लॉन्च झाला 12GB रॅमचा स्वस्त फोन! कमी किमतीत मिळतील दमदार फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 16:21 IST2026-03-13T16:20:36+5:302026-03-13T16:21:28+5:30

Lava Bold 2 5G: जाणून घ्या या फोनचे फीचर्स...

Lava Bold 2 5G: Cheap phone with 12GB RAM launched! Powerful features at a low price | लॉन्च झाला 12GB रॅमचा स्वस्त फोन! कमी किमतीत मिळतील दमदार फीचर्स...

लॉन्च झाला 12GB रॅमचा स्वस्त फोन! कमी किमतीत मिळतील दमदार फीचर्स...

Lava Bold 2 5G : 15 हजार रुपयांच्या बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन शोधणाऱ्या ग्राहकांसाठी भारतीय कंपनी Lava ने आपला नवीन बजेट 5G स्मार्टफोन Lava Bold 2 5G लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसर, 120Hz AMOLED डिस्प्ले आणि 50 मेगापिक्सल कॅमेरा यांसारखी आकर्षक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

किंमत किती?

या स्मार्टफोनचा 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 12,999 रुपयांत लॉन्च करण्यात आला आहे. ही किंमत बँक ऑफर्सनंतर लागू होणारी असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. फोनची विक्री 19 मार्च रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे. ग्राहकांना हा स्मार्टफोन अमेझॉन या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे. हा फोन Midnight Black आणि Feather White या दोन रंगांमध्ये खरेदी करता येईल.

या फोनMr कडवी स्पर्धा

या किंमत श्रेणीत Motorola G57 Power 5G, Redmi Note 14 SE 5G, POCO M7 Plus 5G, Samsung Galaxy F06 5G आणि Vivo T4x 5G या स्मार्टफोन्सशी Lava Bold 2 5G ची थेट स्पर्धा असेल.

Lava Bold 2 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले: फोनमध्ये 6.67 इंच Full HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो.

प्रोसेसर: या स्मार्टफोनमध्ये 2.6GHz स्पीडसह MediaTek Dimensity 7060 प्रोसेसर देण्यात आला आहे.

कॅमेरा: फोनच्या मागील बाजूला 50 मेगापिक्सल Sony AI रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी: या फोनमध्ये 5000mAh बॅटरी असून ती 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

ऑपरेटिंग सिस्टम: Lava Bold 2 5G हा स्मार्टफोन Android 15 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. कंपनीनुसार, या फोनमध्ये नो ब्लोटवेअर अनुभव देण्यात येणार आहे.

सुरक्षा: फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे, ज्यामुळे फोनची सुरक्षा अधिक मजबूत होते.

Web Title : लावा ने दमदार फीचर्स के साथ लॉन्च किया सस्ता 12GB रैम वाला फोन

Web Summary : लावा ने बोल्ड 2 5G लॉन्च किया, जो 12GB रैम, मीडियाटेक प्रोसेसर, 120Hz AMOLED डिस्प्ले और 50MP कैमरे के साथ बजट-अनुकूल फोन है। ₹12,999 की कीमत पर, यह मोटोरोला, रेडमी, पोको, सैमसंग और वीवो मॉडल के साथ प्रतिस्पर्धा करता है। इसमें 6.67 इंच का डिस्प्ले और 5000mAh की बैटरी है और यह एंड्रॉइड 15 पर चलता है।

Web Title : Lava Launches Affordable 12GB RAM Phone with Powerful Features

Web Summary : Lava has launched the Bold 2 5G, a budget-friendly phone with 12GB RAM, a MediaTek processor, 120Hz AMOLED display, and a 50MP camera. Priced at ₹12,999, it competes with Motorola, Redmi, POCO, Samsung, and Vivo models. It features a 6.67-inch display, 5000mAh battery and runs on Android 15.