शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअॅपची 'ही' लिंक ठरू शकते घातक, चुकून पण करू नका 'या' गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 12:12 IST

व्हॉट्सअॅपचा जास्त वापर करत असाल तर जरा सावधान कारण ते तुमच्यासाठी घातक ठरू शकतं.

नवी दिल्ली - व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं एक उत्तम आणि प्रभावी माध्यम असून जगभरात सर्वाधिक वापरण्यात येणारे चॅटिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅपच्या लोकप्रियतेमुळेच व्हॉट्सअॅपही युजर्सला नेहमीच नवनवीन फिचर्सची सेवा उपलब्ध करून देत असतं. मात्र तुम्ही जर व्हॉट्सअॅपचा जास्त वापर करत असाल तर जरा सावधान कारण ते तुमच्यासाठी घातक ठरू शकतं.

व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या एखादी लिंक अथवा फोटोच्या माध्यमातून तुमची माहिती लीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कोणत्याही अनोळखी नंबरवरून एखादा मॅसेज आल्यास त्यामध्ये असलेल्या लिंकवर क्लिक करण्याआधी थोडा विचार करा. सोशल मीडिया आणि स्मार्टफोनच्या माध्यमातून लोक स्मार्ट झालेत. मात्र सायबर क्राईमचा धोकाही वाढला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या सक्रीय यूजर्सची माहिती ट्रेस करणं आता तंत्रज्ञानामुळे सहज शक्य झाले आहे. त्यामुळे स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर करताना सजग असणं गरजेचं आहे. 

असा निर्माण होतो लिंकमुळे धोका

- एखादा स्टॉकर किंवा सायबर गुन्हेगार हा अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअॅपवर मॅसेज करतो. त्या मॅसेजमध्ये एक लिंक देण्यात आलेली असते. या लिंकवर क्लिक केल्यास तुम्ही स्टॉकरच्या जाळ्यात फसू शकता. 

- ही लिंक दिसताना गूगल लिंकप्रमाणेच दिसते. तसेच या लिंकमध्ये एखाद्या बॉलिवूड कलाकाराचा फोटो अथवा सरकारच्या योजनेबाबत माहिती दिलेली असते. त्यामुळे लोक त्याविषयीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करतात.

- लिंकवर क्लिक केल्यानंतर कोणताही एखादा फनी फोटो किंवा क्लिप ओपन होते. तुम्ही हा मॅसेज त डीलीट करा किंवा नाही. त्याआधी तुमच्या लोकेशनची माहिती ही स्टॉकरला समजते. 

- स्टॉकर आयपी लॉगर क्लाइंटच्या माध्यमातून मल्टीमीडिया फाईलची एक लिंक तयार करतो. 

- तयार करण्यात आलेली लिंक ही मॅसेजच्या माध्यमातून पाठवली जाते. ही आकर्षक असल्याने तुम्ही या लिंकवर क्लिक करता. त्यामुळे स्टॉकरकडे तुमचा आयपी अॅड्रेस पोहोचतो. 

- याच पद्धतीने स्टॉकर तुमची वैयक्तिक माहिती मिळवू शकतो. तुमचं गाव, तुमच्या आसपास असलेले मोबाईल टॉवर यासारख्या अनेक गोष्टींची माहिती स्टॉकरला मिळवणं सहज शक्य असतं. त्यामुळेच तुमच्या माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता अधिक असते.  

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅप