शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! फेसबुकवर रोज 10 लाख अकाऊंट होताहेत ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 09:50 IST

सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक दिवसाला 10 लाख अकाऊंट ब्लॉक करत आहे. आर्टीफिशियल इंटेलिजेंस (AI) आणि मशीन लर्निंग (ML) च्या मदतीने फेसबुक एका दिवसात 10 लाख फेक अकाऊंटवर कारवाई करता आहे.

ठळक मुद्देसोशल नेटवर्किंग साइट फेसबुक दिवसाला 10 लाख अकाऊंट ब्लॉक करत आहे. आर्टीफिशियल इंटेलिजेंस (AI) आणि मशीन लर्निंग (ML) च्या मदतीने फेसबुक एका दिवसात 10 लाख फेक अकाऊंटवर कारवाई करता आहे. गेल्या आठवड्यात फेसबुकने कंपनीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जवळपास 700 पेज, ग्रुप आणि अकाऊंटवर कारवाई केली होती. 

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या समर्थकांचा सोशल मीडियावरील वावर अधिक वाढला आहे. खोटी अकाऊंट्स आणि पेजेसचा वापर करून एकमेकांविरोधात फेक न्यूज आणि चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे. या पार्श्वभूमीवर फेसबुककडून कारवाई करण्यात येत आहे. सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक दिवसाला 10 लाख अकाऊंट ब्लॉक करत आहे. आर्टीफिशियल इंटेलिजेंस (AI) आणि मशीन लर्निंग (ML) च्या मदतीने फेसबुक एका दिवसात 10 लाख फेक अकाऊंटवर कारवाई करत आहे. याआधी गेल्या आठवड्यात फेसबुकने कंपनीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जवळपास 700 पेज, ग्रुप आणि अकाऊंटवर कारवाई केली होती. 

फेसबुक इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि वाइस प्रेसिडेंट अजित मोहन यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 'आम्ही लोकसभा निवडणुकीची विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी कटीबद्ध आहोत. यासाठी स्थानिक संस्था, सरकारी संस्था आणि तज्ञांच्या मदतीने निवडणुकीसाठी काम करत आहोत.' आमची टीम गेल्या दीड वर्षापासून लोकसभा निवडणुकीवर कोणत्याही बाहेरील गोष्टींचा प्रभाव पडू नये आणि निवडणुकीची सत्यता कायम राहावी यासाठी काम करत आहे. तसेच यासाठी तज्ञांची मदत घेतली जात आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरात यासाठी काम केलं जात आहे. 

फेसबुकने काही दिवसांपूर्वीच 'कँडिडेट कनेक्ट' आणि 'शेअर यू वोटेड' या दोन नवीन गोष्टी लाँच केल्या आहेत. कँडिडेट कनेक्टच्या माध्यमातून लोकांना उमेदवारांशी संवाद साधता येणार आहे. त्यासोबतच निवडणुकांशी संबंधित अनेक गोष्टी समजणार आहेत. शेअर यू वोटेडच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केलं आहे हे युजर्स आपल्या मित्रांसोबत शेअर करू शकणार आहेत. सिंगापूर आणि डबलिनच्या आधारावर या आठवड्यात नवीन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या टीममध्ये इंजिनिअर आणि तंत्रज्ञानातील काही तज्ञांचा समावेश असणार आहे. फेसबुकचे कॅलिफोर्निया येथील मुख्यालय आणि दिल्लीतील तज्ञांच्या मदतीने हे काम करण्यात येणार आहे. 

पंतप्रधान मोदींच्या नमो अ‍ॅपशी संबंधित 15 पेजेस आणि अकाऊंट्सवर फेसबुकची कारवाई सोशल मीडियावर फेक न्यूज आणि माहिती पसरवणाऱ्यांवर फेसबूककडून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू असून, फेसबुकने काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नमो अ‍ॅपशी निगडित असेल्या एका आयटी कंपनीशी संबंधित पेज आणि अकाऊंट्सवर कारवाई केली होती. नमो अ‍ॅपशी निडडित असलेल्या सिल्व्हर टच या आयटी कंपनीशी संबंधित असलेली 15 पेज आणि अकाऊंट्स फेसबुकवरून हटवण्यात आली आहेत. 

फेसबुकने हटवली काँग्रेसच्या आयटी सेलशी संबंधित 687 पेजेस आणि अकाऊंट्सफेसबुकने काँग्रेसच्या आयटी सेलशी संबंधित असलेल्या अकाऊंट्स आणि पेजेसव याआधी मोठी कारवाई केली आहे. आक्षेपार्ह भाषेचा वापर असलेल्या तसेच निलंबित करण्यात आलेली सुमारे 687 फेसबूक पेजेस आणि अकाऊंट्स फेसबूकने हटवली होती. ''आमच्या स्वयंचलिक प्रणालीने आधीच हेरलेल्या आणि निलंबित केलेल्या सुमारे 687 फेसबूक अकाऊंट्स आणि पेजेसवर आम्ही कारवाई करताना ही पेजेस आणि अकाऊंट्स हटवली आहेत. या पेजेसवर प्रकाशित माहितीमुळे नव्हे तर अप्रामाणिक माहितीमुळे कारवाई करण्यात आली आहे. ही पेजेस आणि अकाऊंट्स वैयक्तिकरीत्या काँग्रेसच्या आयटी सेलशी निगडित होती,'' असे फेसबुकने या कारवाईबाबत माहिती देताना म्हटलं होतं.  

फेसबुक मागत आहे युजर्सकडून ई-मेलचा पासवर्ड, 'हे' आहे कारणफेसबुकच्या करोडो युजर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. 60 कोटी युजर्सचा पासवर्ड फेसबुकमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती पडला त्यामुळे युजर्सची प्रायव्हसी धोक्यात आली होती. युजर्सचा डेटा चोरीला गेल्याची बाब समोर असतानाच आता कोट्यवधी फेसबुक युजर्सचा डेटा अ‍ॅमेझॉन क्लाउड सर्व्हरवर लीक झाला आहे. दरम्यान फेसबुक आपल्या प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या युजर्सकडे त्यांच्या ई-मेलचा पासवर्ड मागत आहे. 

डेलीबीस्टच्या एका रिपोर्टनुसार, फेसबुकने काही युजर्सना त्यांच्या लॉग इन पेजवर एक मेसेज केला आहे. त्यामध्ये युजर्सना त्यांच्या पर्सनल ई-मेलचा पासवर्ड द्यावा लागत आहे. मात्र ज्या आयडीने हे फेसबुक अकाऊंट ओपन केलं आहे तो पासवर्ड देणं गरजेचं आहे. फेसबुक अकाऊंट सुरू करण्यासाठी तुम्हाला तुमचा ई-मेल आय डी द्यावा लागेल. त्यानंतर एका फॉर्मच्या माध्यमातून युजर्सना त्यांचा पासवर्ड विचारला जात आहे. याआधी युजर्सने अन्य डिवाईसवरून अकाऊंट ओपन केल्यास अशा प्रकराचे पर्याय मिळत होते. आम्हाला माहित आहे की अकाऊंट सुरक्षिततेसाठी पासवर्ड व्हेरिफीकेशनचा हा मार्ग बेस्ट नाही आहे. त्यामुळे आम्ही तो बंद करण्याचा विचार करत असल्याचं फेसबुकने म्हटलं आहे. त्यामुळे अकाऊंटच्या अधिक सुरक्षिततेसाठी यासारखाच एक नवा पर्याय निवडण्यासाठी फेसबुक आपल्या प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या युजर्सकडे त्यांचे पासवर्ड मागत असल्याची माहिती मिळत आहे. 

Facebook अकाऊंट दुसरं कोणी लॉग इन करेल याची भीती वाटते?; 'हे' फीचर करणार अलर्टफेसबुक युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. फेसबुक काही वेळा चुकून लॉग इन राहीलं तर अनेकदा त्याचा चुकाचा वापर केला जाण्याची शक्यता ही अधिक असते. मात्र फेसबुकमध्ये एक असं फीचर आहे ज्याच्या मदतीने युजर्स अकाऊंट सुरक्षित ठेवू शकतात. Facebook च्या सेटिंग में Extra Security देण्यासाठी युजर्सना एक फीचर देण्यात आले आहे.

- फेसबुकने दिलेले हे फीचर अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी सर्वप्रथम आपलं फेसबुक अकाउंट ओपन करा. 

- ओपन केल्यानंतर उजव्या बाजूला तीन डॉट दिसतील त्यावर क्लिक करा. 

- क्लिक केल्यानंतर सेटींगचा एक पर्याय मिळेल. त्यावर क्लिक केल्यास एक नवं पेज ओपन होईल. 

- मल्टीपल ऑप्शन त्यामध्ये देण्यात आलेले असतील. त्यातील  Security & Login वर जा.

- थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर ‘Setting Up Extra Security’ चा एक पर्याय मिळेल त्यावर क्लिक करा. 

-  ‘Get Alerts about unrecognized logins’ हा पर्याय दिसेल. तसेच त्याच्यासमोर Edit चे बटण असणार आहे. 

- पर्यायावर क्लिक केल्यानंतर तेथे ‘Notification’, ‘Messenger’ आणि ‘Email’ हे तीन पर्याय दिसतील. 

- तिन्ही पर्यायासमोर ‘Get Notifiation’ आणि ‘Don’t Get Notifiation’ असे आणखी दोन पर्याय दिसतील.  

- यामध्ये युजर्सना  ‘Get Notifiation’ वर टिक करून Enable करावं लागेल. त्यानंतर Save Changes वर क्लिक करा.

फेसबुक संदर्भातील ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीने तुमचं फेसबुक अकाऊंट लॉग इन केलं तर तुम्हाला त्याबाबत अलर्ट दिला जाईल.  

टॅग्स :FacebookफेसबुकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकtechnologyतंत्रज्ञान