Lokmat AI ची अद्भूत दुनिया: एआय आणि रोबोटिक्स : आजच्या बुद्धिमान यंत्राची नवी दुनिया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 07:07 IST2026-03-30T07:07:07+5:302026-03-30T07:07:07+5:30

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: एआय आणि रोबोटिक्स हे वेगळे विषय नसून एकमेकांना पूरक असलेली प्रणाली आहे.

lokmat ai series the artificial intelligence and robotics new world of today intelligent machines | Lokmat AI ची अद्भूत दुनिया: एआय आणि रोबोटिक्स : आजच्या बुद्धिमान यंत्राची नवी दुनिया!

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: एआय आणि रोबोटिक्स : आजच्या बुद्धिमान यंत्राची नवी दुनिया!

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आजच्या काळात 'रोबोट येणार आणि नोकऱ्या जाणार' अशी भीती अनेकदा व्यक्त होते. पण प्रत्यक्षात रोबोट स्वतः काहीच करू शकत नाही. त्याला बुद्धी देणारे तंत्रज्ञान म्हणजे Artificial Intelligence (AI). म्हणूनच एआय आणि रोबोटिक्स हे वेगळे विषय नसून एकमेकांना पूरक असलेली प्रणाली आहे.

रोबोटिक्स हा अभियांत्रिकी विषय मशीनला हालचाल करण्याची क्षमता देतो. रोबोटला हात, चाके, मोटर, सेन्सर आणि कॅमेरे दिले जातात. त्यामुळे तो वस्तू उचलू शकतो, चालू शकतो किंवा एखादे ठराविक काम करू शकतो. पण त्याला काय योग्य आणि काय अयोग्य? हे समजत नाही. तो फक्त दिलेल्या आदेशावर काम करतो. इथे एआय कामाला येते. एआय मशीनला विचार करण्याची आणि शिकण्याची क्षमता देते. तो फोटो ओळखतो, आवाज समजतो, परिस्थितीचा अंदाज घेतो आणि निर्णय घेतो. म्हणजेच रोबोट शरीरासारखा काम करतो, तर एआय मेंदूसारखा विचार करते.

उदाहरणार्थ, कारखान्यातील साधा रोबोट १०० बाटल्या उचलणारच. पण एआय असलेला रोबोट फुटलेली बाटली वेगळी ठेवतो. स्वयंचलित गाडीत कॅमेरे आणि सेन्सर रस्ता पाहतात-हे रोबोटिक्स; पण सिग्नल, माणूस आणि अडथळे ओळखून गाडी वळवणे हे एआय करू शकते.

हॉस्पिटलमधील रोबोट औषध पोहोचवतो, पण योग्य रुग्ण ओळखण्याचे काम एआय करते. आजचे रोबोट अनुभवातून शिकतात. ते चुकांची नोंद ठेवतात आणि पुढच्या वेळी सुधारतात. यालाच मशीन लर्निंग म्हणतात. त्यामुळे मशीन आता फक्त आदेश पाळत नाहीत, तर परिस्थितीनुसार वागतात.

भविष्यात शाळेत शिकवणारे, शेती तपासणारे आणि वृद्धांची काळजी घेणारे रोबोट दिसतील. नोकऱ्या कमी होणार नाहीत, तर नवीन कौशल्यांची गरज वाढणार आहे.

औद्योगिक रोबोट ते सामाजिक रोबोट

पहिल्या पिढीतील रोबोट फक्त पुनरावृत्तीचे काम करायचे.

दुसरी पिढी सेन्सर आधारित प्रतिक्रिया.

तिसरी पिढी (आजची) एआय आधारित निर्णय घेतात. चौथी पिढी (भविष्यातली) भावनांचा अंदाज घेणारे रोबोट.

रोबोटिक्स : भौतिक जगाशी संपर्क

रोबोटिक्स हा अभियांत्रिकी विषय आहे जो मशीनला प्रत्यक्ष जगात काम करण्याची क्षमता देतो.

यामध्ये तीन मुख्य घटक असतात :

Sensors (संवेदक) - माहिती गोळा करतात कॅमेरा, तापमान सेन्सर, दाब सेन्सर, अंतर सेन्सर.

Actuators (हालचाल यंत्रणा)- हालचाल घडवतात मोटर, हायड्रॉलिक हात, चाके.

Control System (नियंत्रण प्रणाली)- आदेश देतात मायक्रोकंट्रोलर, प्रोसेसर रोबोटिक्समुळे मशीनला काम करण्याची क्षमता मिळते पण नेमके काय करायचे हे अजूनही ठरलेले नसते.

समाजावर परिणाम

उद्योग - स्मार्ट फॅक्टरी, कमी चुका, जास्त उत्पादन.
आरोग्य - अचूक शस्त्रक्रिया आणि लवकर निदान,
शेती - रोग ओळख, पाण्याचे नियोजन इ.
शिक्षण - वैयक्तिक शिकवण सोपी झाली.
(Personalized Education)

Autonomous Intelligence

Robotics connects machines to the physical world, Al connects them to understanding. Together they create autonomous systems that can sense, decide and act.

Moral Do not fear technology-understand it. The future belongs to those who learn and work with Al.

- इंजि. अविनाश जाधव (एआय आणि टेक एज्युकेटर)
 

Web Title : लोकमत एआई: एआई और रोबोटिक्स की बुद्धिमान दुनिया का अन्वेषण

Web Summary : एआई रोबोटों को बुद्धि से सशक्त करता है, जिससे वे सीख सकते हैं, अनुकूल हो सकते हैं और निर्णय ले सकते हैं। रोबोटिक्स और एआई का संयोजन स्वास्थ्य सेवा, विनिर्माण और शिक्षा जैसे उद्योगों को बदलने वाली स्वायत्त प्रणाली बनाता है। प्रौद्योगिकी को समझें, भविष्य की सफलता के लिए एआई को अपनाएं।

Web Title : Lokmat AI: Exploring the Intelligent World of AI and Robotics

Web Summary : AI empowers robots with intelligence, enabling them to learn, adapt, and make decisions. Combining robotics and AI creates autonomous systems transforming industries like healthcare, manufacturing, and education. Understand technology, embrace AI for future success.