Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आजची मुले ही एका अशा काळात शिक्षण घेत आहेत, जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), संगणक, मोबाइल, इंटरनेट, रोबोट्स आणि स्मार्ट अॅप्स हे सगळे त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाले आहेत. पूर्वी जे काम माणसे करत होती, त्यांपैकी बरीच कामे आज मशीन करू लागली आहेत. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो की आता माणसाची गरज काय?
पण खरे पाहता, एआय माणसाची जागा मुळीच घेत नाही; तो माणसाच्या कामाची पद्धत बदलतो. या बदलत्या जगात पुढे जाण्यासाठी शाळकरी मुलांनी फक्त पाठांतरावर भर न देता, विचार करण्याची पद्धत, शिकण्याची सवय आणि माणूस म्हणून घडण्याची प्रक्रिया याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. आज शाळेत शिकले जाणारे ज्ञान उद्या कालबाह्य होऊ शकते; पण योग्य कौशल्ये आयुष्यभर आपली साथ देतात.
म्हणूनच एआय युगात टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी शाळकरी मुलांनी काही महत्त्वाची कौशल्ये लहानपणापासूनच अंगिकारली पाहिजेत, जसे की....
तंत्रज्ञानाचा समजूतदार वापर
मोबाइल, गेम्स आणि एआय अॅप्स शिकण्यासाठी वापरावीत; वेळ वाया घालवण्यासाठी नव्हे. एआय आपला मित्र आहे, मालक नाही, हे मुलांनी समजून घेतले पाहिजे.
सतत नवीन शिकण्याची तयारी
'एआय'च्या जगात शिकणे कधीच संपत नाही. दररोज काहीतरी नवीन जाणून घेण्याची जिज्ञासा हे शाळकरी मुलांचे सर्वांत मोठे भांडवल आहे. त्यामुळे नेहमी नवनवीन शिकण्याची तयारी ठेवा.
संवादकौशल्य वाढवणे
आपले विचार शिक्षकांशी, मित्रांशी आणि पालकांशी नीट मांडता येणे ही मोठी ताकद आहे. चांगला संवाद गैरसमज दूर करतो आणि आत्मविश्वास वाढवतो. त्यामुळे इतरांशी नेहमी संवाद करत आपले कौशल्य वाढवले पाहिजे.
भावना समजून घेण्याची क्षमता
'एआय'कडे बुद्धी आहे; पण भावना नाहीत. सहानुभूती, मैत्री, मदत, संयम ही मानवी मूल्ये शाळकरी मुलांनी अवश्य जपली पाहिजेत.
सर्जनशीलता जपणे
चित्रकला, लेखन, कविता, प्रयोग, नव्या कल्पना ही कौशल्ये माणसाला मशीनपेक्षा नेहमीच वेगळे ठरवतात. सर्जनशील मुलांचे भविष्य नेहमी उज्ज्चल असते. त्यामुळे प्रत्येकाने सर्जनशीलता जपायला हवी.
स्वतः विचार करण्याची सवय
एआय उत्तर देतो; पण विचार करण्याची क्षमता मुलांनी स्वतः विकसित करावी लागते. 'हे असंच का घडलं?' 'याचा दुसरा मार्ग काय असू शकतो?' असे प्रश्न विचारणारी मुलेच पुढे जाऊन समस्या सोडवणारे नागरिक बनतात. त्यामुळेच स्वतः विचार करण्याची सवय अंगिकारणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
Skills Students Must Develop in the Al Age
In the age of Artificial Intelligence (Al), students need more than textbook knowledge. They must learn to think independently, stay curious, and keep learning new things. Creativity, communication skills, emotional understanding, and wise use of technology will help students grow, adapt, and succeed in the future.
Moral Al can support learning, but thinking is your power. Strong skills and good values build a bright future.
निष्कर्ष
एआय युगात मशीन हुशार असतील; पण विचार करणारी, संवेदनशील आणि कष्टाळू मुलेच समाज घडवतील. आजची कौशल्येच उद्याचे भविष्य ठरवतात.
- इंजि. अविनाश जाधव (एआय आणि टेक एज्युकेटर)
Web Summary : AI transforms work, not replaces people. Children must develop critical thinking, continuous learning, and strong communication. Emotional intelligence, creativity, and independent thought are vital for success in the AI era, ensuring a brighter future.
Web Summary : एआई काम को बदलता है, लोगों को नहीं। बच्चों को महत्वपूर्ण सोच, निरंतर सीखना और मजबूत संचार विकसित करना चाहिए। भावनात्मक बुद्धिमत्ता, रचनात्मकता और स्वतंत्र विचार एआई युग में सफलता के लिए महत्वपूर्ण हैं, जो एक उज्जवल भविष्य सुनिश्चित करते हैं।