शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

लेनोव्होतर्फे दोन संगणक व एक बिझनेस लॅपटॉपची घोषणा

By शेखर पाटील | Published: November 20, 2017 11:45 AM

लेनोव्हो कंपनीने जागतिक बाजारपेठेत आपले थिंकस्टेशन पी५२० आणि थिंकस्टेशन पी५२०सी हे दोन संगणक तसेच थिंकपॅड पी५२एस या बिझनेस लॅपटॉप उतारण्याची घोषणा केली आहे.

ठळक मुद्देथिंकस्टेशन मालिकेतील संगणक हे अतिशय उत्तमोत्तम फिचर्सने सज्ज असून ते वर्कस्टेशन म्हणून उपयोगात आणणे शक्य आहे.यात प्रामुख्याने १८ कोअर इंटेल झेनॉन डब्ल्यू सेरीज या अतिशय गतीमान प्रोसेसरचा समावेश आहेयाच्या मदतीने अतिशय उच्च ग्राफीक्सयुक्त फंक्शनही यावरून अगदी सुलभपणे करता येतात

लेनोव्हो कंपनीने जागतिक बाजारपेठेत आपले थिंकस्टेशन पी५२० आणि थिंकस्टेशन पी५२०सी हे दोन संगणक तसेच थिंकपॅड पी५२एस या बिझनेस लॅपटॉप उतारण्याची घोषणा केली आहे.

थिंकस्टेशन मालिकेतील संगणक हे अतिशय उत्तमोत्तम फिचर्सने सज्ज असून ते वर्कस्टेशन म्हणून उपयोगात आणणे शक्य आहे. या दोन्ही डेस्कटॉप कंप्युटरमधील काही फिचर्स समान आहेत. यात प्रामुख्याने १८ कोअर इंटेल झेनॉन डब्ल्यू सेरीज या अतिशय गतीमान प्रोसेसरचा समावेश आहे. याच्या मदतीने अतिशय उच्च ग्राफीक्सयुक्त फंक्शनही यावरून अगदी सुलभपणे करता येतात. यातील थिंकस्टेशन पी५२० मॉडेलमध्ये ४ एक्स २४ जीबी इनव्हिडीया क्वाड्रो पी६००० हा जीपीयू असेल. तर थिंकस्टेशन पी५२०सी या मॉडेलमध्ये २एक्स १६ जीबी जीपीयू आहे. पहिल्या मॉडेलमधील रॅम ३२ जीबीपर्यंत तर दुसर्‍यातील १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. थिंकस्टेशन पी५२० मधील स्टोअरेज २५६ ती दुसर्‍यातील १२८ जीबी असेल.

थिंकस्टेशन पी५२० आणि थिंकस्टेशन पी५२०सी या दोन्ही मॉडेल्समध्ये विंडोज १० तसेच उबंटू लिनक्स वा सर्टीफाईड रेडहॅट लिनक्स ही प्रणाली देण्यात आलेली आहे. यातील हव्या त्या प्रणालीचा युजर वापर करू शकतो. यांच्या पुढील बाजूस ४ युएसबी ३.१ टाईप-ए, थंडरबोल्ट ३ टाईप-सी, मायक्रोफोन/हेडफोन जॅक आदी दिलेले आहेत. तर मागील बाजूस ४ युएसबी ३.१ टाईप-ए, दोन युएसबी २.०, एक गिगाबीट इथरनेट, ९-इन-१ मीडिया कार्ड रीडर/१५-इन-१ मीडिया कार्ड रीडर, ऑडिओ इनलाईन व आऊटलाईन व मायक्रोफोनचे पोर्ट असतील. 

तर लेनोव्हो थिंकपॅड पी५२ एस या बिझनेस लॅपटॉपमध्येही अनेक सरस फिचर्स आहेत. यात १५.६ इंच आकारमानाचा आणि फोर-के अल्ट्रा हाय डेफिनेशन क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले असेल. मात्र याच्या जोडीला हा लॅपटॉप फुल एचडी क्षमतेच्या डिस्प्लेच्या पर्यायातही ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. याच्या विविध व्हेरियंटमध्ये इंटेलच्या आठव्या पिढीतील कोअर आय-५ आणि आय-७ प्रोसेसर दिलेले आहेत. यात ३२ जीबीपर्यंतच्या रॅमचे पर्याय असून याला एनव्हिडीयाच्या क्वाड्रो पी५०० या ग्राफीक कार्डची जोड असेल. तर यात तब्बल २ जीबीपर्यंतच्या स्टोअरेजचे पर्याय देण्यात आले आहेत. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्कचा सपोर्ट देण्यात आला आहे. यामुळे यात गतीमान इंटरनेटचा वापर करता येईल. याच्या जोडीला यात वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, युएसबी, युएसबी टाईप-सी, एचडीएमआय, थंडरबोल्ट, हेडफोन/मायक्रोफोन जॅक, डॉकींग कनेक्टर आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. 

लेनोव्होतर्फे अद्याप या मॉडेल्सचे मूल्य जाहीर केले नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार हे तिन्ही मॉडेल्स लवकरच भारतीय ग्राहकांना सादर करण्यात येणार आहेत. 

टॅग्स :Lenovoलेनोव्होlaptopलॅपटॉपtechnologyतंत्रज्ञान