DeepSeek नंतर चीनने लॉन्च केले नवीन Ai असिस्टंट 'Manus', काय आहे खास? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 19:59 IST2025-03-12T19:58:23+5:302025-03-12T19:59:16+5:30

Manus AI Assistant: चीनमध्ये नवीन शक्तिशाली Ai टूल 'Manus' सध्या चर्चेत आहे.

Manus AI Assistant: After Deepseek, China launches new AI assistant 'Manus' | DeepSeek नंतर चीनने लॉन्च केले नवीन Ai असिस्टंट 'Manus', काय आहे खास? जाणून घ्या...

DeepSeek नंतर चीनने लॉन्च केले नवीन Ai असिस्टंट 'Manus', काय आहे खास? जाणून घ्या...

Manus AI Assistant: काही दिवसांपूर्वीच चीनचे DeepSeek Ai लॉन्च झाले आणि जगभरात खळबळ उडाली. चीनचे हे Ai, ChatGPT आणि Gemini सारख्या Ai प्लॅटफॉर्मला टक्कर देत आहे. दरम्यान, आता चीनमध्ये आणखी एक शक्तिशाली Ai टूल 'Manus' तयार करण्यात आले आहे. हे नवीन Ai एजंट साध्या चॅटबॉटपेक्षा अधिक उपयुक्त मानले जात आहे. शेअर बाजाराचे विश्लेषण करण्यापासून ते सहलींसाठी वैयक्तिक मार्गदर्शक पुस्तिका तयार करण्यापर्यंत...अनेक कामांमध्ये हे सक्षम असल्याचा दावा केला जातोय. 

'Manus' कसे काम करते?
चायनीज स्टार्टअप बटरफ्लाय इफेक्टने हे 'Manus' Ai लॉन्च केले आहे. कंपनीचे सह-संस्थापक यिचाओ पीक जी यांनी या Ai ne मानव आणि मशीन सहकार्याचे एक नवीन युग म्हटले आणि याला कृत्रिम बुद्धिमत्ता (Ai) च्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले.

सध्या हे Ai टूल फक्त इनव्हाइटद्वारे उपलब्ध आहे, परंतु असे असूनही त्याचा अधिकृत डिस्कॉर्ड सर्व्हर 1.7 लाखांहून अधिक सदस्यांपर्यंत पोहोचला आहे. याचे नाव लॅटिन शब्द "Mens et Manus" वरुन घेतला आहे. याचा अर्थ "मन आणि हात" असा आहे. हे ज्ञान आणि व्यावहारिक अनुप्रयोगाच्या संयोजनाचे प्रतीक आहे.

'Manus' इतर एआय टूल्सपेक्षा वेगळे कसे आहे?
सिंगापूरच्या एस. राजरत्नम स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज (RSIS) चे संशोधक मनोज हरजानी यांच्या मते, Manus इतर चॅटबॉट्सपेक्षा चांगले आहे, कारण ते युजरच्या वतीने स्वायत्तपणे कार्य करू शकते. तर DeepSeek आणि ChatGPT केवळ चॅट इंटरफेसमध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात. Manus तिकीट बुकिंग स्वयंचलित करू शकते, फिल्टरिंग आणि इतर रिअल-टाइम कार्येदेखील पुन्हा सुरू करू शकते. 

Ai सेन्सॉरशिप आणि संवेदनशील मुद्दे
DeepSeek ला चिनी सरकारच्या धोरणांनुसार उत्तरे देण्यासाठी प्रोग्रॅम केले गेले होते, परंतु Manus सेन्सॉर न करता निष्पक्ष उत्तरे देण्यास सक्षम आहे. 1989 च्या तियानमेन स्क्वेअर घटनेबद्दल जेव्हा मानुसला प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने "लोकशाही समर्थक आंदोलकांच्या विरोधात चीन सरकारने केलेली हिंसक कारवाई" असे वर्णन केले आणि घटनेचे तपशीलवार वर्णन केले. 

Web Title: Manus AI Assistant: After Deepseek, China launches new AI assistant 'Manus'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.