Lokmat AI ची अद्भूत दुनिया: AI वापरताना काय करू नये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 13:00 IST2026-03-04T13:00:32+5:302026-03-04T13:00:32+5:30

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: चुकीचा वापर फायदेशीर ठरण्याऐवजी नुकसानकारक ठरू शकतो.

lokmat ai series know what not to do when using artificial intelligence | Lokmat AI ची अद्भूत दुनिया: AI वापरताना काय करू नये?

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: AI वापरताना काय करू नये?

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आज शिक्षण, नोकरी, व्यवसाय, शेती, आरोग्य अशा अनेक क्षेत्रांत एआयचा वापर झपाट्याने वाढत आहे. जागतिक पातळीवर पाहिले तर २०२४-२५ दरम्यान सुमारे ७० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी आणि ६० टक्के कर्मचारी रोजच्या कामासाठी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात AI साधने वापरत आहेत. भारतातही शालेय व महाविद्यालयीन स्तरावर AI आधारित अॅप्सचा वापर वेगाने वाढतो आहे. मात्र, या वाढीसोबतच एक महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो, AI वापरताना आपण काय करू नये? कारण चुकीचा वापर फायदेशीर ठरण्याऐवजी नुकसानकारक ठरू शकतो.

वैयक्तिक व गोपनीय माहिती टाकू नये

आधार क्रमांक, बँक तपशील, पासवर्ड, ओटीपी, विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती किंवा संस्थेची कागदपत्रे एआयमध्ये देणे धोकादायक ठरु शकते. गोपनीयतेचे भान ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

कॉपी-पेस्टची सवय वाढवू नये

AI कडून मिळालेला मजकूर तसाच वापरल्यास सर्जनशीलता, लेखनकौशल्य आणि स्वतःची भाषा विकसित होत नाही. AI ला मार्गदर्शक मानावे, आपला लेखक नाही.

अनैतिक आणि चुकीच्या कामासाठी वापर करू नये. परीक्षेत गैरप्रकार, फसवणूक, खोटी माहिती पसरवणे, द्वेष निर्माण करणारे मजकूर तयार करणे यासाठी AI वापरणे चुकीचे आणि धोकादायक आहे.

AI ला अंतिम निर्णय देणारा आपला बॉस बनवू नये. आरोग्य, आर्थिक गुंतवणूक, नोकरी निवड, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन अशा महत्त्वाच्या बाबींमध्ये AI चा सल्ला उपयोगी असू शकतो; पण अंतिम निर्णय माणसानेच घ्यावा.

अंधपणे विश्वास ठेवू नये

AI ने दिलेली प्रत्येक माहिती अचूकच असेल, असा समज करून घेऊ नये. AI कधीकधी चुकीची उदाहरणे, अपूर्ण माहिती किंवा संदर्भाविना उत्तर देऊ शकतो. त्यामुळे अभ्यास, परीक्षा, धोरणात्मक किंवा करिअरविषयक निर्णयांमध्ये माहिती तपासून पाहणे किंवा पडताळून बघणे आवश्यक आहे.

स्वतः विचार करणे थांबवू नये

AI उत्तर देतो. मात्र, विचार करणे, विश्लेषण करणे आणि निर्णय घेणे हे माणसाचे काम आहे. AI वर पूर्ण अवलंबून राहिल्यास तर्कशक्ती आणि समज कमी होण्याची दाट शक्यता असते.

Use Al wisely

Rahul used Al for homework, projects, and daily questions. Slowly, he began to trust every answer without checking and copied text directly. He even shared personal details without thinking. One day, wrong Al information caused him to submit an incorrect project, and he was disappointed. His teacher explained, "Al can help you, but it can also make mistakes. It should guide you, not control you." Rahul learned to verify facts, protect his privacy, think independently, and use his own words. From then on, Al became his assistant not his decision-maker.

Moral: Use Al wisely, but never stop thinking for yourself.

निष्कर्ष

AI हे एक शक्तिशाली साधन आहे; पण त्याचा वापर विवेकाने, जबाबदारीने आणि मर्यादेत केला तरच तो खऱ्या अर्थाने उपयुक्त ठरतो. AI आपली विचारशक्ती बदलण्यासाठी नाही, तर ती अधिक सक्षम करण्यासाठी आहे.

इंजि. अविनाश जाधव, (एआय आणि टेक एज्युकेटर)
 

Web Title : लोकमत एआई की अद्भुत दुनिया: एआई का उपयोग करते समय क्या न करें?

Web Summary : एआई के तेजी से विकास के लिए जिम्मेदार उपयोग जरूरी है। व्यक्तिगत डेटा, अंधविश्वास और अनैतिक कार्यों से बचें। एआई को मार्गदर्शक के रूप में उपयोग करें, आलोचनात्मक सोच और मानवीय निर्णय के प्रतिस्थापन के रूप में नहीं। लाभकारी परिणामों के लिए जानकारी सत्यापित करें और गोपनीयता की रक्षा करें।

Web Title : Lokmat AI's World: What Not to Do While Using AI?

Web Summary : AI's rapid growth demands responsible use. Avoid sharing personal data, blind trust, and unethical actions. Use AI as a guide, not a replacement for critical thinking and human judgment. Verify information and protect privacy for beneficial outcomes.