ट्रेनमध्ये मोबाईल चोरीला गेलाय किंवा हरवलाय? टेन्शन नका घेऊ, सर्वात आधी करा 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 16:34 IST2026-01-21T16:33:55+5:302026-01-21T16:34:26+5:30

फोन चोरीला गेल्यावर तो परत मिळेल की, नाही यापेक्षा तो डेटा चुकीच्या हातात पडू नये, हे पाहणे अधिक महत्त्वाचे असते.

Lost or stolen mobile phone in the train? Don't stress, do this first | ट्रेनमध्ये मोबाईल चोरीला गेलाय किंवा हरवलाय? टेन्शन नका घेऊ, सर्वात आधी करा 'हे' काम

AI Generated Image

भारतीय रेल्वेने दररोज कोट्यवधी लोक प्रवास करतात. मात्र, या प्रवासादरम्यान मोबाईल चोरी होण्याच्या किंवा हरवण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडतात. आजच्या काळात मोबाईल म्हणजे केवळ बोलण्याचे साधन नसून, त्यात आपली बँक खाती, वैयक्तिक फोटो, व्हिडिओ आणि महत्त्वाचे दस्तऐवज असतात. अशा परिस्थितीत फोन चोरीला गेल्यावर तो परत मिळेल की, नाही यापेक्षा तो डेटा चुकीच्या हातात पडू नये, हे पाहणे अधिक महत्त्वाचे असते. जर तुमचाही फोन प्रवासात हरवला, तर न डगमगता खालील पावले तातडीने उचला.

सर्वात आधी करा 'हे' महत्त्वाचे काम 

फोन चोरीला गेल्याचे लक्षात येताच, सर्वात आधी आपले सिम कार्ड ब्लॉक करा. त्यानंतर केंद्र सरकारच्या 'Sanchar Saathi' या अधिकृत पोर्टलला भेट द्या. या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या फोनचा IMEI नंबर ब्लॉक करू शकता. एकदा का IMEI नंबर ब्लॉक झाला की, त्या फोनमध्ये कोणत्याही कंपनीचे सिम कार्ड चालणार नाही. यामुळे चोराला तुमच्या फोनचा वापर करता येणार नाही आणि ओटीपी अभावी तुमचे बँक खातेही सुरक्षित राहील. विशेष म्हणजे, जर फोन परत मिळाला तर तुम्ही याच साइटवरून तो अन-ब्लॉकही करू शकता.

घरबसल्या फोनमधील डेटा करा डिलीट 

तुमचा फोन तुमच्या हातात नसला, तरी तुम्ही त्यातील सर्व डेटा घरबसल्या नष्ट करू शकता.

अँड्रॉइड युजर्ससाठी: गुगच्या 'Find My Device' (android.com/find) या सुविधेचा वापर करा. येथे लॉग-इन करून तुम्ही तुमचा फोन शोधू शकता, लॉक करू शकता किंवा शेवटचा पर्याय म्हणून 'Erase Device' निवडून पूर्ण फोन फॉरमॅट करू शकता.

आयफोन युजर्ससाठी: आयफोन युजर्सनी iCloud (icloud.com/find) वर जाऊन आपला आयडी लॉग-इन करावा आणि 'Erase iPhone' हा पर्याय निवडावा. यामुळे तुमच्या वैयक्तिक फोटोंचा किंवा डेटाचा गैरवापर टाळता येईल.

सावधानता बाळगणे आवश्यक 

रेल्वे प्रवासात मोबाईल चोरी होऊ नये म्हणून तो खिडकीजवळ किंवा चार्जिंगला लावून गाढ झोपणे टाळावे. तरीही दुर्घटना घडल्यास, केवळ हळहळत न बसता तातडीने रेल्वे पोलिसांकडे तक्रार नोंदवा आणि वरील तांत्रिक उपाय करून आपला डेटा सुरक्षित करा. लक्षात ठेवा, फोन नवीन घेता येईल, पण डेटा आणि पैशांचे नुकसान भरून काढणे कठीण असते.

Web Title : ट्रेन में फोन खो गया? डेटा सुरक्षित करें, सिम ब्लॉक करें, तुरंत रिपोर्ट करें।

Web Summary : ट्रेन में फोन खो जाने पर तुरंत सिम ब्लॉक करें, पुलिस को रिपोर्ट करें और IMEI ब्लॉक करने के लिए सरकारी पोर्टल संचार साथी का उपयोग करें। Find My Device (Android) या iCloud (iPhone) के माध्यम से डेटा को दूर से मिटा दें। अपने डेटा और बैंक खातों को सुरक्षित रखें।

Web Title : Lost phone on train? Secure data, block SIM, report quickly.

Web Summary : Lost your phone on the train? Immediately block your SIM, report to police, and use government portal Sanchar Saathi to block IMEI. Remotely wipe data via Find My Device (Android) or iCloud (iPhone). Protect your data and bank accounts.