MWC 2022: बड्या कंपन्यांच्या यादीत Realme चा देखील समावेश; जागतिक बाजारात सादर केली सर्वात शक्तिशाली सीरिज 

By सिद्धेश जाधव | Published: February 28, 2022 07:11 PM2022-02-28T19:11:15+5:302022-02-28T19:11:39+5:30

Realme GT 2 Pro आणि Relame GT 2 असे दोन जबरदस्त मॉडेल कंपनीनं MWC 2022 च्या मंचावरून सादर केले आहेत.  

MWC 2022 Realme GT 2 Series Launched Globally Price Specifications Features India Availability  | MWC 2022: बड्या कंपन्यांच्या यादीत Realme चा देखील समावेश; जागतिक बाजारात सादर केली सर्वात शक्तिशाली सीरिज 

MWC 2022: बड्या कंपन्यांच्या यादीत Realme चा देखील समावेश; जागतिक बाजारात सादर केली सर्वात शक्तिशाली सीरिज 

Next

Realme  नं मोबाईल वर्ल्ड कांग्रेस (MWC 2022) च्या मंचावरून Realme GT 2 Series जागतिक बाजारात लाँच केली आहे. या सीरिजमध्ये कंपनीनं Realme GT 2 आणि GT 2 Pro असे दोन मोबाईल ग्राहकांच्या भेटीला आणले आहेत. यातील स्टँडर्ड मॉडेलमध्ये Snapdragon 888 प्रोसेसर आहे आणि प्रो मॉडेलमध्ये Snapdragon 8 Gen 1 चिपसेट मिळतो. प्रो मॉडेलमधील Paper Tech Master व्हेरिएंट Naoto Fukasawa सह भागीदारी करून बनवण्यात आली आहे.  

Realme GT 2 Pro चे स्पेसिफिकेशन 

शक्तिशाली Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट realme GT 2 Pro स्मार्टफोनची खासियत म्हणता येतील. हा फोन अँड्रॉइड 12 ओएस आधारित रियलमी युआय 3.0 वर चालतो. कंपनीनं यात 12GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज देखील दिली आहे. या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी 65W SuperDart फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. 

रियलमी जीटी 2 प्रो स्मार्टफोन 2K LTPO AMOLED डिस्प्लेसह येणारा जगातील पहिला स्मार्टफोन आहे. हा एक 1440 x 3216 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.7 इंचाचा डिस्प्ले आहे. जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट, 1000हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट, 1400निट्स ब्राईटनेस, 5000000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो आणि 1.07 बिलियन कलरला सपोर्ट करतो. कंपनीनं या डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा दिली आहे.  

फोटोग्राफीसाठी हा फ्लॅगशिप रियलमी फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सोनी आयएमएक्स766 सेन्सर आहे. सोबत 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. समोर 32 मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स615 सेन्सर सेल्फी कॅमेऱ्याचे काम करतो. 

Realme GT 2 चे स्पेसिफिकेशन्स  

Realme GT 2 5G फोन बेसिक कनेक्टिव्हिटीफीचर्ससह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 2,500एमएएचच्या दोन बॅटरीज देण्यात आल्या आहेत. ज्यात मिळून 5,000एमएएचची पॉवर देतात. ही बॅटरी 65वॉट फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करते.    

रियलमी जीटी 2 स्मार्टफोन 6.62 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं या डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा दिली आहे. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित रियलमी युआय 3.0 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट आणि एड्रेनो 660 जीपीयूला देण्यात आला आहे. फोनमध्ये 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंत UFS 3.1 इंटरनल स्टोरेज मिळेल. 

फोटोग्राफीसाठी रियलमी जीटी 2 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सोनी आईएमएक्स776 सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स471 सेन्सर फ्रंट कॅमेरा म्हणून देण्यात आला आहे. 

Realme GT 2 Series ची किंमत 

Realme GT 2 Pro ची किंमत युरोपियन बाजारात 649 युरो अर्थात सुमारे 55,000 रुपये आहे. तर Realme GT 2 ची किंमत 449 युरो, म्हणजे 38,000 रुपये ठेवण्यात आली आहे. लवकरच ही सीरिज भारतासह मध्य पूर्व, दक्षिण पूर्व आशिया आणि लॅटिन अमेरिकेत सादर केली जाईल.  

हे देखील वाचा:

Web Title: MWC 2022 Realme GT 2 Series Launched Globally Price Specifications Features India Availability 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.