Lokmat AI ची अद्भूत दुनिया: AI आणि उद्योजकता : कल्पनेपासून उद्योगापर्यंतचा नवा आणि सोपा मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 14:16 IST2026-03-06T14:15:12+5:302026-03-06T14:16:49+5:30
Lokmat AI ची अद्भूत दुनिया: या बदलामागे कोणतीही जादू नाही, तर एक नवा मदतनीस आहे कृत्रिम बुद्धिमत्ता, म्हणजेच AI.

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: AI आणि उद्योजकता : कल्पनेपासून उद्योगापर्यंतचा नवा आणि सोपा मार्ग
Lokmat AI ची अद्भूत दुनिया: पूर्वी उद्योग सुरू करणे म्हणजे मोठी भांडवलशक्ती, ओळखी, अनुभव आणि जोखीम यांचा खेळ होता. एखाद्याकडे चांगली कल्पना असली, तरी ती प्रत्यक्षात आणणे सोपे नव्हते. माहिती मिळवणे कठीण होते, योग्य निर्णय घ्यायला वेळ लागत होता आणि चूक झाली तर त्याची किंमत मोठी असायची. त्यामुळे अनेक जण 'कल्पना आहे, पण आत्ता नाही' असे म्हणत मागे हटायचे.
आज हे चित्र हळूहळू बदलत आहे. या बदलामागे कोणतीही जादू नाही, तर एक नवा मदतनीस आहे कृत्रिम बुद्धिमत्ता, म्हणजेच AI. AI म्हणजे उद्योग चालवणारी यंत्रे नव्हेत. AI म्हणजे असा शांत, सतत काम करणारा आणि थकत नसलेला सहायक, जो उद्योजकाच्या बाजूने उभा राहतो. तो निर्णय घेत नाही, पण निर्णय घेण्यासाठी लागणारी माहिती सोपी करतो. तो कल्पना निर्माण करत नाही, पण कल्पनेला दिशा देतो. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तो उद्योजकाचा वेळ वाचवतो. आजच्या उद्योजकतेत वेळ ही सर्वांत मोठी संपत्ती आहे.
नवोदित उद्योजक विचार करूया. त्याच्याकडे एक साधी कल्पना आहे-कदाचित एखादी सेवा, एखादा उत्पादन विचार किंवा स्थानिक गरज पूर्ण करणारी योजना. पण, लगेच प्रश्न उभे राहतात. लोकांना याची गरज आहे का? आधी कोणी केले आहे का? खर्च किती येईल? सुरुवात कुठून करायची? या टप्प्यावर अनेक जण गोंधळतात. कारण प्रश्न खूप असतात आणि उत्तरे शोधायला वेळ नसतो. इथे AI मदतीला येते.
माहिती समजून घेणारी AI मॉडेल्स इंटरनेटवरील उपलब्ध माहिती, अहवाल, लेख आणि अनुभव वाचून त्याचा सोपा अर्थ काढतात. उद्योजकाला शेकडो पानं वाचण्याऐवजी काही स्पष्ट मुद्दे समजतात. यामुळे निर्णय अंदाजावर नाही, तर माहितीवर आधारित होतो. यानंतर येतो नियोजनाचा टप्पा. उद्योग सुरू करताना अनेक कामे एकाच वेळी करावी लागतात-नोंदणी, कागदपत्रे, ग्राहकांशी संवाद, खर्चाचे नियोजन. हे सगळे एकत्र आल्यावर गोंधळ उडतो. नियम-आधारित आणि वेळ व्यवस्थापन करणारी AI प्रणाली कामांचे प्राधान्य ठरवायला मदत करतात. आज काय करायचे, उद्या काय, आणि काय टाळता येईल हे स्पष्ट होते.
AI इथे बॉस नसते. ती एक वहीसारखी असते-जी सतत आठवण करून देते. उद्योजकतेतील एक मोठी अडचण म्हणजे लिहिण्याची कामे. प्रस्ताव लिहिणे, माहितीपत्रक तयार करणे, ग्राहकांना संदेश पाठवणे-हे सगळे अनेकांना अवघड जाते. पण, भाषा समजणारी AI मॉडेल्स साध्या शब्दांत, स्पष्ट आणि नीटस मजकूर तयार करण्यात मदत करतात. उद्योजकाला फक्त काय सांगायचे आहे ते ठरवायचे असते. यामुळे वेळ वाचतो व दुसरा संदेश स्पष्ट जातो.
AI चा उपयोग फक्त सुरुवातीपुरता मर्यादित नाही. उद्योग चालू झाल्यानंतरही AI मदत करत राहते. ग्राहकांकडून येणारे प्रश्न, वारंवार होणाऱ्या चुका, वेळ वाया जाण्याची ठिकाणे-ही सगळी माहिती नमुना ओळखणारी AI प्रणाली लक्षात घेतात. त्यामुळे उद्योजकाला समजते की कुठे सुधारणा करता येईल. हे सगळे करताना एक महत्त्वाची गोष्ट घडते. उद्योजक थोडा मोकळा होतो. तो फक्त रोजच्या धावपळीत अडकत नाही, तर पुढचा विचार करू शकतो.
AI मॉडेल प्रकार उद्योजकांसाठी उपयुक्त ठरत आहेत
मजकूर समजून घेणारी मॉडेल्स कल्पना, माहिती आणि निर्णय स्पष्ट करणे
वेळ नियोजन प्रणाली कामांचे नियोजन आणि प्राधान्य
प्रश्न-उत्तर प्रणाली पटकन शंका सोडविणे
नमुना ओळख प्रणाली- चुका आणि अडचणी ओळखणे
साधे अंदाज देणारी मॉडेल्स खर्च, वेळ आणि कामाचा अंदाज
AI मुळे उद्योजकतेत काय बदलते?
कल्पना तपासणे जलद होते
निर्णय माहितीवर आधारित होतात
वेळेचा अपव्यय कमी होतो
खर्चावर नियंत्रण मिळते
लहान उद्योगांना बळ मिळते
चुका ओळखणे सोपे
The Helping Idea
Ravi had a small business idea but felt confused and short of time. He had many questions and did not know where to start. He used a simple Al helper that explained things clearly, helped him plan his day, and saved his time. Ravi still made all the decisions, but now he understood them better. With less stress, he focused on improving his idea and helping his customers. His business slowly grew, step by step.
Moral: Al does not replace people. It helps them think clearly and use their time wisely.
- अजिंक्य देशमुख