mi fan fest sale to start from 8 april chances to buy tv and smartphones at 1rs | अवघ्या 1 रुपयात स्मार्टफोन, टीव्ही खरेदीची संधी; Mi Fan Fest सेल 8 एप्रिलपासून सुरू होणार 

अवघ्या 1 रुपयात स्मार्टफोन, टीव्ही खरेदीची संधी; Mi Fan Fest सेल 8 एप्रिलपासून सुरू होणार 

ठळक मुद्देMi Fan Fest 2021 सेलमध्ये अनेक प्रोडक्ट्सवर डिस्काऊंट आणि ऑफर्स देण्यात येणार आहेत.

Mi Fan Fest सेल भारतात Xiaomi च्या वेबसाइटवर 8 एप्रिलपासून सुरु होणार आहे. कंपनीने या सेलची घोषणा केली आहे. Mi Fan Fest 2021 सेलमध्ये अनेक प्रोडक्ट्सवर डिस्काऊंट आणि ऑफर्स देण्यात येणार आहेत. यामध्ये स्मार्ट टीव्ही, फोन, लॅपटॉप आणि एक्सेसरीजचा समावेश आहे. mi.com वर Mi Fan Fest 2021 सेल सहा दिवसांसाठी असणार आहे. (mi fan fest sale to start from 8 april chances to buy tv and smartphones at 1rs)

Mi Fan Fest 2021 सेलमध्ये कंपनी Cultfit, MakeMyTrip, Zoomcar आणि The Man Company च्या 10,000 रुपयांपासून अधिकचे गिफ्ट व्हाऊचर सुद्धा देत आहे. Mi Fan Fest 2021 सेलमध्ये mi.com वर पॉप्युलर एक रुपयाचा फ्लॅश सेल पुन्हा आणला आहे. हा सेल 8 एप्रिलपासून ते 13 एप्रिलच्या संध्याकाळपर्यंत सुरू असणार आहे.

यामध्ये Mi 10i, Mi TV 4A 32 Horizon Edition, Redmi 9 Power, Mi Neckband, ब्ल्यूटूथ इअरफोन्सचा ग्राहकांना फायदा घेता येणार आहे. ग्राहक Xiaomi चे स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स आणि ऑडिओ डिव्हाइसवर 12,000 रुपयांपर्यंतचा सवलत मिळवू शकता. Mi Air Purifier 3 आणि स्मार्टफोन्स प्रोडक्ट्स खरेदीवर 4,499 रुपयांपर्यंत सूट मिळू शकतो.

या ऑनलाइन सेलमध्ये Mi Notebook Horizon 14 वर 13,000 रुपयांची सूट दिली जाणार आहे. Mi 10T Pro स्मार्टफोनवर सुद्धा 13,000 रुपयांची सवलत मिळणार आहे. Redmi Note 9 वर 8,000 रुपयांची सूट आहे, तर Mi TV 4A 108 cm (43) Horizon Edition वर 4,000 रुपयांच्या सवलतीची घोषणा करण्यात आली आहे. तसेच,  Redmi Earbuds S वर 1,100 रुपयांची सूट दिली जाणार आहे. या सवलतींशिवाय ICICI Bank, Axis Bank आणि HDFC Bank च्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर सुद्धा स्पेशल ऑफर दिली जाणार आहे.
 

Web Title: mi fan fest sale to start from 8 april chances to buy tv and smartphones at 1rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.