FB वर लॉग इन करताना विचित्र फोटो दिसले, तर घाबरू नका!... जाणून घ्या नेमकं झालंय काय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 07:20 PM2022-12-16T19:20:08+5:302022-12-16T19:37:04+5:30

फेसबुकवर लॉग इन करता येत नसल्याची तक्रार अनेक युजर्सनी केली आहे.

Many users have complained about not being able to login to Facebook. | FB वर लॉग इन करताना विचित्र फोटो दिसले, तर घाबरू नका!... जाणून घ्या नेमकं झालंय काय

FB वर लॉग इन करताना विचित्र फोटो दिसले, तर घाबरू नका!... जाणून घ्या नेमकं झालंय काय

Next

नवी दिल्ली: आज सकाळपासून (१६ डिसेंबर) युजर्सना फेसबुकवर विचित्र समस्येला तोंड द्यावे लागत आहे. फेसबुकवर लॉग इन करता येत नसल्याची तक्रार अनेक युजर्सनी केली आहे. तसेच ॲप उघडल्यानंतर युजर्सना सामाजिक मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा मेसेज येत आहे आणि त्यांना पुन्हा लॉग इन करण्यास सांगितले जात आहे. फेसबुकमधील 'बग'मुळे सदर प्रकार होत असल्याचं सांगितलं जात आहे. 

युजर्सच्या म्हणण्यानुसार, फेसबुक ॲप ओपन केल्यावर त्यांना सांगण्यात आले, "तुम्ही जी पोस्ट केले आहे ते आमच्या प्लॅटफॉर्मच्या मानकांशी जुळत नाही असे दिसते." तसेच काही विचित्र चित्र देखील दिसत आहे. त्यानंतर युजर्सना पुन्हा लॉग इन करण्यास सांगितले जात आहे. मात्र, पुन्हा लॉग इन केल्यानंतरही अनेक त्रुटी दिसून येत आहेत, ज्यामध्ये पेज लोड न होण्याच्या समस्येचा देखील समावेश आहे.

ॲप वापरताना समस्या-

सदर समस्या फेसबुक ॲपमध्ये तसेच फेसबुकच्या वेबसाइटवर पाहायला मिळत आहे. मात्र सुरुवातीला ही समस्या फक्त फेसबुकच्या मोबाईल ॲपवरच जाणवत होती. मात्र आता ती फेसबुकच्या वेबसाइटवर देखील दिसून येत आहे. सदर प्रकारावर फेसबुकने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली, तरी बगमुळे ही समस्या निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. 

वारंवार लॉगआऊट-

युजर्सचे म्हणणे आहे की, फेसबुकवरील या बगमुळे, लॉग इन करताना वारंवार ओटीपी मागितला जात आहे. तसेच लॉग इन केल्यानंतरही युजर्सचे अकाउंट लॉगआऊट होत आहे.

मार्क झुकेरबर्ग यांनाही बसला होता फटका-

गेल्या महिन्यात देखील फेसबुकवरील बगचा सामना युजर्सना करावा लागला होता. तसेच गेल्यावेळी सदर प्रकरणाचा फटका मेटा कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनाही बसला होता. तेव्हा मार्क झुकेरबर्ग यांचे फेसबुकवर फक्त ९,९९३ फॉलोअर्स असल्याचे दिसून येत होते. 

Web Title: Many users have complained about not being able to login to Facebook.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.