Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आयओटी आणि एआय यांची मैत्री!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 07:07 IST2026-03-30T07:07:07+5:302026-03-30T07:07:07+5:30
Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आयओटी एकटा कार्यरत असला तर फक्त डेटा मिळतो आणि एआय एकटा असला की डेटा नसतो. दोघेही एकत्र आले की मशीन 'समजून' काम करीत असते.

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आयओटी आणि एआय यांची मैत्री!
Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आज आपण 'स्मार्ट वॉच', 'स्मार्ट टीव्ही', 'स्मार्ट होम' असे शब्द सहज वापरतो आणि ऐकतो. पण इंटरनेटला जोडलेली उपकरणे ही कल्पना अचानक निर्माण झालेली नाही. इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी) मागे जवळपास ४० वर्षांचा प्रवास आहे. आज आपल्या घरातील बल्ब, टीव्ही, घड्याळ, कॅमेरे, गाड्या, शेतीची उपकरणे हे सगळे इंटरनेटला जोडले जात आहेत. यालाच इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी) म्हणतात. पण हे उपकरण फक्त डेटा पाठवतात. विचार करत नाहीत.
विचार करण्याचे काम करते -आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय). म्हणजेच, आयओटी = डोळे आणि कान. एआय = मेंदू. दोघे एकत्र आले की मशीन 'स्मार्ट' बनते. एकूण काय तर आयओटी उपकरणे सेन्सर वापरून माहिती गोळा करतात. उदाहरणार्थ तापमान सेन्सर -तापमान मोजतात. कॅमेरा -फोटो किंवा व्हिडीओ घेतो. यांसह विविध कामे होतात.
आयओटी काय करते?
आयओटी उपकरणे सेन्सर वापरून माहिती गोळा करतात. उदा. तापमान सेन्सर - तापमान मोजतात.
कॅमेरा - फोटो / व्हिडीओ घेतो.
फिटनेस बॅण्ड - हृदयाचे ठोके मोजतो.
शेतातील सेन्सर - मातीतील ओलावा तपासतो. ही सर्व माहिती इंटरनेटवर पाठविली जाते.
एआय काय करते?
एआय त्या डेटाचा अभ्यास करून निर्णय घेते.
उदा. तापमान जास्त असल्यास - एसी आपोआप चालू होतो.
चोर दिसला की अलार्म वाजतो.
पिकाला पाणी कमी पडले की मोटर सुरू होते.
तुमची झोप खराब झाल्यास आरोग्य सूचना मिळतात.
दोघे एकत्र कसे काम करतात?
आयओटी सेन्सर डेटा गोळा करतो.
डेटा क्लाऊड / सर्व्हरला पाठवितो.
एआय डेटाचे विश्लेषण करतो.
एआय निर्णय घेतो.
आयओटी आधारित उपकरण कृती करतात. यालाच स्मार्ट ऑटोमेशन म्हणतात.
वास्तविक जीवनातील उदाहरणे
स्मार्ट घर - तुम्ही घरात
येण्याआधीच वीज आपोआप सुरु होते. तुमच्या सवयींनुसार पंख्याचा वेग बदलतो.
स्मार्ट शेती - माती कोरडी-
एआय मोटर चालू करतो. रोग ओळखून औषध सुचवितो.
स्मार्ट हॉस्पिटल - रुग्णाचा रक्तदाब वाढला की -डॉक्टरांना संदेश जातो.
स्मार्ट शहर - ट्रॅफिक जाम
ओळखून सिग्नल बदलतात.
कचरा भरला की गाडी आपोआप पाठवली जाते.
अभ्यासात आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्स) ची मदत
पूर्वी अभ्यास म्हणजे पुस्तक, वही आणि शिक्षक.
आज अभ्यास म्हणजे स्मार्ट क्लास, स्मार्ट बोर्ड, स्मार्ट पेन आणि स्मार्ट लर्निंग. हे शक्य झाले आहे आयओटी तंत्रज्ञानामुळे. आयओटी म्हणजे इंटरनेटला जोडलेली उपकरणे जी माहिती गोळा करतात आणि एकमेकांशी संवाद साधतात. शिक्षणात याचा मोठा बदल होत आहे.
From Connected Devices to Intelligent World IOT began as simple machines sharing status over the internet. Over time, cheaper sensors, cloud computing, and Al transformed it into a system where devices not only communicate but also act intelligently. Today, IOT is shaping smart homes, smart healthcare, and smart cities.
Moral The future is not about humans using machines. it is about machines understanding humans.
महत्त्वाची गोष्ट
आयओटी एकटा कार्यरत असला तर फक्त डेटा मिळतो आणि एआय एकटा असला की डेटा नसतो. दोघेही एकत्र आले की मशीन 'समजून' काम करीत असते.
- इंजि. अविनाश जाधव (एआय आणि टेक एज्युकेटर)