Lokmat AI ची अद्भूत दुनिया: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माणसाच्या भावनांचं मोजमाप शक्य आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 21:42 IST2026-03-24T21:40:10+5:302026-03-24T21:42:18+5:30
Lokmat AI ची अद्भूत दुनिया: एआय भावना समजते म्हणजे ती मन वाचते, असा गैरसमज आहे.

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माणसाच्या भावनांचं मोजमाप शक्य आहे का?
Lokmat AI ची अद्भूत दुनिया: माणूस बोलतो तेव्हा आपण ऐकतो; पण माणूस गप्प असतो तेव्हा काय होतं? भावना नेहमी शब्दांत व्यक्त होत नाहीत. कधी डोळे खाली जातात, कधी आवाज थोडा थरथरतो, कधी एखादा माणूस नेहमीपेक्षा कमी बोलतो, तर कधी फारच जास्त. माणूस स्वतःच्या भावना लपवू शकतो; पण त्याचे वर्तन, सवयी आणि प्रतिक्रिया काहीतरी सांगत असतात. आज कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) याच 'न बोललेल्या माहिती'कडे लक्ष देऊ लागली आहे.
एआय भावना समजते म्हणजे ती मन वाचते, असा गैरसमज आहे. प्रत्यक्षात एआय भावना ओळखण्याचा प्रयत्न करते. त्या व्यक्त होण्याच्या पद्धतीतून.
एआय भावना कशातून ओळखते?
एआय थेट 'दुःख' किंवा 'आनंद' मोजत नाही. ती माणसाच्या वागण्यातले नमुने (पॅटर्न) पाहते.
उदाहरणार्थ : एखाद्या व्यक्तीचा आवाज नेहमीपेक्षा हळू किंवा वेगवान झाला आहे का? बोलण्यात जास्त थांबे येत आहेत का?
हे सगळे बदल म्हणजे डेटा. एआय या डेटामधील बदल ओळखते आणि सांगते इथे काहीतरी बदल घडतोय. इथेच 'मौन' महत्त्वाचं ठरतं. माणूस जे बोलत नाही, तेही एआयसाठी माहिती असू शकतं.
योग्य वापर झाला तर...
तणाव आधीच ओळखता येतो.
मानसिक थकवा वाढण्याआधी इशारा देता येतो.
संवाद अधिक संवेदनशील बनतो.
पण चुकीचा वापर झाला तर
माणसाच्या खासगी भावना मोजल्या जाऊ शकतात.
गप्प राहणंही संशयास्पद ठरु शकतं
सामान्य वर्तनाची एक चौकट तयार होऊ शकते.
१,००० शाळांत एआय क्रांती!
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) युगात महाराष्ट्रातील विद्यार्थी मागे राहू नयेत, यासाठी रिलायन्स जिओने राज्यभर व्यापक शैक्षणिक मोहीम सुरु केली आहे. या उपक्रमांतर्गत जिओ महाराष्ट्रातील शाळा व महाविद्यालयांमध्ये थेट जाऊन विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना गूगल जेमिनी, जिओ एआय क्लासरुम आणि अत्याधुनिक एआय टूल्सचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देत आहे. आतापर्यंत राज्यातील १,००० हून अधिक शाळांमधील ७,२०० पेक्षा जास्त विद्यार्थी-शिक्षकांना या उपक्रमाचा लाभ मिळाला आहे.
या प्रशिक्षण सत्रांमधून केवळ एआयची ओळख करून देण्यापुरते न थांबता, अभ्यास, परीक्षा तयारी, असाइनमेंट, प्रोजेक्ट, कोडिंग, डिझाइन, नोट्स तयार करणे आणि करिअर नियोजनासाठी एआयचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा, यावर भर देण्यात येत आहे. विशेषतः गूगल जेमिनी लाइव्हसारख्या सुविधेमुळे मराठीसह पसंतीच्या भाषेत प्रश्नोत्तरांची सुविधा मिळत असल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांचा सहभाग वाढला आहे.
भावना ओळखण्यासाठी एआय हे मॉडेल्स वापरते
1. Pattern Recognition Models वर्तनातले बदल ओळखण्यासाठी. 2. Signal Analysis Models - आवाजाचा चढ-उतार, गती, थांबे समजण्यासाठी. 3. Image-based Models -चेहऱ्यावरील भावांतील सूक्ष्म बदल पाहण्यासाठी. 4. Text Analysis
Models - शब्दांची निवड, लांबी, वारंवारिता समजण्यासाठी
Moral Story
Rohan was usually cheerful at school, but one week he became very quiet. He answered late, spoke less, and stopped laughing. A simple computer system noticed these changes and showed an alert to the teacher: "Something is different."
The teacher did not punish Rohan or question him harshly. She spoke gently and listened. Rohan shared that he was worried about his exams and felt tired. With support, he slowly felt better.
Moral: Al can notice silence, but only humans can understand it with kindness.
- अजिंक्य देशमुख