आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 15:15 IST2025-08-26T15:08:04+5:302025-08-26T15:15:04+5:30

iPhone 16 Plus Price Drop: आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. आयफोन १६ प्लस हा लॉन्चिंग किंमतीपेक्षा २२ हजारांनी स्वस्त मिळत आहे. 

Massive Discount On iPhone 16 Pl | आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

जगभरात आयफोनची क्रेझ आहे. परंतु, आयफोनच्या किंमतीमुळे अनेकजण हा स्मार्टफोन खरेदी करण्याचे टाळतात. पुढील महिन्यात आयफोन १७ सीरिज लॉन्च होणार असल्याची माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर आयफोन १६ प्लस परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध झाला आहे. इलेक्ट्रॉनिक शॉप विजय सेल्सवर आयफोन १६ प्लस हा मूळ किंमतीपेक्षा २२ हजारांनी स्वस्त मिळत असून त्यावर बँक ऑफर आणि ईएमआय पर्याय देखील उपलब्ध आहेत. ही ऑफर मर्यादीत काळासाठी आहे.

आयफोन १६ प्लसची (१२८ जीबी) मूळ किंमत  ८९ हजार ९०० रुपये आहे. परंतु, हा फोन विजय सेल्सवर १६ प्लस ६७ हजार ९०० रुपयांना उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, ग्राहकांना एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवर ३ हजार ५०० रुपयांची सूट मिळत आहे. शिवाय, २४ महिन्यांसाठी ३ हजार २९२ रुपयांपासून सुरू होणारा ईएमआय पर्याय उपलब्ध आहे. याचबरोबर ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवरही आयफोनच्या खरेदीवर मोठी सवलत दिली जात आहे.

अ‍ॅपल आयफोन १६ प्लसमध्ये ६.७-इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर ओएलइडी डिस्प्ले मिळतो, ज्याचा पीक ब्राइटनेस २००० निट्स आहे. आयफोन १६ प्लसमध्ये ग्राहकांना ड्युअर कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यात ४८ मेगापिक्सेलचा प्राइमरी सेन्सर आणि १२ मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड लेन्स देण्यात आली. तर,  सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १२ मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतो.

Web Title: Massive Discount On iPhone 16 Pl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.