शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

गुगलच्या डूडलमध्ये आज मिर्झा गालिब, शेर-ओ-शायरीच्या बादशाहला मानवंदना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 9:01 AM

गुगलने शेर-ओ-शायरीचा बादशाहाला अर्थात मिर्झा गालिब यांना डूडलच्या माध्यमातून मानवंदना दिली आहे.

ठळक मुद्दे गुगलने शेर-ओ-शायरीचा बादशाहाला अर्थात मिर्झा गालिब यांना डूडलच्या माध्यमातून मानवंदना दिली आहे. मिर्जा गालिब यांची आज 220 वी जयंती आहे.

मुंबई- गुगलने शेर-ओ-शायरीचा बादशाहाला अर्थात मिर्झा गालिब यांना डूडलच्या माध्यमातून मानवंदना दिली आहे. मिर्झा गालिब यांची आज 220 वी जयंती आहे. याच निमित्ताने गूगलने खास डूडल तयार करुन मिर्जा गालिब यांना अभिवादन केलं आहे. मिर्झा गालिब यांचं पूर्ण नाव मिर्झा असल-उल्लाह बेग खां 27 डिसेंबर 1797 रोजी आग्र्यातील काळा महालमध्ये गालिब यांचा जन्म झाला. तेव्हा भारतात मुघलांचे राज्य होते.. मिर्जा गालिब यांनी पारसी, उर्दू आणि अरबी भाषेत अभ्यास केला.

गुगलच्या डूडलमध्ये मिर्झा गालिब यांच्या हातात पेन आणि कागद दिसतो आहे. त्यांच्या मागे साकारण्यात आलेली इमारत मुघलकालीन वास्तूकलेचं दर्शन घडवते आहे. मुघलकालीन भिंती, त्यावरील आकर्षक रचना, सूर्य आणि पिवळसर प्रकाश अशा पार्श्वभूमीवर मिर्झा गालिब यांचं पूर्ण चित्र डूडलने साकारलं आहे. 

अत्यंत हालाखीच्या स्थितीत मिर्जा गालिब यांचं बालपण गेलं. संपूर्ण आयुष्य एका संघर्षाच्या उन्हातच त्यांनी घालवलं. आर्थिक संकटांनी तर त्यांना बेजार केलं. मात्र जगण्यातले चटकेही त्यांनी शब्दबद्ध केले. शायरीतून व्यक्त केले.लहान असतानाच गालिब यांचं पितृछत्र हरपलं. त्यानंतर त्यांची काकांनी त्यांना सांभाळलं. मात्र त्यांचा आधारही त्यांना फार काळ मिळाला नाही. वयाच्या 13 व्या वर्षी उमराव बेगम यांच्या विवाह झाला आणि ते दिल्लीत आले. त्यानंतरचं संपूर्ण आयुष्य दिल्लीतच गेलं. मुघल काळातील शेवटचा सत्ताधारी बहादुर शाह जफर याच्या दरबारात कवी म्हणूनही ते राहिले.

इश्क, मोहब्बत, वफा, लफ्ज... अशा असंख्य शब्दांमधून जगण्याचं तत्त्वज्ञान सांगणाऱ्या गालिब यांचं निधन वयाच्या 71 व्या वर्षी म्हणजे 15 फेब्रुवारी 1869 रोजी दिल्लीतील चांदनी चौक भागातील गली कासिम जानमध्ये झालं. आता या भागाला 'गालिब की हवेली' म्हटलं जातं. 

टॅग्स :googleगुगलDoodleडूडल