Jio चा धडाका! प्रीपेड यूजर्सना मोफत मिळणार ₹35,100 किमतीचा Google AI Pro प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 14:05 IST2025-10-31T14:04:37+5:302025-10-31T14:05:19+5:30

एअरटेलनंतर आता जिओने आपल्या यूजर्ससाठी मोफत AI प्लॅन आणला आहे.

Jio's big surprise! Prepaid users will get Google AI Pro plan worth ₹35,100 for free | Jio चा धडाका! प्रीपेड यूजर्सना मोफत मिळणार ₹35,100 किमतीचा Google AI Pro प्लॅन

Jio चा धडाका! प्रीपेड यूजर्सना मोफत मिळणार ₹35,100 किमतीचा Google AI Pro प्लॅन

रिलायन्स जिओने आपल्या प्रीपेड यूजर्ससाठी एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने Google सोबत भागीदारी केली असून, ₹35,100 किमतीचा ‘Google AI Pro’ प्लॅन आपल्या ग्राहकांना 18 महिन्यांसाठी मोफत देणार आहे.

हा लाभ Jio च्या Unlimited 5G प्लॅन वापरणाऱ्यांना मिळणार असून, सुरुवातीला ही सुविधा 18 ते 25 वर्षांच्या वयोगटातील युवकांसाठीच उपलब्ध असेल. कंपनी पुढच्या टप्प्यात इतर सर्व प्रीपेड यूजर्सपर्यंतही हा प्लॅन विस्तारण्याचा विचार करत आहे.

Airtel नंतर आता Jio चे मोठे पाऊल

Airtel ने काही दिवसांपूर्वी आपल्या प्रीपेड यूजर्सना एक वर्षासाठी Perplexity Pro AI प्लॅन मोफत देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता Jio ने Google सोबत भागीदारी करत आपल्या यूजर्सना आणखी मोठा फायदा दिला आहे.

या फ्री प्लॅनमध्ये काय मिळणार?

Google Gemini 2.5 Pro AI चा पूर्ण ऍक्सेस

Nano Banana आणि Veo 3.1 या अत्याधुनिक मॉडेल्सद्वारे फोटो आणि व्हिडिओ जनरेशनची सुविधा

Google NotebookLM - गूगलचे रिसर्च टूल, जे कंटेंट जनरेशन आणि डेटा विश्लेषणासाठी वापरले जाते

2TB Google Cloud Storage - Google Photos, Gmail, Drive आणि WhatsApp बॅकअपसाठी वापरता येईल

Google AI Pro प्लॅन कसा अॅक्टिव्हेट करावा?

Jio युजर्स हा फ्री AI प्लॅन सहजपणे अॅक्टिव्हेट करू शकतात:

MyJio अॅप उघडा.

होम स्क्रीनवर “Google Gemini Free Access” असा बॅनर दिसेल.

त्या बॅनरवर क्लिक करून आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करा.

यानंतर यूजरला Google AI Pro प्लॅनचा अॅक्सेस आपोआप मिळेल.

AI स्पर्धेत OpenAI ची एन्ट्री

OpenAI ने नुकतीच घोषणा केली आहे की, कंपनी 4 नोव्हेंबरपासून सर्व यूजर्सना “ChatGPT Go” चा फ्री अॅक्सेस देणार आहे. त्यामुळे Google आणि OpenAI या दोन्ही टेक दिग्गजांमध्ये आता AI ऍक्सेस स्पर्धा अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

Web Title : Jio प्रीपेड यूजर्स को मुफ्त में दे रहा है Google AI Pro प्लान

Web Summary : Jio ने Google के साथ साझेदारी में अपने 5G प्रीपेड यूजर्स को ₹35,100 का Google AI Pro प्लान 18 महीने के लिए मुफ्त देने की घोषणा की है, जो शुरुआत में 18-25 वर्ष की आयु के यूजर्स के लिए है। इस प्लान में Google Gemini 2.5 Pro AI एक्सेस, फोटो/वीडियो जनरेशन, Google NotebookLM और 2TB क्लाउड स्टोरेज शामिल है, जिसे MyJio ऐप से एक्टिवेट किया जा सकता है।

Web Title : Jio Offers Free Google AI Pro Plan to Prepaid Users

Web Summary : Jio partners with Google to offer a free 18-month Google AI Pro plan worth ₹35,100 to its 5G prepaid users, initially targeting users aged 18-25. This plan includes Google Gemini 2.5 Pro AI access, advanced photo/video generation, Google NotebookLM, and 2TB of cloud storage, activated via the MyJio app.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.