Lava Probuds N11: अवघ्या ११ रुपयांत मिळतोय Bluetooth Earphone, कुठून आणि कसा खरेदी कराल? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 03:06 PM2022-09-10T15:06:48+5:302022-09-10T15:07:21+5:30

लावा कंपनीनं नवे इअरफोन्स लॉन्च केले आहेत की जे अत्यंत कमी किमतीत विकत घेण्याची नामी संधी कंपनीनं उपलब्ध करुन दिली आहे.

lava probuds n11 price in india first sale on amazon earphone | Lava Probuds N11: अवघ्या ११ रुपयांत मिळतोय Bluetooth Earphone, कुठून आणि कसा खरेदी कराल? जाणून घ्या...

Lava Probuds N11: अवघ्या ११ रुपयांत मिळतोय Bluetooth Earphone, कुठून आणि कसा खरेदी कराल? जाणून घ्या...

googlenewsNext

लावा कंपनीनं नवे इअरफोन्स लॉन्च केले आहेत की जे अत्यंत कमी किमतीत विकत घेण्याची नामी संधी कंपनीनं उपलब्ध करुन दिली आहे. कंपनीनं बजेट सेगमेंटसाठी Lava Probuds N11 हे वायरलेस इअरफोन्स लॉन्च केले आहेत. कंपनीच्या दाव्यानुसार या इअरफोन्स नेकबँकमध्ये चांगली बॅटरी लाइफ आणि उत्तम कॉलिंग सुविधा देण्यात आली आहे. 

कंपनीच्या एन-सीरीजमधले हे दुसरे इअरफोन्स आहेत. याआधी कंपनीनं याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात Lava Probuds N3 लॉन्च केले होते. आता Lava Probuds N11 मध्ये ड्युअल हॉलस्विच फंक्शन मिळणार आहे. कंपनीच्या दाव्यानुसार इअरफोन्समध्ये ४२ तास चालेल अशी बॅटरी लाइफ सिंगल चार्जमध्ये मिळणार आहे. 

Lava Probuds N11 ची किंमत
लावा कंपनीनं Probuds N11 ची किंमत १,४९९ रुपये इतकी ठेवली आहे. पण याची इंट्रोडक्टरी किंमत कंपनीनं अत्यंत खास ऑफरसहीत जाहीर केली आहे. सध्या कंपनी हे इअरफोन्स अवघ्या ११ रुपयांना विकत घेण्याची संधी ग्राहकांना देत आहे. १० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता Amazon वर विक्रीसाठी हे इअरफोन्स उपलब्ध होणार आहे. तर लावाचे हेच इअरफोन्स तुम्हाला १३ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर या कालावधीत ९९९ रुपयांना विकत घेता येणार आहेत. १७ सप्टेंबरपासून तुम्हाला या इअरफोनसाठी १,४९९ रुपये खर्च करावे लागतील. नेकबँकवर तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी मिळणार आहे. तसंच सोबत युझर्सना Gaana अॅपचं सब्सक्रिप्शन देखील देण्यात येत आहे. इअरफोन्स तुम्हाला Kai Orange, Firefly Green आणि Panther Black रंगात उपलब्ध आहेत.  
 

Web Title: lava probuds n11 price in india first sale on amazon earphone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.