शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Facebook, Instagram युजर्सना करता येणार छप्परफाड कमाई; मार्क झुकेरबर्गची घोषणा, जाणून घ्या कसं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 17:11 IST

Facebook, Instagram : फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मोठी कमाई करण्याची संधी मिळणार आहे. कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी स्वतः याबाबत माहिती दिली. यासोबतच या माध्यमातून कमाई करण्याच्या काही पद्धती देखील सांगितल्या आहेत.  

नवी दिल्ली - Facebook आणि Instagram क्रिएटर्ससाठी आता एक खूशखबर आहे. युजर्सना यामार्फत आता छप्परफाड कमाई करता येणार आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मोठी कमाई करण्याची संधी मिळणार आहे. कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी स्वतः याबाबत माहिती दिली. यासोबतच या माध्यमातून कमाई करण्याच्या काही पद्धती देखील सांगितल्या आहेत.  

मार्क झुकेरबर्ग यांनी एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, कंपनी 2024 पर्यंत फेसबुक आणि इन्स्टाग्राम क्रिएटर्सकडून कोणत्याही प्रकराचा रेवेन्यू घेणार नाही. यामध्ये पेड ऑनलाईन इवेंट, सब्सक्रिप्शन, बॅज आणि बुलेटिनचा समावेश आहे. तसेच क्रिएटर्सना या दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पैसे कमवण्याच्या नव्या पद्धतीची देखील माहिती दिली आहे. कंपनीने कंटेट क्रिएटर्ससाठी पाच नवीन फीचर्स घोषणा केली आहे

Interoperable Subscriptions

Interoperable Subscriptions हे फीचर क्रिएटर्सना त्यांच्या पे करणाऱ्या सब्सक्राइबर्सना इतर प्लॅटफॉर्मवर Facebook Only ग्रुपमध्ये सहभागी करण्यास परवानगी देईल.

Facebook Stars

कंपनी स्टार्स नावाचे त्यांचे टिपिंग फीचर सर्व पात्र क्रिएटर्ससाठी उघडत आहे जेणेकरून अधिक लोक त्यांच्या रील, थेट किंवा VOD व्हिडिओमधून कमाई करण्यास सुरुवात करू शकतील.

Monetizing Reels

कंपनी Facebook वर अधिक क्रिएटरसाठी Reels Play बोनस प्रोग्राम उघडत आहे. क्रिएटर्सना Instagram रील्स Facebook वर क्रॉस-पोस्ट करून तिथे मॉनिटाइज करू शकता.

Creator Marketplace

इन्स्टाग्रामवर अशा सेट प्लेसची चाचणी सुरू आहे जिथे क्रिएटर्सना शोधले जाऊ शकते आणि पैसे दिले जाऊ शकतात. जेथे ब्रँड नवीन भागीदारीच्या संधी शेयर करू शकतात.

Digital Collectibles

Instagram वर NFT डिस्प्लेसाठी सपोर्ट विस्तारत आहे. "आम्ही हे फीचर लवकरच Facebook वर आणणार आहोत. जेणेकरून लोक इन्स्टाग्राम आणि Facebook वर क्रॉस-पोस्ट करू शकतील असं मार्क झुकेरबर्ग यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 

टॅग्स :FacebookफेसबुकInstagramइन्स्टाग्रामMark Zuckerbergमार्क झुकेरबर्ग