Lokmat AI ची अद्भूत दुनिया: सर्च इंजिनमध्ये एआयची भूमिका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 21:55 IST2026-03-24T21:53:48+5:302026-03-24T21:55:52+5:30

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: हे शक्य झाले आहे फक्त एआयमुळे.

lokmat ai series the role of artificial intelligence in search engines | Lokmat AI ची अद्भूत दुनिया: सर्च इंजिनमध्ये एआयची भूमिका!

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: सर्च इंजिनमध्ये एआयची भूमिका!

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आपण रोज मोबाईल किंवा संगणकावर काहीही माहिती शोधताना सर्वांत आधी कोणाकडे जातो? उत्तर एकच- सर्च इंजिन. म्हणजेच, गुगल, बिंग, युट्युब सर्च इ. पण हे सर्च इंजिन आपल्याला इतकी अचूक, झटपट आणि योग्य माहिती कशी देतात ? यामागे काम करीत असतो आर्टिफिशियल इंटेलिजेन्श (एआय). पूर्वी सर्च इंजिन फक्त शब्द (कीवर्ड) जुळवून माहिती दाखवत होते. उदाहरणार्थ, 'पाणी' असा शब्द टाकला तर जिथे जिथे 'पाणी' शब्द आहे ते पेज आपल्याला दाखविले जायचे. पण, आज सर्च इंजिन आपण काय विचारतोय, का विचारतोय आणि आपल्याला नेमकं काय हवं आहे, हे समजून घेतात. हे शक्य झाले आहे फक्त एआयमुळे.

आपण काय म्हणतोय हे एआयला कसे समजते ?

आज आपण सर्च बॉक्समध्ये पूर्ण वाक्य लिहितो- उद्या पाऊस पडण्याची शक्यता आहे का?

एआयमध्ये असलेले नॅचरल लॅन्गवेज प्रोसेसिंग (एनएलपी) तंत्रज्ञान हे वाक्य समजून घेते. त्याला आपण टाकलेल्या एक-एक शब्दाचा अर्थ कळतो आणि त्यानुसार योग्य माहिती आपल्याला शोधून देत असतो.

योग्य उत्तर निवडण्याचं काम एआय कसं करते?

इंटरनेटवर लाखो वेबसाईट्स आहेत. पण सर्च इंजिन सर्वच दाखवत नाही, तर विश्वासार्ह, नवीन आद्ययावत, जास्त उपयुक्त अशी माहिती वर आणते. म्हणजेच पहिल्या पेजवर. हे काम एआय अल्गोरिदम करतात. कोणत्या वेबसाईटला जास्त लोक वाचतात, कोणती माहिती खरी आहे, याचा अंदाज एआय घेतो. मगच योग्य ती माहिती आपल्याला मिळते.

वैयक्तिक माहिती सर्च इंजिनवर कशी मिळते?

तुम्ही जर विद्यार्थी असाल आणि एआय म्हणजे काय ? शोधलं, तर सर्च इंजिन तुम्हाला अगदी सोप्या भाषेत, शैक्षणिक वेबसाइट्स, अभ्यासाचे आणि लेक्चरचे व्हिडिओ दाखवेल. मात्र, हाच शब्द एखाद्या इंजिनिअरने शोधला तर त्याला वेगळ्या प्रकारची माहिती मिळेल. त्याच्या सोईची. हे एआय तुमच्या शोध आणि सवयी ओळखून करीत असतं.

Smart Searching with Al-

Artificial Intelligence (Al) plays a vital role in modern search engines. It helps search engines understand the meaning and intent behind users' questions, not just keywords. By using technologies like Machine Learning and Natural Language Processing (NLP), search engines deliver fast, accurate, and personalized information to users.

Moral: Al makes searching easier, but choosing the right and trustworthy information is our responsibility

सर्च इंजिन म्हणजे फक्त शोध नाही, तर आपला मार्गदर्शक-आज सर्च इंजिन आपल्याला, अभ्यासात मदत करतात. करिअरचे वेगवेगळे पर्याय दाखवितात. नकाशा, हवामान, बातम्या देत असतात. आशा अनेक कामे सर्च इंजिन आपल्यासाठी करत असते. म्हणजेच, एआयमुळे सर्च इंजिन आपले डिजिटल शिक्षक बनले आहेत असे म्हणायला हरकत नाही.

आवाजावर आधारित सर्च आज 'OK Google' किंवा 'Hey Siri' बोलल्यावर लगेच आपल्याला उत्तर मिळतं. आपला आवाज ओळखणे, शब्दात बदलणे आणि अर्थ समजणे हे सगळं एआय मुळे शक्य आहे.

- अविनाश जाधव, (एआय आणि टेक एज्युकेटर)
 

Web Title : लोकमत एआई: अद्भुत दुनिया और सर्च इंजन में भूमिका!

Web Summary : एआई सर्च इंजन को शक्ति देता है, जो कीवर्ड से परे उपयोगकर्ता के इरादे को समझता है। एनएलपी जटिल प्रश्नों को समझने में सक्षम बनाता है। एआई एल्गोरिदम भरोसेमंद, अपडेट की गई जानकारी को प्राथमिकता देते हैं। व्यक्तिगत परिणाम व्यक्तिगत जरूरतों को पूरा करते हैं, खोज को एक डिजिटल शिक्षक में बदलते हैं।

Web Title : Lokmat AI: The amazing world and role in search engines.

Web Summary : AI powers search engines, understanding user intent beyond keywords. NLP enables understanding complex queries. AI algorithms prioritize trustworthy, updated information. Personalized results cater to individual needs, transforming search into a digital teacher.