शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

अबब! 120 तासांच्या स्टॅन्डबाय टाइमसह स्वदेशी कंपनीचे ईयरफोन्स लाँच; फक्त 1,199 रुपयांमध्ये उपलब्ध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 19:25 IST

Lava Probuds N2: लावा प्रोबड्स एन2 ची किंमत 1,199 रुपये ठेवण्यात आली आहे. हे नेकबँड इयरफोन्स ब्लॅक आणि टील कलरमध्ये लावा ई-स्टोर, अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून विकत घेता येतील.  

Lava नं भारतात आपले नवीन नेकबँड ईयरफोन्स Probuds N2 लाँच केले आहेत. या इयरफोन्सची खासियत म्हणजे यात मिळणारा 120 तासांचा स्टॅन्डबाय टाइम. तसेच यात 10mm ड्रायव्हर्स, ब्लूटूथ 5.0 कनेक्टिविटी आणि IPX4 रेटिंग असे फीचर्स देण्यात आले आहेत. लावा प्रोबड्स एन2 ची किंमत 1,199 रुपये ठेवण्यात आली आहे. हे नेकबँड इयरफोन्स ब्लॅक आणि टील कलरमध्ये लावा ई-स्टोर, अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून विकत घेता येतील.  

Lava Probuds N2 चे स्पेसिफिकेशन्स 

Lava Probuds N2 नेकबँडमध्ये ड्युअल डिवाइस कनेक्टिविटी देण्यात आली आहे. त्यामुळे एकाच वेळी दोन डिवाइस या इयरफोन्सशी कनेक्ट करता येतात. तर कॉल अलर्ट फिचर आलेल्या कॉलची माहिती देतो. यातील 110mAh ची बॅटरी सिंगल चार्जमध्ये 4 तासांचा प्लेबॅक टाइम देते. हे इयरफोन्स 20 मिनिटांत फुल चार्ज होतात. तसेच हे इयरफोन्स 120 तासांचा स्टॅन्डबाय टाइम देतात. 

हे इयरफोन्स दीर्घकाळ वापरता यावे म्हणून अर्गोनोमिक डिजाइनसह सादर करण्यात आले आहेत. Probuds N2 मधील 10mm डायनॅमिक ड्रायव्हर्स चांगला बास देतात. तर यातील ब्लूटूथ v5.0 कनेक्टिविटी 10 मीटर पर्यंतची रेंज देते. यातील मॅग्नेटिक लॉक्स वापरून इयरबड्स एकत्र ठेवतो. तर इयरफोन्समधील इनबिल्ट पॅनल कंट्रोलच्या मदतीने एंटरटेनमेंट आणि ऑफिस कॉल्स कंट्रोल करता येतात.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञान