WhatsApp युजर्सना मोठा धक्का; ChatGPT चा वापर करू देणार नाही मेटा, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 12:47 IST2025-10-20T12:46:49+5:302025-10-20T12:47:40+5:30
WhatsApp युजर्स आता थर्ड-पार्टी एआय चॅटबॉट्स वापरू शकणार नाहीत.

WhatsApp युजर्सना मोठा धक्का; ChatGPT चा वापर करू देणार नाही मेटा, कारण...
WhatsApp युजर्स आता थर्ड-पार्टी एआय चॅटबॉट्स वापरू शकणार नाहीत. मेटाने नवी घोषणा केली आहे की, WhatsApp वर फक्त मेटा एआय असिस्टंटच वापरता येईल आणि इतर सर्व थर्ड-पार्टी एआय चॅटबॉट्सवर बंदी घातली जाईल. या निर्णयामुळे ओपनएआय आणि परप्लेक्स्टिी सारख्या कंपन्यांना मोठा धक्का बसेल, जे एआय रेसमध्ये मेटाला टक्कर देत आहेत. याचा अर्थ असा की, युजर्स आता फक्त WhatsApp वर मेटाचा एआय चॅटबॉट वापरू शकतील.
मेटाचा हा निर्णय पुढच्या वर्षी १५ जानेवारी रोजी लागू होईल. याचा अर्थ असा की १५ जानेवारीनंतर, चॅटजीपीटी आणि परप्लेक्सिटी एआयसारखे चॅटबॉट्स WhatsApp वर ऑपरेट करू शकणार नाहीत. यावर उपाय म्हणून मेटाने WhatsApp बिझनेस एपीआय अपडेट केलं आहे. अपडेट केलेल्या पॉलिसीत असं म्हटलं आहे की, जर एखादी कंपनी चॅटबॉट्सला त्यांची मेन सर्व्हिस म्हणून ऑफर करत असेल तर ती WhatsApp बिझनेस सोल्युशन वापरू शकत नाही.
मेटाने स्पष्ट केलं आहे की, या निर्णयाचा परिणाम ट्रॅव्हल कंपन्या आणि ई-कॉमर्स ब्रँडसह, ऑटोमेटेड कस्टमर सर्व्हिस बॉट्स आणि इतर मर्यादित पद्धती वापरणाऱ्या व्यवसायांवर होणार नाही. या निर्णयाचा थेट परिणाम AI स्टार्टअप्सवर होईल जे WhatsApp द्वारे ग्राहकांना चॅट-आधारित असिस्टंट देत आहेत. मेटाचं म्हणणं आहे की या ट्रेंडमुळे त्यांच्या पायाभूत सुविधा आणि सपोर्ट सिस्टमवर दबाव येत आहे.
WhatsApp स्पॅमला आळा घालण्यासाठी एक नवीन पाऊल उचलत आहे. या अंतर्गत, ते रिप्लाय न देणाऱ्या लोकांना पाठवल्या जाणाऱ्या मेसेजवर मंथली लिमिट घालू शकतं. हा निर्णय व्यवसायांना तसेच युजर्सना लागू होईल. पुढील काही आठवड्यात अनेक देशांमध्ये ट्रायल सुरू होईल.