Google Fine: तुम्हाला वाटत असेल की, तुमचा डेटा Google कडे सुरक्षित आहे, पण असे नाही. गुगलकडून युजर्सना अनेक अॅप्स आणि सेवा दिल्या जातात, परंतु तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की, कंपनी तुमच्या परवानगीशिवाय तुमचा डेटा आणि लोकेशन ट्रॅक करते. याप्रकरणी गुगलला मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.
गुगलला मोठा दंडअमेरिकेतील टेक्सास राज्याने गुगलवर दावा दाखल केला होता की, कंपनी गुप्तपणे युजर्सचा डेटा गोळा करते. या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने आता गुगलवर मोठा दंड ठोठावला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुगलने 11,740 कोटी रुपये (सुमारे 1.375 अब्ज डॉलर्स) देण्याचे मान्य केले आहे. कंपनी युजर्सच्या वैयक्तिक माहितीचा चुकीच्या पद्धतीने वापर करत असल्याने कंपनीवर हा दंड ठोठावण्यात आला आहे.
कोणी खटला दाखल केला?2022 मध्ये टेक्सासचे अॅटर्नी जनरल केन पॅक्सटन यांनी पहिल्यांदा हा खटला दाखल केला होता, ज्यामध्ये कंपनी परवानगीशिवाय लोकेशन डेटा, खाजगी ब्राउझिंग हिस्ट्री आणि अगदी चेहऱ्यावरील बायोमेट्रिक तपशील यासारखी वैयक्तिक माहिती गोळा करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी गुगलवर मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गोपनीयता कायद्यांचे उल्लंघन केल्याबद्दल गुगलने दिलेली ही मोठी रक्कम आहे.
यापूर्वीही असे घडले...टेक्सासने इतकी मोठी कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मेटा कंपनीला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फेशियल रेकग्निशन डेटा वापरल्याबद्दल 1.4 अब्ज डॉलर्स (सुमारे 11980 कोटी रुपये) दंड ठोठावण्यात आला होता.