Lokmat AI ची अद्भूत दुनिया: स्मार्ट युग : निर्णय आपला की मशीनचा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 13:28 IST2026-03-08T13:27:55+5:302026-03-08T13:28:52+5:30

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: भविष्यात निर्णय घेण्यासाठी जास्त शक्तिशाली कोण ठरणार? माणूस की मशीन?

lokmat ai series a smart era is the decision yours or the machine | Lokmat AI ची अद्भूत दुनिया: स्मार्ट युग : निर्णय आपला की मशीनचा?

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: स्मार्ट युग : निर्णय आपला की मशीनचा?

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: मित्रांनो, आज आपण अशा युगात जगत आहोत जिथे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण तंत्रज्ञानाने वेढलेले असतो. गुगल मॅप्स आपल्याला रस्ता सांगतो, तर युट्यूब आपल्याला कोणते व्हिडीओ पाहायचे याचे पर्याय देतो. म्हणजेच, आपल्या आयुष्यातील छोटे-मोठे निर्णय आता 'मशीन' घेऊ लागली आहेत. पण मग प्रश्न पडतो की, भविष्यात निर्णय घेण्यासाठी जास्त शक्तिशाली कोण ठरणार? माणूस की मशीन?

मानवी मेंदू : निसर्गाची अ‌द्भुत भेट

आपल्या मेंदूमध्ये सुमारे ८६ अब्ज न्यूरॉन्स असतात. हे न्यूरॉन्स सुपरकॉम्प्युटरपेक्षाही वेगाने काम करतात. माणसाच्या निर्णयप्रक्रियेचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे 'विवेक' आणि 'भावना'. समजा, तुमच्या मित्राचा वाढदिवस आहे आणि तुमच्याकडे कमी पैसे आहेत. अशा वेळी मशीन फक्त आकडेमोड करेल, पण तुमचा मेंदू 'मैत्री' आणि 'परिस्थिती' यांचा विचार करून योग्य मार्ग काढेल.

मशीनचा वेग आणि अचूकता

जगात रोज प्रचंड प्रमाणात माहिती तयार होत आहे. ती वाचायला माणसाला अनेक वर्षे लागतील, पण एआय ती काही सेकंदांत वाचू शकते. जसे की आरोग्य क्षेत्रात डॉक्टरांना एखादा आजार ओळखायला वेळ लागू शकतो. पण एआय रिपोर्ट पाहून 90 टक्क्यांपेक्षा जास्त अचूकतेने सांगू शकते की आजार कोणता आहे. हवामान विभागात पाऊस कधी पडणार किंवा चक्रीवादळ कधी येणार, याचा अचूक अंदाज मशीनच्या मदतीने मिळतो. एकंदरीत, मशीनमुळे कामाचा वेग ३० ते ४० टक्क्यांनी वाढतो.

भविष्यातील मंत्र

पुढील काळात आपल्याला मशीनशी स्पर्धा करायची नाही, तर तिचा वापर करून अधिक प्रगती करायची आहे. यास तज्ज्ञ "Human-in-the-loop" म्हणतात. म्हणजेच, डेटा गोळा करण्याचे आणि आकडेमोडीचे काम मशीन करेल, पण त्यावर शेवटची मोहोर आपला 'मानवी विवेक' उमटवेल.

मशीन कुठे कमी पडते?

मशीन जरी हुशार असले, तरी त्याला स्वतःचे मन नसते.

भावनांचा अभाव : मशीनला प्रेम, दया किंवा सहानुभूती समजत नाही.

जबाबदारी : जर मशीनने घेतलेला निर्णय चुकला, तर त्याची जबाबदारी मशीन घेऊ शकत नाही.

कल्पकता : कल्पना सुचणे/कलानिर्मिती करण्यात माणूस आघाडीवर आहे.

The Smart choice

Riya had many choices every day, what to study first, when to play, and how much time to use her phone. Sometimes she felt confused. One day, her teacher showed her a simple Al learning app. The app helped her understand her weak subjects and suggested short study plans. Riya followed the plan but made her own decisions. Slowly, she felt more confident and calm.

Moral: Al can guide us, but the final choice should always be ours.

निष्कर्ष

मशीनकडे 'वेग' आहे, पण माणसाकडे 'दिशा' आहे. मशीनकडे 'माहिती' आहे, पण माणसाकडे 'ज्ञान' आहे. त्यामुळे भविष्यात तोच विद्यार्थी यशस्वी होईल, जो मशीनचा वापर करायला शिकेल आणि सोबतच आपली माणुसकी आणि बुद्धी तल्लख ठेवेल. माणूस मशीनचे साधन नाही!

- अविनाश जाधव (एआय आणि टेक एज्युकेटर)
 

Web Title : एआई की अद्भुत दुनिया: स्मार्ट युग; निर्णय आपका या मशीन का?

Web Summary : एआई ने नेविगेशन से लेकर स्वास्थ्य सेवा तक, निर्णयों को बदल दिया है। एआई गति और सटीकता प्रदान करता है, लेकिन मानवीय निर्णय सहानुभूति और संदर्भ प्रदान करते हैं। विशेषज्ञ डेटा प्रोसेसिंग के लिए एआई को एकीकृत करने का सुझाव देते हैं, नैतिक विकल्पों के लिए मानवीय निरीक्षण बनाए रखते हैं। भविष्य उनका है जो एआई को मानवीय बुद्धि के साथ मिलाते हैं।

Web Title : AI's amazing world: Smart age; decision yours or the machine's?

Web Summary : AI is transforming decisions, from navigation to healthcare. While AI offers speed and accuracy, human judgment provides empathy and context. Experts suggest integrating AI for data processing, retaining human oversight for ethical choices. The future favors those who blend AI with human wisdom.