मस्तच! Google आणि YouTube वर केलेल्या सर्चचं आता नो टेन्शन; अशी करा हिस्ट्री डिलीट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 04:35 PM2021-01-12T16:35:19+5:302021-01-12T16:49:36+5:30

Google And YouTube : Google आणि YouTube वर सर्च केलेल्या सर्व गोष्टी सर्च हिस्ट्रीमध्ये सेव्ह होतात.

know how to delete google and youtube search history | मस्तच! Google आणि YouTube वर केलेल्या सर्चचं आता नो टेन्शन; अशी करा हिस्ट्री डिलीट

मस्तच! Google आणि YouTube वर केलेल्या सर्चचं आता नो टेन्शन; अशी करा हिस्ट्री डिलीट

googlenewsNext

नवी दिल्ली - Google आणि YouTube चा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे गुगलवर सर्च केलं जातं. मात्र आपल्या प्रत्येक सर्चची माहिती ही गुगलकडे सेव्ह केली जाते. आपण जे सर्च करतोय त्याच्या आधारावर गुगल त्यासंबंधी इतर रिझल्ट दाखवतो. तसेच YouTube चा वापर देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. Google आणि YouTube वर सर्च केलेल्या सर्व गोष्टी या सर्च हिस्ट्रीमध्ये सेव्ह होतात. त्यामुळे फोन अथवा लॅपटॉपचा वापर आपल्या व्यतिरिक्त इतर कोणी केला. तर त्यांना देखील आपण सर्च केलेल्या गोष्टी पाहायला मिळतात. त्यामुळे ही माहिती सहजरित्या कोणालाही पाहता येऊ नये यासाठी ती डिलीट करता येते. हिस्ट्री डिलीट करण्याची सोपी पद्धत जाणून घ्या. 

Google वरची हिस्ट्री अशी करा डिलीट 

- गुगलवरून हिस्ट्री डिलीट करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या फोनवर आणि डेस्कटॉपवर क्रोम ओपन करा. 

- राईट कॉर्नरमध्ये More चा पर्याय उपलब्ध आहे. त्यावर क्लिक करा. 

- History वर क्लिक करा. त्यानंतर Clear browsing data वर क्लिक करा. 

-  ड्रॉप-डाउन मेन्यू येईल. त्यामध्ये तुम्हाला कधीपर्यंतची हिस्ट्री डिलीट करायची आहे ते सिलेक्ट करा. Time Range सिलेक्ट करा. 

- एक तास, सात दिवस, चार आठवडे यातील तुम्हाला हवा असलेला एक पर्याय सिलेक्ट करा. सर्व चेकबॉक्समध्ये टिक करा. 

- पर्याय निवडल्यानंतर खाली देण्यात आलेल्या Clear Data वर टॅप करा. 

YouTube वरची हिस्ट्री अशी करा डिलीट

- सर्वप्रथम यासाठी YouTube वर जा. 

- डाव्या बाजुला देण्यात आलेल्या History या पर्यायावर क्लिक करा. 

- क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्ही सर्च केलेले सर्व व्हिडीओ दिसतील.

- उजव्या बाजुला Watch history चेक करा. त्यानंतर खाली देण्यात आलेल्या Clear All Watch History वर क्लिक करा. 

- एक पॉप-अप विंडो ओपन होईल. त्यामध्ये खाली देण्यात आलेल्या Clear Watch History या पर्यायावर टॅप करा. त्यानंतर YouTube सर्च हिस्ट्री डिलीट होईल. 

Web Title: know how to delete google and youtube search history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.