Lokmat AI ची अद्भूत दुनिया: कृत्रिम बुद्धीमत्ता शिस्त कशी घडवते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 10:35 IST2026-03-11T10:35:03+5:302026-03-11T10:35:59+5:30
Lokmat AI ची अद्भूत दुनिया: कागदावर नियम लिहिणे सोपे असते. पण ते नियम रोजच्या कृतीत उतरवणे कठीण असते.

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: कृत्रिम बुद्धीमत्ता शिस्त कशी घडवते?
Lokmat AI ची अद्भूत दुनिया: एका समाजाची खरी ओळख त्याच्या कायद्यांमध्ये नसते, तर लोकांच्या रोजच्या वागण्यात दिसते. रस्त्यावर सिग्नल पाळणे, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे, रांगेत उभे राहणे, आवाज मयदित ठेवणे, ही सगळी शिस्तीची छोटी उदाहरणे आहेत.
कागदावर नियम लिहिणे सोपे असते. पण ते नियम रोजच्या कृतीत उतरवणे कठीण असते. इथेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) माणसाच्या मदतीला येते. एआय म्हणजे शिक्षा देणारी यंत्रणा नाही. एआय म्हणजे वर्तन समजून घेणारी, पॅटर्न ओळखणारी आणि योग्य वेळी सूचना देणारी बुद्धी. ती माणसाला शिस्त लावायला भाग पाडत नाही, पण शिस्त पाळणे सोपे करते.
शिस्त म्हणजे काय आणि ती का कमी पडते? बहुतेक वेळा लोक नियम मोडतात कारण, नियम विसरले जातात. परिणाम लगेच दिसत नाही. कोणी पाहत नाही असे वाटते. सवय लागलेली नसते. उदाहरणार्थ, कचरा रस्त्यावर टाकू नये हे सर्वांना माहीत आहे. तरीही तो टाकला जातो.
शिस्त AI = बदलते?
कमी गोंधळ, स्वच्छ सार्वजनिक जागा, सुरक्षित रस्ते, कमी प्रदूषण, जबाबदार नागरिक माणूस विरुद्ध एआय? नाही माणूस एआय. AI नियम बनवत नाही. नियम माणूसच ठरवतो. AI फक्त आठवण करून देते. "तू जे बरोबर मानतोस, तेच कर. "शिस्त म्हणजे भीती नाही. शिस्त म्हणजे सवय.
सवय निर्माण करण्यासाठी...
एआयचा उपयोग नियम अमलात आणण्यासाठी नाही, तर सवय निर्माण करण्यासाठी होतो.
उदाहरणार्थ : एखाद्या ठिकाणी लोक वारंवार नियम मोडतात का? कोणत्या वेळेला गोंगाट वाढतो? कुठे कचरा जास्त साचतो? कुठे वाहतूक नियम जास्त मोडले जातात? AI या सगळ्या गोष्टींचा डेटा पाहते आणि पॅटर्न ओळखते. मग त्या ठिकाणी : योग्य सूचना दिल्या जातात. वेळेवर इशारे दिले जातात. पर्याय सुचवले जातात. यामुळे शिक्षा न देता वर्तन सुधारले जाते.
निसर्गाशी जोडलेली शिस्त
शिस्त म्हणजे फक्त माणसांत नव्हे, तर निसर्गाबाबतही असते. AI मुळे पाणी वाया जाणे कमी होते. ऊर्जा वापर नियंत्रित होतो. प्रदूषण पातळी ओळखून उपाय करता येतात. माणूस शिस्त पाळतो.
पुढे काय?
भविष्यातः शाळा, बाजार, सार्वजनिक ठिकाणी AI आधारित शिस्त-सल्लागार असतील. दंडाऐवजी सुधारणा सुचवली जाईल. निसर्गपूरक वर्तनाला प्रोत्साहन दिले जाईल. तेव्हा नियम पुस्तकात नसतील, ते माणसाच्या रोजच्या कृतीत असतील.
सार्वजनिक जीवनातील शिस्त आणि एआय
शहरांमध्ये लाखो लोक एकत्र राहतात. प्रत्येकाने स्वतःहून शिस्त पाळली तरच शहर नीट चालते. एआय इथे 'अदृश्य शिस्तपालक' म्हणून काम करते.
उदाहरणे : वाहतूक व्यवस्थेत एआय वाहनांची गती, थांबे, गर्दी ओळखून सिग्नल वेळ बदलते. सार्वजनिक ठिकाणी AI आवाजाची पातळी ओळखून इशारे देते.
The Quiet Crossing
Rohan crossed the road every day without using the signal. One day, a gentle alert on a nearby screen reminded people to wait. No scolding. No fine. Just a reminder. Rohan waited. Nothing bad happened-only calm. Slowly, he began stopping every day. Others followed. The crossing became safer. Rohan realized something important: rules don't change people, habits do. And habits grow when reminders are kind and consistent. Discipline, he learned, isn't about fear. It's about choosing the right action even when no one is watching.
निष्कर्ष
AI शिस्त लादत नाही. ती शिस्त सोप्या, शांत आणि सातत्यपूर्ण पद्धतीने घडवते. जर समाज बदलायचा असेल, तर आधी सवयी बदलायला हव्यात. आणि त्या बदलात, AI हा शिक्षक आहे.
- अजिंक्य देशमुख