Lost Mobile Location Tracker: पेगासस पेक्षाही भयानक अॅप! चोराने मोबाईल बंद केला तरी लोकेशन कळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 16:01 IST2022-08-31T15:55:48+5:302022-08-31T16:01:28+5:30
फोन स्विच ऑफ केला तरी देखील तो ट्रॅक केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला कोणत्या पोलीस किंवा अन्य कायदेशीप बाबींची गरज नाही.

Lost Mobile Location Tracker: पेगासस पेक्षाही भयानक अॅप! चोराने मोबाईल बंद केला तरी लोकेशन कळणार
मोबाईल चोरीला गेला की तो ट्रॅक करणे खूप कठीण आहे. पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना सापडला तर ठीक, नाहीतर तो गेलाच म्हणून समजायचे. त्यापेक्षाही फोन शोधणे अशावेळी कठीण असते जेव्हा तो बंद केला जातो. परंतू आता त्यावरही तोड निघाला आहे.
फोन स्विच ऑफ केला तरी देखील तो ट्रॅक केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला कोणत्या पोलीस किंवा अन्य कायदेशीप बाबींची गरज नाही. बाजारात सध्या अनेक अॅप आहेत, जे काम करत नाहीत. परंतू एक अॅप असे आहे, जे काम करते. त्या अॅपचे नाव Track it EVEN if it is off असे आहे. हे हॅमर सिक्युरिटीने विकसित केले आहे. हे मोबाईल अॅप तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. हे सेटअप करणे देखील खूप सोपे आहे.
यासाठी तुम्हाला अॅप ओपन करून काही परवानग्या द्याव्या लागतील. यात डमी स्विच ऑफ आणि फ्लाइट मोडची सुविधा देखील आहे. यामुळे फोन स्वीच ऑफ केल्यानंतरही तो बंद होत नाही, तर चोराला फोन बंद झाल्याचे जाणवते.
फोनचे लाईव्ह लोकेशन कळेल
डिव्हाइसच्या सर्व अॅक्टिव्हिटी जसे की लोकेशन, सेल्फी आणि तुमच्या दिलेल्या आपत्कालीन नंबरवर फोन ज्याने चोरला आहे त्याची माहिती पाठवत राहते. फोनचे लाईव्ह लोकेशनही हे अॅप त्या नंबरवर पाठवते. तुम्हीही अँड्रॉइड फोन वापरत असाल तर हे तुमच्यासाठी खूप उपयुक्त अॅप आहे. गुगल प्ले स्टोअरवरही याला खूप चांगले रेटिंग देण्यात आले आहे. फोन चोरीला गेल्यास हे तुम्हाला खूप मदत करू शकेल.