Lokmat AI ची अद्भूत दुनिया: AI आणि शहरे : माणसांसाठी की यंत्रांसाठी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 13:39 IST2026-03-08T13:39:36+5:302026-03-08T13:39:36+5:30

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो ही शहरे माणसांसाठी अधिक चांगली बनत आहेत, की यंत्रांसाठी अधिक सोयीची?

lokmat ai series artificial intelligence and cities what for Humans or Machines | Lokmat AI ची अद्भूत दुनिया: AI आणि शहरे : माणसांसाठी की यंत्रांसाठी?

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: AI आणि शहरे : माणसांसाठी की यंत्रांसाठी?

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आज जगातील बहुतांश लोक शहरी भागात राहतात. रस्ते, इमारती, वाहतूक, वीज, पाणी, कचरा, इंटरनेट हे सगळे मिळून शहर उभे राहते. पण, शहर फक्त सिमेंट आणि यंत्रांनी बनत नाही. शहर बनते माणसांच्या सवयींनी, गरजांनी आणि स्वप्नांनी. आता या शहरांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI, वेगाने शिरकाव करत आहे. वाहतूक नियंत्रित करणे, वीज वापर मोजणे, कचरा व्यवस्थापन, सुरक्षितता, आरोग्य सेवा - सगळीकडे AI वापरले जाते. त्यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो ही शहरे माणसांसाठी अधिक चांगली बनत आहेत, की यंत्रांसाठी अधिक सोयीची?

AI शहरात काय करते?

AI म्हणजे माणसासारखा विचार करत नाही. ती अशी प्रणाली आहे जी प्रचंड प्रमाणात जमा होणाऱ्या माहितीचा अभ्यास करते. त्यातून नमुने शोधते. शहरात रोज लाखो गोष्टी घडतात, जसे वाहनांची हालचाल, वीज वापर, पाण्याची मागणी, गर्दी, अपघात, आजार. ही माहिती एकाच वेळी समजणे अशक्य आहे. इथे AI उपयोगी पडते.

AI मध्ये वापरली जाणारी काही मॉडेल्स

डेटा विश्लेषण मॉडेल्स: सेन्सरमधून येणारी माहिती तपासून 'कुठे काय घडते आहे' हे सांगतात.

भविष्य अंदाज मॉडेल्स: मागील माहितीवरून पुढे काय होऊ शकते याचा अंदाज देतात. उदा. कुठे वाहतूककोंडी होईल.

वर्गीकरण मॉडेल्स : समस्या वेगवेगळ्या प्रकारात विभागतात तातडीची, मध्यम किंवा कमी महत्त्वाची.

स्वयंचलित निर्णय साहाय्य मॉडेल्स : माणसाला निर्णय घेण्यास मदत करतात, पण निर्णय घेत नाहीत.

स्मार्ट शहर म्हणजे ?

'स्मार्ट सिटी' हा शब्द आज खूप वापरला जातो. पण, स्मार्ट शहर म्हणजे जिथे जास्त यंत्रे आहेत असे नाही. स्मार्ट शहर म्हणजे जिथे माणसाचा वेळ, ऊर्जा आणि मानसिक ताण वाचतो. उदा, AI-आधारित वाहतूक व्यवस्थेमुळे सिग्नल्स गर्दीनुसार बदलतात. त्यामुळे लोकांचा वेळ वाचतो.

धोका कुठे आहे?

AI चा पहिला धोका म्हणजे अतिनियंत्रण. सगळे काही मोजले, नोंदवले, विश्लेषण केले तर माणसाला सतत निरीक्षणाखाली असल्यासारखे वाटू शकते. दुसरा धोका असमानता. जर AI प्रणाली काहींसाठी चांगली काम करत असेल, तर शहरात दरी वाढते एक 'स्मार्ट' आणि एक दुर्लक्षित वर्ग. तिसरा धोका - मानवी निर्णयांची घट होऊन प्रत्येक गोष्ट यंत्रावर सोपवली, तर माणसाची विचार मागे पडू शकतात.

धोके-समतोल

अतिनियंत्रण टाळणे.
मानवी निर्णय जपणे.
समान सेवा वितरण.
गोपनीयतेचा सन्मान.
AI सहायक, शासक नाही.

कशी बदलते?

वाहतूक प्रवाह नियंत्रण.
वीज व पाणी वापर विश्लेषण.
कचरा व्यवस्थापन सुधारणा.
सार्वजनिक सुरक्षितता

The City That Learned to Pause

A city installed a powerful system that made everything faster. Traffic moved quickly, lights changed on time, and work finished sooner. People were happy. One day, an old man tried to cross the road slowly. The system saw him as a delay. Cars waited impatiently. Then a young boy stepped forward, held the old man's hand, and helped him cross. The city worked perfectly again, but only because a human chose kindness. That day, people understood an important lesson: Machines can make cities efficient, but only humans can make them humane.

मग योग्य मार्ग कोणता?

योग्य मार्ग म्हणजे AI ला साधन मानणे, मालक नाही. AI ने शहर अधिक कार्यक्षम करावे, पण अधिक कठोर नाही. ती प्रशासनाला माहिती द्यावी, पण माणसाची जागा घेऊ नये. ती वेग वाढवावी, पण माणुसकी कमी करू नये. शहर म्हणजे प्रयोगशाळा नाही. ते एक जिवंत व्यवस्थापन आहे, जिथे भावना, चुकाही आणि सुधारणा सगळे चालतात.

- अजिंक्य देशमुख
 

Web Title : लोकमत एआई: क्या एआई-संचालित शहर इंसानों के लिए हैं या मशीनों के लिए?

Web Summary : एआई शहरों को बदल रहा है, दक्षता में सुधार कर रहा है लेकिन अति-नियंत्रण, असमानता और कम मानव निर्णय लेने के बारे में चिंताएं बढ़ रही हैं। मानव मूल्यों के साथ एआई के लाभों को संतुलित करना वास्तव में स्मार्ट, मानवीय शहरों के लिए महत्वपूर्ण है।

Web Title : Lokmat AI: Are AI-powered cities for humans or machines?

Web Summary : AI transforms cities, improving efficiency but raising concerns about over-control, inequality, and diminished human decision-making. Balancing AI's benefits with human values is crucial for truly smart, humane cities.