Lokmat AI ची अद्भूत दुनिया: "एआय"ची धमाकेदार एन्ट्री! कामाचा वेग, गुणवत्तेत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 12:39 IST2026-03-01T12:39:40+5:302026-03-01T12:39:40+5:30

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: येणाऱ्या काळात भारत एआयच्या बळावर नव्या शिखरावर झेपावेल यात शंका नाही.

lokmat ai series the entry of wonderful world of artificial intelligence | Lokmat AI ची अद्भूत दुनिया: "एआय"ची धमाकेदार एन्ट्री! कामाचा वेग, गुणवत्तेत वाढ

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: "एआय"ची धमाकेदार एन्ट्री! कामाचा वेग, गुणवत्तेत वाढ

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: भारताने १९६० च्या दशकात हरितक्रांती आणि १९९० च्या दशकात घडलेली क्रांती अनुभवली. त्यानंतरच्या दशकातही विज्ञानाने अनेक मोठे बदल घडवून आणले. आता २०२५ मध्ये भारत ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) क्रांतीकरणाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. प्रत्येक क्षेत्रात एआयने आपली उपस्थिती सिद्ध केली आहे. येणाऱ्या काळात भारत एआयच्या बळावर नव्या शिखरावर झेपावेल यात शंका नाही.

‘इंडिया एआय मिशन’

देशातील डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने ‘इंडिया एआय मिशन’ सुरू केले आहे. डिजिटल अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकार देशात एआय कंपन्या आणि संबंधित इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करत आहे.

२०२४ मध्ये सुरू झालेल्या या मिशनसाठी १० वर्षांत ९०,३०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. १५,६३४ ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्सच्या (GPU) मदतीने देशात हाय-एंड कॉम्प्युटिंग सुविधा विकसित करण्याचे सरकारचे ध्येय आहे.

जागतिक क्रमवारीत भारताची भरारी

तिसरे स्थान : एआय

स्टॅनफोर्डच्या जागतिक स्पर्धेत भारत आता अमेरिका व चीननंतर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

२०२४ मध्ये भारताचा स्कोअर २९.५५ होता, तर अमेरिका ३८.६५ स्कोअरसह पहिल्या, तर चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे.

जीडीपीमध्ये योगदान : ऑक्टोबर २०२५ पर्यंत देशाच्या जीडीपीमध्ये एआयचा वाटा ५०० अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे.

वित्तीय सेवांमध्ये एआय वापराचे प्रमाण ६५%

बँकिंग, विमा आणि फायनान्स क्षेत्रात एआयचा वापर २०२५ मध्ये ६५% पर्यंत पोहोचला आहे.

हेल्थकेअर क्षेत्रात डायग्नॉस्टिक्स, प्रिडिक्टिव अॅनालिटिक्स व रुग्ण व्यवस्थापनात एआय वापर वाढला आहे.

फिनटेक आणि डिजिटल पेमेंट्समध्ये एआयमुळे फसवणूक ओळखणे अधिक अचूक झाले आहे.

एआयचे नकारात्मक पैलू

बौद्धिक क्षमता : मानवी विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता कमकुवत होऊ शकते.

सुरक्षेचा धोका : डीपफेक व्हिडिओ, ऑडिओ व बातम्यांमुळे सामाजिक शांतता धोक्यात येऊ शकते.

नोकऱ्यांवर संकट?

वर्षभर या विषयावर चर्चा सुरू होती. डेटा एन्ट्री, कस्टमर सपोर्ट आणि मार्केटिंग सारख्या क्षेत्रातील कामांवर गदा आली असली, तरी त्याच वेळी नव्या क्षेत्रांत नोकऱ्या निर्माण होत आहेत. या काळात नवीन कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक झाले आहे. ज्या नोकऱ्या गेल्या, त्या कायमच्या जात नाहीत, स्वरूप बदलत आहे.

एआयला मालक नाही, मदतनीस बनवा

एआय हे एक दुहेरी तलवारीसारखे आहे. एआयचा कधीही मालक बनू देऊ नका, तर त्याला आपला मदतनीस बनवा.

एआयचा वापर कामाचा दर्जा सुधारण्यासाठी करा, पण निर्णयक्षमतेची सूत्रे आपल्या हातात ठेवा. अतिरेकी वापर धोकादायक ठरू शकतो.

सोशल मीडियावर ‘घिबली’चा धुमाकूळ

२०२५ मध्ये जनरेटिव्ह एआयमधील ‘घिबली’ फीचर सोशल मीडियावर प्रचंड गाजले. सामान्य नागरिक, इन्फ्लुएन्सर्स व सेलिब्रिटी यांनी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला. एआय-जनरेटेड फोटो बनवून व्हायरल शेअर केले.

ही क्षेत्रेही मागे नाहीत

ग्राहक सेवा व ई-कॉमर्स : एआय-आधारित शिफारसी, डायनॅमिक प्राइसिंग, ग्राहक वर्तन विश्लेषण.

रिटेल : इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, मागणीचा अंदाज.

मॅन्युफॅक्चरिंग व लॉजिस्टिक्स : प्रेडिक्टिव मेंटेनन्स, सप्लाय चेन ऑप्टिमायझेशन.

एसएमई : कमी खर्चात उत्पादन क्षमतेत वाढ.

स्थानिक भाषांना पाठिंबा

मोबाइल अॅप्स, चॅटबॉट्स, स्मार्ट असिस्टंट्स आता सामान्य वापरकर्त्यांपर्यंत पोहोचले आहेत. एआय आता लेखन व संवादात स्थानिक भाषांनाही सपोर्ट देत आहे.

 

Web Title : लोकमत एआई: भारत में एआई क्रांति, अर्थव्यवस्था और जीवन बदल रहा है

Web Summary : भारत में एआई क्रांति शुरू हो गई है, जो डिजिटल अर्थव्यवस्था को बढ़ावा दे रही है और वित्त और स्वास्थ्य सेवा जैसे क्षेत्रों को बदल रही है। एआई से नौकरी छूटने और सुरक्षा खतरों जैसे जोखिम हैं, लेकिन यह विकास और बेहतर दक्षता के अवसर भी प्रदान करता है। एआई को स्वामी नहीं, सहायक के रूप में उपयोग करना महत्वपूर्ण है, ताकि मानव क्षमताओं को बढ़ाया जा सके।

Web Title : Lokmat AI: India's AI Revolution Transforming Economy and Daily Life

Web Summary : India's AI revolution is underway, boosting the digital economy and transforming sectors like finance and healthcare. While AI presents risks like job displacement and security threats, it also offers opportunities for growth and improved efficiency. The key is to use AI as an assistant, not a master, to enhance human capabilities.