसांच्या सायबर क्राइम सेलच्या तपासणीत हा मोठा खुलासा झाला आहे. मेरठच्या मेडिकल स्टेशन पोलिसांनी चीनच्या व्हिवो कंपनी आणि त्याच्या सेवा केंद्रावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या बाबतीत व्हिवो कंपनीची ही मोठी चूक मानली जाते.मेरठच्या अप्पर पोलीस महासंचालकांच्या कार्यालयात तैनात उपनिरीक्षक आशाराम यांच्याकडे व्हिवो कंपनीचा मोबाइल आहे. 24 सप्टेंबर 2019 रोजी स्पीकर खराब झाल्यावर त्यांनी तो मोबाइल मेरठच्या दिल्ली रोडवरील व्हिवोच्या सर्व्हिस सेंटरमध्ये दिला. त्यानंतर तो दुरुस्त झाला. पुन्हा काही दिवसांनंतर मोबाइलमधील डिस्प्लेवर एक त्रुटी दिसू लागली. आशारामच्या मोबाइलच्या बॉक्सवर लिहिलेला आयएमईआय मोबाइलमध्ये उपस्थित आयएमईआयपेक्षा वेगळा आहे तेव्हा हे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर 16 जानेवारी 2020 रोजी सर्व्हिस सेंटरच्या व्यवस्थापकाने उत्तर दिले की, आयएमईआय बदललेला नाही. यानंतर या प्रकरणाच्या तक्रारीवरून तत्कालीन एडीजी प्रशांत कुमार यांनी मेरठ झोन पोलिसांचे प्रभारी प्रबलकुमार पंकज आणि सायबर तज्ज्ञ विजय कुमार यांच्या चौकशीचे निर्देश दिले. 

हेही वाचा

PoKमध्ये बौद्धांच्या वारशाला धक्का; गिलगिट-बाल्टिस्तान रिकामी करा; भारताचा पाकला कडक इशारा

Cyclone Nisarga: चक्रीवादळाने दिशा बदलल्याने मुंबई अन् ठाण्यातील मच्छीमारांसाठी धोका टळला

मोदींच्या मंत्रिमंडळानं घेतले ६ मोठे निर्णय, कोलकाता बंदराला दिलं श्यामा प्रसाद मुखर्जींचं नाव 

मोदींच्या मंत्रिमंडळाची दोन अध्यादेशांना मंजुरी; शेतकऱ्यांसाठी 'एक देश एक बाजार' धोरण 

टॅग्स :chinaचीनVivoविवो