Lokmat AI ची अद्भूत दुनिया: AI आणि गोपनीयता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 12:47 IST2026-03-03T12:46:06+5:302026-03-03T12:47:08+5:30
Lokmat AI ची अद्भूत दुनिया: सतर्क राहणे गरजेचे आहे.

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: AI आणि गोपनीयता
Lokmat AI ची अद्भूत दुनिया: कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनत असताना गोपनीयता हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. एआय काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर डेटा वापरतो आणि हाच डेटा आपली वैयक्तिक माहितीही असू शकतो. एआय प्रणाली हा डेटा वापरून आपल्या सवयी, आवडी-निवडी, विचारसरणी आणि वर्तना यांचे विश्लेषण करतो. यालाच 'प्रोफाइलिंग' असे म्हणतात. या प्रोफाइलिंगचा उपयोग योग्य सेवा देण्यासाठी होऊ शकतो; पण त्याच वेळी चुकीच्या जाहिराती, दिशाभूल करणारी माहिती किंवा फसवणूक यासाठीही तो वापरला जाऊ शकतो.
आज फेस रिकग्निशन (Face Recognition) आणि व्हॉइस क्लोनिंग (Voice Cloning) सारख्या तंत्रज्ञानामुळे डिपफेक (Deepfake) व्हिडीओ, बनावट ऑडिओ कॉल आणि खोटे पुरावे तयार करणे शक्य झाले आहे, जे व्यक्तीच्या प्रतिष्ठेला, सुरक्षिततेला आणि लोकशाही व्यवस्थेलाही धोका निर्माण करू शकते.
विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत हा धोका अधिक गंभीर आहे. कारण गेम्स, शिक्षण अॅप्स आणि ऑनलाइन व्यासपीठांमधून (प्लॅटफॉर्म्स) त्यांचा डेटा नकळत गोळा होतो; पण त्याची जाणीव ना मुलांना असते, ना पालकांना स्पष्टपणे दिली जाते. त्यामुळे सतर्क राहणे गरजेचे आहे.
गोपनीयतेचा हक्क (Right to Privacy)
सर्वोच्च न्यायालयाने गोपनीयतेला मूलभूत हक्क मानले आहे.
विद्यार्थ्यांसाठी संदेश
AI वापरकर्ते न बनता, AI समजून घेणारे जागरुक नागरिक बना. आपली माहिती कुठे, कशी आणि का वापरली जाते, हे जाणून घेणे हीच खरी डिजिटल साक्षरता आहे.
एआय गोपनीयतेशी कसा जोडलेला आहे?
- AI प्रणाली खालील प्रकारचा डेटा वापरतात!
- नाव, मोबाइल क्रमांक, ठिकाण (लोकेशन).
- छायाचित्र (फोटो), आवाज, व्हिडीओ.
- इतिहास, सोशल मीडियावरील वर्तन.
- आरोग्य, शिक्षण, आर्थिक माहिती.
- हा डेटा योग्य प्रकारे संरक्षित नसेल तर गोपनीयतेला धोका निर्माण होतो.
भारतात गोपनीयतेचे संरक्षण
Digital Personal Data Protection Act (2023)
नागरिकांच्या वैयक्तिक डेटाचे संरक्षण करण्यासाठीचा कायदा.
एआयमुळे निर्माण होणारे सुरक्षिततेचे धोके
- डेटा गळती (डेटा लिक).
- निगराणी (सव्हिलन्स).
- चेहऱ्याची ओळख (Face Recognition).
- परवानगीशिवाय डेटाचा वापर.
Rohan loved playing online games and using apps. One day, he saw ads and messages that seemed to know too much about him-his location, favorite games, even his daily routine. He felt scared and told his teacher. "Al uses your data," the teacher said. "If you share too much, it can be misused." Rohan changed his privacy settings, shared only what was needed, and started thinking before clicking anything. Slowly, he learned that Al can help, but only if you stay careful.
Moral: Think before you share -your privacy is important. - Ajinkya Deshmukh
AI मध्ये गोपनीयता कशी जपता येईल?
- डेटा मर्यादा (Data Minimization) -आवश्यक तेवढाच डेटा वापरणे.
- एनक्रिप्शन (Encryption) - डेटा सुरक्षित स्वरुपात साठवणे.
- परवानगी (Consent) -वापरकर्त्याची माहितीपूर्वक संमती.
- पारदर्शकता - डेटा कसा वापरला जातो हे स्पष्ट सांगणे.
- नैतिक AI (Ethical Al) -माणसाच्या हक्कांचा आदर करणारी प्रणाली.
इंजि. अविनाश जाधव (एआय आणि टेक एज्युकेटर)