शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर आमदारकीचा राजीनामा देईन; आमदार मंदा म्हात्रेंचं गणेश नाईकांना चॅलेंज, भाजपात वाद पेटला
2
'बॅटल ऑफ गलवान'च्या टीझरमुळे चीन संतापला; म्हणाले,'भारतीय सैन्याने आधी सीमा ओलांडली...
3
'या' मेटल शेअरमध्ये सलग आठव्या दिवशी विक्रमी तेजी; पाहा काय आहे या ऐतिहासिक तेजीचं कारण
4
२०२५ मध्ये भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी उलथापालथ; मुकेश अंबानी कमाईत अव्वल
5
मराठवाड्यात युतीत फूट; संभाजीनगरनंतर जालना, नांदेड अन् परभणीत भाजप-शिंदेसेना-NCP स्वतंत्र लढणार
6
चहा १० रुपये, वडापाव २० रुपये! विमानतळावर आता मिळणार रेल्वे दरात नाश्ता; कसा घ्यायचा लाभ?
7
मुंबईत मनसेमध्ये बंडखोरी, नाराज अनिशा माजगावकर यांनी प्रभाग क्र. ११४ मधून भरला अपक्ष उमेदवारी अर्ज 
8
'अश्रू, आक्रोश अन् उद्रेक'; तिकीट नाकारल्याने निष्ठावंतांचा संभाजीनगर भाजप कार्यालयात राडा
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; Silver ₹३९७३ नं घसरली, Gold किती झालं स्वस्त? पटापट पाहा रेट्स
10
"धमक्या मिळाल्या आणि..." आमिर खानबद्दल भाचा इमरान खानचा खळबळजनक खुलासा
11
वैमानिकांची पळवापळवी! जॉइनिंगसाठी थेट ५० लाखांची ऑफर; इंडिगो आणि एअर इंडियामध्ये चुरस
12
नाशिकमध्ये थरार! AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या कारचा पाठलाग, भाजपा इच्छुकांचा कारनामा
13
“बहुजन विकास आघाडीचा वसई-विरार निवडणुकीतही पराभव करू, आमचाच महापौर होईल”: स्नेहा दुबे पंडित
14
शक्तिप्रदर्शन करत आला, पण अर्जच विसरला! धापा टाकत कार्यकर्ता अखेर अर्ज घेऊन आला
15
२०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा...
16
VIDEO: 'धुरंधर' फिव्हर सुरूच! चिमुरडीचा FA9LA गाण्यावरील जबरदस्त डान्स सोशल मीडियावर VIRAL
17
Amit Shah : Video - "बंगालमधील घुसखोरी संपवणार, प्रत्येकाला शोधून बाहेर काढणार", अमित शाह कडाडले
18
एचआयव्ही पॉझिटिव्ह कर्मचाऱ्याला दिलासा; नोकरी कायम करण्याचे हायकाेर्टाने दिले निर्देश
19
"पक्षासाठी केसेस अंगावर, तिकीट मात्र दुसऱ्यांना"; संभाजीनगरात भाजप पदाधिकाऱ्यांचा राडा
20
मनपा निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंच्या किती संयुक्त सभा होणार?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधी फेसबुक युजर्सचा डेटा अ‍ॅमेझॉन क्लाउड सर्व्हरवर लीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 11:24 IST

फेसबुकच्या कोट्यवधी युजर्सचा डेटा अ‍ॅमेझॉनच्या क्लाउड कम्प्युटिंग सर्व्हरवर लीक झाला आहे, असं संशोधकांचं म्हणणं आहे. 

ठळक मुद्देफेसबुकच्या कोट्यवधी युजर्सचा डेटा अ‍ॅमेझॉनच्या क्लाउड कम्प्युटिंग सर्व्हरवर लीक झाला आहे, असं संशोधकांचं म्हणणं आहे. फेसबुकसाठी काम करणाऱ्या अन्य दोन कंपन्यांनी (थर्ड पार्टी) युजरचा डेटा अ‍ॅमेझॉनच्या सर्व्हरवर स्टोर केला आहे. तो डेटा सहजपणे इतरांना डाउनलोड करता येऊ शकतो. एका कंपनीने 146 गीगाबाइट डेटा गोळा केला आहे. त्यात 540 मिनियन म्हणजेच 54 कोटी युजर्सच्या लाइक्स, कॉमेंट आणि अकाऊंटचा समावेश आहे.

नवी दिल्ली - फेसबुकच्या करोडो युजर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. 60 कोटी युजर्सचा पासवर्ड फेसबुकमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती पडला त्यामुळे युजर्सची प्रायव्हसी धोक्यात आली होती. युजर्सचा डेटा चोरीला गेल्याची बाब समोर असतानाच आता फेसबुक पुन्हा एकदा याच कारणामुळे चर्चेत आलं आहे. फेसबुकच्या कोट्यवधी युजर्सचा डेटा अ‍ॅमेझॉनच्या क्लाउड कम्प्युटिंग सर्व्हरवर लीक झाला आहे, असं संशोधकांचं म्हणणं आहे. 

सायबर स्पेस कंपनी अपगार्डच्या वृत्तानुसार, फेसबुकसाठी काम करणाऱ्या अन्य दोन कंपन्यांनी (थर्ड पार्टी) युजरचा डेटा अ‍ॅमेझॉनच्या सर्व्हरवर स्टोर केला आहे. तो डेटा सहजपणे इतरांना डाउनलोड करता येऊ शकतो. त्यातील एका कंपनीने 146 गीगाबाइट डेटा गोळा केला आहे. त्यात 540 मिनियन म्हणजेच 54 कोटी युजर्सच्या लाइक्स, कॉमेंट आणि अकाऊंटचा समावेश आहे. किती युजर्सच्या डेटाचा यामध्ये समावेश आहे याबाबत नेमकी आकडेवारी अद्याप समजू शकलेली नाही. तर दुसऱ्या अ‍ॅपने 22 हजार फेसबुक युजरचे 'अनप्रोटेक्टेड' पासवर्ड स्टोर केले आहेत. 

अपगार्डच्या सायबर रिस्क रिसर्चचे डायरेक्टर ख्रिस विकरी यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व डेटा फेसबुक इंटिग्रेशनद्वारे गोळा करण्यात आला आहे. फेसबुक कंपनी इतर कंपन्यांना (थर्ड पार्टी) एखादे अ‍ॅप किंवा वेबसाइटवर आपल्या माध्यमातून साइन इन करण्याची परवानगी देते. त्यामुळे युजर्सना डेटा सुरक्षित ठेवण्याची हमी देण्याचा कोणताही पर्याय फेसबुककडे शिल्लक राहत नाही. फेसबुकच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'युजर्सचा डेटा सार्वजनिक डेटाबेसवर स्टोर करणे फेसबुकच्या धोरणांविरोधात आहे. यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर तात्काळ अ‍ॅमेझॉनशी संपर्क साधून डेटा हटवण्यात आला. युजरचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.' मात्र याबाबत अ‍ॅमेझॉनने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

Facebook ने चुकून मार्क झुकेरबर्गच्याच पोस्ट केल्या डिलीट काही दिवसांपूर्वी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गच्या काही जुन्या पोस्ट डिलीट झाल्याची माहिती समोर आली होती. फेसबुकने आपल्या पोस्टमध्ये टीमकडून चुकून डिलीट झाल्याचे स्पष्ट केले होते. फेसबुकडून आता मार्क झुकेरबर्ग याच्या 2007 आणि 2008 या दोन वर्षांतील काही पोस्ट डिलीट झाल्या आहेत. त्यामुळे झुकेरबर्ग याचे अकाऊंट सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य युजर्सचं काय, असा सवाल युजर्सकडून विचारला जात आहे. दरम्यान या सर्व पोस्ट चुकून डिलीट झाल्या असून त्या कंपनीच्या ब्लॉग किंवा न्युजरूममध्ये मिळू शकतील अशी माहिती फेसबुकच्या प्रवक्त्याने दिली होती.

Facebook अकाऊंट दुसरं कोणी लॉग इन करेल याची भीती वाटते?; 'हे' फीचर करणार अलर्टफेसबुक युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. फेसबुक काही वेळा चुकून लॉग इन राहीलं तर अनेकदा त्याचा चुकाचा वापर केला जाण्याची शक्यता ही अधिक असते. मात्र फेसबुकमध्ये एक असं फीचर आहे ज्याच्या मदतीने युजर्स अकाऊंट सुरक्षित ठेवू शकतात. Facebook च्या सेटिंग में Extra Security देण्यासाठी युजर्सना एक फीचर देण्यात आले आहे.

- फेसबुकने दिलेले हे फीचर अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी सर्वप्रथम आपलं फेसबुक अकाउंट ओपन करा. 

- ओपन केल्यानंतर उजव्या बाजूला तीन डॉट दिसतील त्यावर क्लिक करा. 

- क्लिक केल्यानंतर सेटींगचा एक पर्याय मिळेल. त्यावर क्लिक केल्यास एक नवं पेज ओपन होईल. 

- मल्टीपल ऑप्शन त्यामध्ये देण्यात आलेले असतील. त्यातील  Security & Login वर जा.

- थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर ‘Setting Up Extra Security’ चा एक पर्याय मिळेल त्यावर क्लिक करा. 

-  ‘Get Alerts about unrecognized logins’ हा पर्याय दिसेल. तसेच त्याच्यासमोर Edit चे बटण असणार आहे. 

- पर्यायावर क्लिक केल्यानंतर तेथे ‘Notification’, ‘Messenger’ आणि ‘Email’ हे तीन पर्याय दिसतील. 

- तिन्ही पर्यायासमोर ‘Get Notifiation’ आणि ‘Don’t Get Notifiation’ असे आणखी दोन पर्याय दिसतील.  

- यामध्ये युजर्सना  ‘Get Notifiation’ वर टिक करून Enable करावं लागेल. त्यानंतर Save Changes वर क्लिक करा.

फेसबुक संदर्भातील ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीने तुमचं फेसबुक अकाऊंट लॉग इन केलं तर तुम्हाला त्याबाबत अलर्ट दिला जाईल.  

 

टॅग्स :Facebookफेसबुकamazonअ‍ॅमेझॉनtechnologyतंत्रज्ञान