शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

लाव्हा ए ९३: जाणून घ्या सर्व फिचर्स

By शेखर पाटील | Published: July 25, 2017 11:55 AM

लाव्हा कंपनीने भारतात ए ९३ हा किफायतशीर दरातला स्मार्टफोन लाँच केला असून याचे मूल्य ७,९९९ रूपये इतके असेल.

लाव्हा कंपनीने भारतात ए ९३ हा किफायतशीर दरातला स्मार्टफोन लाँच केला असून याचे मूल्य ७,९९९ रूपये इतके असेल.लाव्हा ए ९३ हे मॉडेल गोल्ड आणि ग्रे या दोन आकर्षक रंगांच्या पर्यायात ग्राहकांना सादर करण्यात आल्याचे कंपनीच्या वेबसाईटवरील लिस्टींगवरून (Hyperlink: http://www.lavamobiles.com/smartphones/a93 ) स्पष्ट झाले आहे. फिचर्सचा विचार करता लाव्हा ए ९३ या मॉडेलमध्ये मिड-रेंजमधील स्मार्टफोनमध्ये असणारे बहुतांश फिचर्स आहेत. यात १२८० बाय ७२० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा आयपीएस प्रकारातील ५.५ इंच आकारमानाचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. १.२ गेगाहर्टझ् क्वाड-कोअर प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या स्मार्टफोनची रॅम दोन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ते ३२ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. ऑटो-फोकस, एलईडी फ्लॅश, एचडीआर आणि फोटो टायमर या सुविधांसह यातील मुख्य कॅमेरा ८ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात २ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या मार्शमॅलो या आवृत्तीवर चालणारा आहे.लाव्हा ए ९३ या स्मार्टफोनमध्ये ‘पॉवर सेव्हर मोड’सह ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. ड्युअल सीमकार्ड व फोर जी नेटवर्क सपोर्टची सुविधा असणार्‍या या मॉडेलमध्ये वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, जीपीएस/ए-जीपीएस, एफएम रेडिओ, युएसबी २.० आदी फिचर्स असतील. याशिवाय यात व्हिडीओ पी-आय-पी, स्मार्ट म्युझिक, स्मार्ट जेस्चर, जी-सेन्सर, अँबियंट लाईट सेन्सर आदी अतिरिक्त सुविधा देण्यात आल्या आहेत. मूल्याचा विचार करता लाव्हा ए ९३ या मॉडेलला शाओमी रेडमी ४, शाओमी रेडमी ४ ए, मोटो सी प्लस आदी स्मार्टफोन्सची तगडी स्पर्धा असेल.