एलजी सादर करणार लॅपटॉपची नवीन मालिका

By शेखर पाटील | Published: December 26, 2017 11:11 AM2017-12-26T11:11:26+5:302017-12-26T12:54:45+5:30

एलजी कंपनीने ग्राम या मालिकेतील लॅपटॉप सादर करण्याची जाहीर केले असून सीईएसमध्ये याला प्रदर्शीत करण्यात येणार आहे.

LG launches new series of laptops | एलजी सादर करणार लॅपटॉपची नवीन मालिका

एलजी सादर करणार लॅपटॉपची नवीन मालिका

googlenewsNext

एलजी कंपनीने ग्राम या मालिकेतील लॅपटॉप सादर करण्याची जाहीर केले असून सीईएसमध्ये याला प्रदर्शीत करण्यात येणार आहे.

लास व्हेगास शहरात होणार्‍या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शो म्हणजेच सीईएस-२०१८मध्ये अनेक कंपन्या आपापली नवीन उत्पादने प्रदर्शीत करणार आहेत. यात एलजी कंपनी आपल्या अन्य उत्पादनांसोबत ग्राम या मालिकेतील लॅपटॉपही सादर करणार असल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. पहिल्यांदा हे लॅपटॉप अमेरिकेत उपलब्ध करण्यात येतील. तर यानंतर लागलीच भारतासह अन्य राष्ट्रांमध्ये याला लाँच करण्यात येणार आहे. हे सर्व लॅपटॉप्स इंटेलच्या आठव्या पिढीतील अद्ययावत कोअर आय-७ आणि आय-५ या प्रोसेसरवर चालणारे असतील. यात एसएसडी म्हणजेच सॉलीड स्टेट ड्राईव्ह प्रकारातील स्टोअरेज असेल. याला अतिरिक्त स्लॉटची जोड दिलेली असल्याने स्टोअरेज वृध्दींगत करणे शक्य असेल. या सर्व मॉडेल्ससोबत ब्लॅकलीट या प्रकारातील डिस्प्ले दिलेला असेल. तसेच सराऊंड साऊंड आणि मल्टी-चॅनल साऊंड या तंत्रज्ञानाने युक्त असणारा हेडफोनही या मॉडेल्ससोबत देण्यात येणार आहे. यात फिंगरप्रिंट स्कॅनर आणि थंडरबोल्ट-३ पोर्टदेखील दिलेले असेल.

एलजी कंपनीच्या या आगामी मॉडेल्समध्ये १३.३, १४ आणि १५.६ इंच आकारमानाच्या डिस्प्लेंचा समावेश असेल. या सर्व मॉडेल्समध्ये ७२ वॅट क्षमतेची बॅटरी असेल. ती एकदा चार्ज केल्यानंतर विविध मॉडेल्सनुसार १९ ते २२.५ तासांचा बॅकअप देणार असल्याचा दावा एलजी कंपनीने केला आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे अमेरिकन लष्करातील उपकरणांचे मानक असणार्‍या एमआयएल-एसटीडी ८१०जी या मानकातील निकष यात पूर्ण करण्यात आले आहेत. यामुळे हे लॅपटॉप्स अगदी गोठलेल्या आणि अतितप्त या दोन्ही वातावरणांमध्ये सहजपणे वापरता येतील असे एलजी कंपनीने नमूद केले आहे. यातील अन्य फिचर्स आणि मूल्याबाबत सीईएस-२०१८मध्ये माहिती देण्यात येणार आहे.

Web Title: LG launches new series of laptops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.