शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

MWC 2022: अगदी छोटे डिटेल्सही दिसतील या 10.61 इंचाच्या 2K डिस्प्लेवर; दमदार बॅटरीसह Lenovo चा फाडू टॅब आला 

By सिद्धेश जाधव | Published: February 28, 2022 7:59 PM

MWC 2022: Lenovo नं यंदाच्या मोबाईल वर्ल्ड कांग्रेस (MWC 2022) मध्ये आपला नवीन टॅब Lenovo Tab M10 Plus 3rd Generation लाँच केला आहे.

Lenovo नं देखील यंदाच्या मोबाईल वर्ल्ड कांग्रेस (MWC 2022) मध्ये आपला दम दाखवला आहे. कंपनीनं आपला नवीन टॅब Lenovo Tab M10 Plus 3rd Generation लाँच केला आहे. यात 6 जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या टॅबच्या बेस व्हेरिएंटची किंमत 249 यूरो (सुमारे 20,900 रुपये) आहे. लवकरच काही निवडक देशांमध्ये याची विक्री सुरु होईल.  

Lenovo Tab M10 Plus 3rd Generation चे स्पेसिफिकेशन 

या टॅबमध्ये 10.61-इंचाचा 2K रिजोल्यूशन असलेला आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 400 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. हा टॅब Precision Pen 2 सह बाजारात येतो. दमदार साऊंडसाठी यात क्वॉड स्पिकरसह डॉल्बी अ‍ॅटमॉस साऊंडला सपोर्ट मिळतो. कंपनीनं याचे फ्रॉस्ट ब्लू आणि स्टॉर्म ग्रे कलर ऑप्शन सादर केले आहेत. 

कंपनीनं टॅबच्या वाय-फाय मॉडेलमध्ये मीडियाटेक G80 चिपसेटचा वापर केला आहे. तर स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट वाय-फाय+एलटीई मॉडेलमध्ये आहे. सोबत 6 जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा अँड्रॉइड 12 ओएसवर चालतो.टॅबच्या बॅक पॅनलवर 8 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. फ्रंटला देखील 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी 7700mAh ची मोती बॅटरी देण्यात आली आहे. जी 20 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

हे देखील वाचा:

टॅग्स :Lenovoलेनोव्होtabletटॅबलेटAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान