शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

सॅमसंगच्या गॅलेक्सी एस ९ व एस ९ प्लसची मायक्रोसॉफ्ट आवृत्ती

By शेखर पाटील | Updated: March 13, 2018 12:10 IST

सॅमसंग कंपनीने अलीकडेच सादर केलेल्या गॅलेक्सी एस ९ आणि गॅलेक्सी एस९ प्लस या दोन उच्च श्रेणीतील स्मार्टफोन्सची मायक्रोसॉफ्ट स्पेशल एडिशन सादर केली आहे.

सॅमसंग कंपनीने अलीकडेच सादर केलेल्या गॅलेक्सी एस ९ आणि गॅलेक्सी एस९ प्लस या दोन उच्च श्रेणीतील स्मार्टफोन्सची मायक्रोसॉफ्ट स्पेशल एडिशन सादर केली आहे. काही महिन्यांपूर्वी सॅमसंग गॅलेक्सी एस ८ या मॉडेलची मायक्रोसॉफ्ट एडिशन लाँच करण्यात आली होती. आता याच प्रकारे गॅलेक्सी एस ९ व एस ९ प्लस या मॉडेल्सची याच प्रकारातील आवृत्ती ग्राहकांना उपलब्ध केली आहे. नावातच नमूद असल्यानुसार यात मायक्रोसॉफ्ट कंपनीचे विविध टुल्स प्रिलोडेड अवस्थेत देण्यात आलेले आहेत. यात मायक्रोसॉफ्ट लाँचरसह या कंपनीच्या एक्सेल, वर्ड, पॉवरपॉइंट, स्काईप, वन नोट, कोर्टना आदींचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे या दोन्ही मॉडेल्सच्या मायक्रोसॉफ्ट एडिशनमध्ये मूळ आवृत्तीचे सर्व फिचर्स असतील. अगदी हे स्मार्टफोन्स अँड्रॉइडच्या ओरियो आवृत्तीवर चालणारे असतील. मात्र यात मायक्रोसॉफ्टचे विविध अ‍ॅप्स देण्यात आलेली असतील.

फिचर्सचा विचार केला असता, सॅमसंग गॅलेक्सी एस९ या मॉडेलमध्ये ५.८ इंच आकारमानाचा आणि क्युएचडी प्लस या क्षमतेचा १८:५:९ अस्पेक्ट रेशो असणारा सुपर अमोलेड डिस्प्ले आहे. याची रॅम ४ जीबी असून यात ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तर सॅमसंग गॅलेक्सी एस९ प्लस या मॉडेलमध्ये ६.२ इंच आकारमानाचा आणि क्युएचडी प्लस या क्षमतेचा १८:५:९ अस्पेक्ट रेशो असणारा सुपर अमोलेड डिस्प्ले आहे. याची रॅम ६ जीबी असून यात ३,५०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. दोन्हींचे व्हेरियंट ६४/१२८/२५६ या इनबिल्ट स्टोअरेजच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येतील. हे स्टोअरेज ४०० जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. हे स्मार्टफोन्स वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ आहेत. या दोन्ही मॉडेल्समध्ये अतिशय उत्तम दर्जाचे कॅमेरे प्रदान करण्यात आले आहेत. यातील गॅलेक्सी एस ९ या मॉडेलच्या मागील बाजूस १२ मेगापिक्सल्सचा ड्युअल पिक्सल या प्रकारातील कॅमेरा आहे. यातील अपार्चर एफ/१.५ या क्षमतेचे आहे. हे अपार्चर डिजीटल पध्दतीने एफ/२.४ पर्यंत वाढविता येते. यात कमी उजेड असल्यास एफ/१.५ अपार्चरने तर विपुल उजेडात एफ/२.४ अपार्चरने छायाचित्रे घेता येतात. या कॅमेर्‍यांच्या अ‍ॅपमध्ये बिक्सबी व्हिजन हे फिचर दिले आहे. याच्या अंतर्गत काढलेल्या प्रतिमांमधील विविध फलक तसेच अन्य शब्दांच्या अनुवादाची सुविधा दिली आहे. तर या दोन्ही मॉडेल्समध्ये ऑटो-फोकस आणि एफ/१.७ अपार्चरयुक्त ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. भारतात ही नवीन आवृत्ती लवकरच सादर होऊ शकते.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानsamsungसॅमसंगMobileमोबाइल