शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

स्मार्ट फोन चार्जिंगबाबत अनेक अफवा; वाचा काय खरे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 22:27 IST

वीज प्रवाहामुळे फोनची बॅटरी खराब होईल किंवा वारंवार चार्ज केल्याने खराब होईल अशी भीती सारखी वाटत राहते. याबाबत बऱ्याचदा सल्लेही ऐकायला मिळतात.

एखाद्या प्रवासावेळी स्मार्ट फोनची बॅटरी अचानक संपली तर मिळेल त्या चार्जर किंवा पॉवर बँकने ती चार्ज करावी लागते. परंतू, त्यातून निघणाऱ्या वीज प्रवाहामुळे फोनची बॅटरी खराब होईल किंवा वारंवार चार्ज केल्याने खराब होईल अशी भीती सारखी वाटत राहते. याबाबत बऱ्याचदा सल्लेही ऐकायला मिळतात. चला पाहूया काय खरे आहे ते. 

वारंवार चार्ज करणे एखाद्याला सवय असते की फोनची बॅटरी थोडीजरी कमी झाली तरीही फोन पुन्हा चार्जिंगला लावणे. बाहेर जायचे असल्यास बॅटरी अर्धी संपलेली असल्यास आपण दिवसातून एकदा तरी चार्जिंगला लावतोच. अशी वारंवार बॅटरी चार्ज केल्यास ती लवकर खराब होते, असे सांगितले जाते. खरे म्हणजे लिथिअम आयनच्या बॅटरीचे चार्जिंग सायकल ही काही लाखांत असते. म्हणजेच काही लाख वेळा ती चार्ज करता येते. आपण साधारण 2 ते 3 वर्षे मोबाईल वापरतो. यानंतर तो मोबाईल जुनाट होऊन जातो. दिवसातून तीन वेळा जरी बॅटरी चार्ज केल्यास ती लाख सायकलही पूर्ण करत नाही. यामुळे बॅटरी खराब होत नाही. 

चार्जिंगवेळी मोबाईल तापतो...लिथियम-आयन बॅटरी ही 32 डीग्री फॅरनहाईट तापमानापेक्षा कमी तापमानामध्ये चार्ज करू नये. वारंवार कमी तापमानात चार्ज केल्यास अॅनोडवर लिथियम-आयनचा थर बनतो. त्याला हटविता येत नाही. यामुळे बॅटरीचे आयुष्य घटते. यामुळे मोबाईल चार्ज करत असताना तापणे ही बॅटरीच्या आयुष्यासाठी चांगलेच असते. 

दुसऱ्या चार्जरद्वारे चार्जिंगनव्या मोबाईलमधील बॅटरीमध्ये त्याला सुरक्षित ठेवणारी यंत्रणा असते, जी बॅटरीला झेपू शकेल एवढाच विजेचा भार घेते. यामुळे जादा पावरच्या चार्जरद्वारे कमी पावरचा फोन चार्ज केल्यास त्याचा कोणताही परिणाम बॅटरीवर होत नाही. हा फोन त्याच्या ताकदीनुसार वीज घेतो. तसेच कमी पावरच्या चार्जरने जादा पावरचा फोन चार्ज केल्यासही काही परिणाम होत नाही. केवळ हळू चार्ज होते. यामुळे आयफोनलाही अँड्रॉईडचा चाजर दुसऱ्या केबलद्वारे लागू शकतो. 

अतिचार्जिंगमुळे स्फोट होतोअतिचार्जिंग केल्यामुळे बॅटरीचा स्फोट होतो असा समज आहे. मात्र, एकदा फोनची बॅटरी 100 टक्के चार्ज झाली की ती चार्ज होणे बंद करते. यामध्ये एक चीप बसवलेली असते जी अतिचार्जिंग होण्यापासून वाचवते. मात्र, रात्रभर चार्जिंगला लावल्यास फोन गरम होऊन बॅटरीचे आयुष्य घटू शकते. 

नवीन फोन फुल चार्ज करायलाच हवा का?नवीन फोन पहिल्यांदाच पूर्ण चार्ज करण्यास सांगितले जाते. मात्र, ही बाब पाच, सहा वर्षांपूर्वी होती. आता नव्या तंत्रज्ञानाने युक्त लिथियम आयन बॅटरी आल्या आहेत. या बॅटरींना पूर्ण चार्ज करण्याची गरज भासत नाही. 

पूर्ण संपल्यावर चार्जिंगला लावणेबॅटरी पूर्ण संपल्यानंतर बरेचजण बॅटरी चार्ज करतात. मात्र, असे केल्याने बॅटरीतील आयन कमजोर होतात. यामुळे 30 टक्क्यांवर बॅटरी असताना मोबाईल चार्जिंगला लावणे योग्य ठरेल.

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानApple IncअॅपलAndroidअँड्रॉईड