Lokmat AI ची अद्भूत दुनिया: AI आणि आत्मनिर्भर भारत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 13:15 IST2026-03-08T13:15:34+5:302026-03-08T13:15:49+5:30

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: AI आज आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला नवे बळ देताना दिसत आहे.

lokmat ai series artificial intelligence and self reliant India | Lokmat AI ची अद्भूत दुनिया: AI आणि आत्मनिर्भर भारत!

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: AI आणि आत्मनिर्भर भारत!

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आजची मुले ज्या जगात वाढत आहेत ते जग वेगाने बदलताना दिसत आहे. सध्या देशात सप्टेंबर २०२५ मध्ये ट्रायच्या आकडेवारीनुसार १००.२८ कोटी इतकी इंटरनेट वापरकर्ते आहेत. यामध्ये मोठा वाटा लहान वयातील मुलांचा आहे. मोबाइलवर बोलल्यावर उत्तर देणारा असिस्टंट, ऑनलाइन अभ्यासात मदत करणारे अॅप किंवा इमेज ओळखणारी यंत्रणा हे सगळे कृत्रिम बुद्धिमत्तेचे, म्हणजेच AI चे उदाहरण आहे. हीच AI आज आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला नवे बळ देताना दिसत आहे.

शाळेत शिकणाऱ्या मुलांसाठी AI म्हणजे फक्त तंत्रज्ञान नाही, तर शिकण्याचा एक सोपा मार्ग आहे. ऑनलाइन क्लास, व्हिडीओ लेक्चर्स, सराव प्रश्न देणारे अॅप्स यामुळे प्रत्येक मूल आपल्या क्षमतेने शिकू शकते. शिक्षकांना देखील विद्यार्थ्यांची प्रगती समजायला AI मदत करते. त्यामुळे शिक्षण अधिक प्रभावी आणि सर्वांपर्यंत पोहोचणारे होत आहे. AI चा उपयोग फक्त अभ्यासापुरता मर्यादित नाही. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना पाऊस, पीक आणि रोगांबाबत माहिती मिळते. रुग्णालयात डॉक्टरांना आजार ओळखण्यासाठी AI मदत करते. या सगळ्याचा फायदा शेवटी देशातील प्रत्येक कुटुंबाला होतो हे महत्त्वाचे.

कृत्रिम बुद्धीमत्ते (एआय) च्या विकासाकडे भारत गांभीर्याने पाहात आहे. त्याचा विविध क्षेत्रांमध्ये कसा उपयोग होईल याकडे धोरणकर्ते विचार करत आहेत. यातून आपण आत्मनिर्धार होऊ, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्दे

AI मुळे भारतात कोट्यवधी मुले ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून शिकत आहेत.

शेतकऱ्यांना हवामान, पीक आणि उत्पादनाबाबत AI चा उपयोग होत आहे.

आरोग्य क्षेत्रात तपासणी आणि उपचार अधिक वेगाने होत आहेत.

AI आधारित स्टार्टअप्समुळे भारतात नवे रोजगार निर्माण होत आहेत.

योग्य वापरामुळे AI आत्मनिर्भर भारताची नवी ताकद ठरत आहे.

The Smart Village Helper

Riya lived in a small village where her parents worked on a farm. One day, her teacher showed the class a simple Al app that gave information about weather, crops, and studies. Riya used it to help her father know when it would rain and which crop needed less water. She also used Al videos to understand her school lessons better. Slowly, her family saved time, reduced waste, and earned more. Riya learned that technology, when used wisely, can make even small villages strong and self-reliant.

Moral: Al does not replace people, but it empowers them to build a self-reliant future.

देशाच्या प्रगतीचा खरा साथीदार

AI हे भारताच्या भविष्यासाठी एक महत्त्वाचे साधन आहे. लहान वयातच AI योग्य पद्धतीने समजून घेतल्यास मुले जबाबदार नागरिक बनू शकतात. शिक्षण, शेती, आरोग्य आणि रोजगार या क्षेत्रांत AI चा उपयोग वाढत असून त्यातून आत्मनिर्भर भारताची मजबूत पायाभरणी होत आहे. तंत्रज्ञानावर नियंत्रण ठेवत त्याचा शहाणपणाने वापर केला, तर AI देशाच्या प्रगतीचा खरा साथीदार ठरेल.

इंजि. अविनाश जाधव (एआय आणि टेक एज्युकेटर)
 

Web Title : लोकमत एआई: एआई आत्मनिर्भर भारत के भविष्य को शक्ति और नवाचार प्रदान करता है।

Web Summary : एआई भारत को बदल रहा है, शिक्षा, कृषि और स्वास्थ्य सेवा को लाभान्वित कर रहा है। यह छात्रों, किसानों और डॉक्टरों को सशक्त बनाता है, आत्मनिर्भर राष्ट्र की दिशा में प्रगति को बढ़ावा देता है और नए अवसर पैदा करता है।

Web Title : Lokmat AI: AI powers self-reliant India's future growth and innovation.

Web Summary : AI is transforming India, benefiting education, agriculture, and healthcare. It empowers students, farmers, and doctors, driving progress towards a self-reliant nation and creating new opportunities.