शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

एलजी व्ही 30च्या आगमनाची नांदी : जाणून घ्या सर्व फिचर्स व मूल्य

By शेखर पाटील | Published: November 27, 2017 10:58 AM

एलजी कंपनीचा एलजी व्ही 30 हा प्रिमीयम श्रेणीतील स्मार्टफोन येत्या काही दिवसांमध्ये भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात येईल असे संकेत मिळाले आहेत.

ठळक मुद्देएलजी व्ही 30 या स्मार्टफोनचे बर्लिन येथे झालेल्या आयएफएमध्ये अनावरण करण्यात आले होते.मॉडेल अमेरिकेसह अन्य राष्ट्रांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. आता भारतीय ग्राहकांना हे मॉडेल डिसेंबर महिन्यात सादर करण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

एलजी व्ही 30 या स्मार्टफोनचे बर्लिन येथे झालेल्या आयएफएमध्ये अनावरण करण्यात आले होते. यानंतर हे मॉडेल अमेरिकेसह अन्य राष्ट्रांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. आता भारतीय ग्राहकांना हे मॉडेल डिसेंबर महिन्यात सादर करण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती असून याचे मूल्य 47 हजार 990 रूपये असू शकते. या संदर्भात फोन रडार या टेक पोर्टलच्या वृत्तांतानुसार एलजी व्ही 30 सोबत बँग अँड ओल्फसन या कंपनीचा हेडफोन मोफत देण्यात येणार आहे. 

एलजी व्ही 30 या स्मार्टफोनमध्ये ६ इंच आकारमानाचा 18:9 हे गुणोत्तर असणारा क्युएचडी म्हणजेच 1440 बाय 2880 पिक्सल्स क्षमतेचा ओएलईडी डिस्प्ले असेल. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 635 प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम चार जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज 64 जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने दोन टेराबाईटपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीवर चालणारे असून यात लवकरच ओ या आवृत्तीचे अपडेट मिळणार आहे. 

एलजी व्ही 30 या मॉडेलमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. अर्थात याच्या मागील बाजूस 16 व 13 मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे आहेत. तर यातील फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सल्सचा असेल. याच्या मुख्य कॅमेर्‍यात सिने व्हिडीओ हे विशेष फिचर देण्यात आले आहे. यात 16 विविध फिल्टर्स देण्यात आले आहेत. याशिवाय, यात पॉइंट झूम हे फिचर असेल. यामुळे व्हिडीओ चित्रीकरण करताना स्क्रीनवरील कोणत्याही बिंदूपर्यंत झूम करता येणार आहे. याच्या मुख्य कॅमेर्‍यात क्रिस्टल क्लिअर या प्रकारातील लेन्स असेल. मल्टीमिडीयाच्या चांगल्या अनुभुतीसाठी यात हाय-फाय क्वॉड डीएसी हे फिचर देण्यात आले आहे. तर डिजीटल मायक्रोफोनमुळे दर्जेदार ध्वनीमुद्रण करता येणार आहे. एलजी व्ही 30 या मॉडेलमध्ये वायरलेस चार्जींगसह 3300 मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ आणि डस्ट रेझिस्टंट आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल