Lokmat AI ची अद्भूत दुनिया: डीपफेक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 20:33 IST2026-03-24T20:30:58+5:302026-03-24T20:33:17+5:30
Lokmat AI ची अद्भूत दुनिया: इंटरनेटवर पाहिलं ते नेहमी खरे समजू नका; सत्य तपासा मगच विश्वास ठेवा.

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: डीपफेक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता
Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आज आपण मोबाइल, टॅबलेट किंवा संगणकावर रोज अनेक फोटो, व्हिडिओ पाहतो आणि आवाज ऐकतो; पण तुम्हाला माहिती आहे का, त्यातील काही खरे नसून कृत्रिम बुद्धिमत्तेने (एआय) बनवलेले खोटे फोटो किंवा व्हिडिओ असू शकतात? याला आपण डीपफेक (Deepfake) म्हणतो.
डीपफेक म्हणजे एखाद्या व्यक्तीचे फोटो, व्हिडिओ किंवा आवाज खरे असल्यासारखे बनवणे, जे प्रत्यक्षात त्याने केलेले नसते. उदाहरणार्थ, एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीला काही बोलताना किंवा एखादे काम करताना दाखवणारा व्हिडिओ खोटा असू शकतो. हे साधारणपणे मशीन लर्निंग आणि न्युरल नेटवर्क्सच्या मदतीने तयार खूप खरे केले जाते. डीपफेक वाटते; पण जर आपण सावध न राहिलो, तर ते आपल्याला महागात पडू शकते. प्रामुख्याने, डीपफेकची सुरुवात २०१४ मध्ये मशीन लर्निंग वापरून फोटो आणि व्हिडिओ बदलण्यापासून झाली. त्यानंतर ते २०१८-२०१९ मध्ये सोशल मीडियावर ही संकल्पना (कन्सेप्ट) लोकप्रिय झाली.
डीपफेकचा उपयोग
मनोरंजनासाठी : चित्रपट, गाणी किंवा गेममध्ये मजा करण्यासाठी डीप फेक वापरला जातो. उदाहरणार्थ, एखाद्या अभिनेता किंवा खेळाडूला खऱ्या चित्रपटाप्रमाणे दुसऱ्या भूमिकेत दाखवणे.
शिक्षणासाठी : इतिहासातील एखाद्या घटनेचे किंवा विज्ञान प्रयोगाचे उदाहरण दाखवण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थी डीपफेकचा उपयोग करु शकतात.
धोकादायक वापर : चुकीच्या हातात डीपफेक खूप धोकादायक ठरु शकतो. उदाहरणार्थ : एखाद्याचा खोटा व्हिडिओ बनवून त्याची बदनामी करणे. खोट्या बातम्या आणि अफवा पसरवणे. डिजिटल फसवणूक किंवा चोरी करणे.
आपण सावध कसे राहू?
स्रोत तपासा - व्हिडिओ किंवा फोटो कुठून आला आहे ते पाहा.
असामान्य गोष्टी ओळखा - चेहरा, आवाज किंवा हालचाल अजब वाटल्यास शंका ठेवा.
विश्वसनीय संकेतस्थळांचा वापर करा - सोशल मीडियावरच्या प्रत्येक व्हिडिओला खरे समजू नका.
Smart Tech Box!
Deepfake is a clever technology that uses artificial intelligence (AI) to make fake videos, photos, or voices look real. It started around 2014 and became more popular in 2018-2019. Today, it is very advanced and can trick people if they are not careful. Deepfakes can be used for fun, like movies and games, but they can also be dangerous, spreading fake news, cheating, or hurting someone's reputation. Always check the source and think twice before believing anything online.
Moral: Not everything you see online is real; always verify before trusting.
मुलांनो, फक्त खऱ्या गोष्टींवरच विश्वास ठेवा. खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. आपल्याला 'डीपफेक' मजेशीर वाटू शकतो; पण चुकीच्या हातात खूप मोठा धोका निर्माण करतो. त्यामुळे आपण नेहमी माहिती तपासून, सत्य शोधूनच या गोष्टींवर विश्वास ठेवूयात.
मूल्यबोध - इंटरनेटवर पाहिलं ते नेहमी खरे समजू नका; सत्य तपासा मगच विश्वास ठेवा.
- इंजि. अविनाश जाधव, एआय आणि टेक एज्युकेटर