iPhone 16: आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर २५००० रुपये वाचवा; कुठं मिळतोय इतका स्वस्त?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 16:30 IST2025-11-02T16:27:14+5:302025-11-02T16:30:41+5:30
iPhone 16 Plus Price Drop: आयफोन १६ प्लस खरेदी करण्यासाठी योग्य संधीच्या शोधात असाल तर, तुमच्यासाठी खरोखरच एक जबरदस्त ऑफर आहे.

iPhone 16: आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर २५००० रुपये वाचवा; कुठं मिळतोय इतका स्वस्त?
आयफोन १६ प्लस खरेदी करण्यासाठी योग्य संधीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी खरोखरच एक जबरदस्त ऑफर आली आहे. रिलायन्सच्या जिओमार्ट प्लॅटफॉर्मवर आयफोन १६ प्लस (१२८ जीबी) मॉडेलवर आतापर्यंतची सर्वात मोठी किंमत कपात जाहीर करण्यात आली, ज्यामुळे हा फोन आपल्या सर्वात कमी किमतीत उपलब्ध झाला आहे.
आयफोन १६ प्लस (१२८ जीबी) फोन ८९ हजार ९९० मूळ किमतीत लॉन्च झाला. परंतु, जिओमार्टवर हा फोन ६५ हजार ९९० रुपयांत उपलब्ध झाला. म्हणजेच ग्राहकांना या फोनच्या खरेदीवर २३ हजार ९१० रुपयांची सूट मिळत आहे. जिओमार्टने केवळ थेट सवलत दिली नाही. तर, निवडक बँक ऑफरसह किंमत आणखी कमी करण्याची संधी दिली.
एसबीआय को-ब्रँडेड प्लॅटिनम क्रेडिट कार्डधारक ईएमआयवर ५ टक्के कॅशबॅकचा लाभ घेऊ शकतात. या कॅशबॅकनंतर आयफोन १६ प्लसची प्रभावी किंमत ₹६४ हजार ९९० पर्यंत खाली येऊ शकते. याव्यतिरिक्त, तुमचा जुना स्मार्टफोन एक्स्चेंज केल्यास त्याच्या स्थितीनुसार आणि मॉडेलनुसार अतिरिक्त एक्स्चेंज बोनस मिळू शकतो, ज्यामुळे फोनची अंतिम किंमत आणखी कमी होईल.
ही विशेष डील केवळ जिओमार्ट वेबसाइट आणि ॲपवर थेट उपलब्ध आहे. ही ऑफर संपूर्ण भारतात उपलब्ध आहे. स्टॉक मर्यादित असल्यामुळे आणि सणासुदीच्या मागणीमुळे किमतीत किंचित चढ-उतार होण्याची शक्यता आहे. आयफोन १७ सिरीज लॉन्च झाल्यानंतर ॲपलने अधिकृत किमती कमी केल्या असल्या तरी, जिओमार्टने दिलेली ही सूट सर्वात मोठी आहे.